Pune Crime news : पुण्यात चाललंय काय? चक्क झोपमोड केल्यामुळे भाडेकरुकडून घरमालकाची हत्या
Pune Crime news: पुण्यात गुन्हेगारीचं प्रमाण वाढत आहे. त्यातच चक्क (Pune Crime news) झोपमोड केल्यामुळे भाडेकरुकडून घरमालकाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
![Pune Crime news : पुण्यात चाललंय काय? चक्क झोपमोड केल्यामुळे भाडेकरुकडून घरमालकाची हत्या Pune Crime news Landlord stabbed to death by tenant in hadapsar urali kanchan Pune Crime news : पुण्यात चाललंय काय? चक्क झोपमोड केल्यामुळे भाडेकरुकडून घरमालकाची हत्या](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/16/884963a35edee33b618d3de7231b0d6e1700143169025290_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पुणे : पुण्यात गुन्हेगारीचं प्रमाण वाढत आहे. त्यातच चक्क (Pune Crime news) झोपमोड केल्यामुळे भाडेकरुकडून घरमालकाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घरासमोर दुचाकीचे जोरात हॉर्न वाजवून झोपमोड केल्यामुळे भाडेकरुने थेट घरमालकाची हत्या केली आहे. भाडेकरूने मालकाला पाण्याच्या टाकीत बुडवून हत्या केली आहे. पुण्यातील हडपसर रस्त्यावरील उरुळी देवाची परिसरात घटना ही घडली आहे. संतोष राजेंद्र धोत्रे असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे तर दादा ज्ञानदेव घुले असे हत्या झालेल्या घरमालकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी धोत्रे हा घुले यांच्या चाळीत भाडेकरू आहे. सोमवारी दुपारी धोत्रे दारू पिल्यानंतर घरात झोपायला गेला. त्यावेळी घुले यांनी घरासमोर दुचाकीचा जोरजोराने हॉर्न वाजवला. त्यामुळे झोपमोड झाल्याने धोत्रेने घुले यांना मारहाण केली. धोत्रे ने त्यानंतर पार्किंगमधील पाण्याच्या टाकीत घुले यांना बुडवून खून केला घुले रात्री उशिरापर्यंत घरी न आल्यामुळे कुटुंबीयांनी ते बेपत्ता झाल्याची पोलिसात तक्रार दिली. चौकशीदरम्यान घुले आणि धोत्रे यांच्यात सोमवारी भांडण झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करत आहेत.
भीती उरलीच नाही...
काही दिवसांपूर्वीच पुण्यात मुळशी पॅटर्न चित्रपटाचा थरार पुन्हा पाहायला मिळाला. पुण्यात पाळलग करत कोयत्याने हल्ला करत तरुणाचा खून करण्यात आला होता. शहरामध्ये गुन्हेगारी कमी होताना दिसत नाही ज्यांचा खून होतोय ते देखील आणि जे खून करताय ते देखील अगदी कमी वयाचे युवक असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आले आहे. पुण्यात कोयत्याने हल्ला करत तरुणाचा खून करण्यात आला होता. पाठलाग करून कोयत्याने हल्ला करून खून केला होता. पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला होता. पाठलाग करत तरूणाला इमारतीच्या छतावर गाठले आणि कोयत्याने वार करत तरुणाचा खून करण्यात आला होता.किरकोळ वादामधून तरुणावर कोयत्याने वार करत खून केला होता.
शुल्लक कारणावरुन हत्या
सध्या पुण्यात शुल्लक कारणावरुन होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. रोज नवे गुन्हे समोर येत आहेत. शुल्लक कारणावरुन भांडणं होतात, त्याच्या रागातून खून आणि हत्या करण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्याबरोबरच बलात्कार, सायबर क्राईम आणि लैंगिक छळांच्या घटनेत देखील वाढ होत आहे. कोयता गँग आणि चुहा गँग सक्रिय आहेत. त्यातील कोयता गँगने सध्या पुण्यात धुमाकूळ घातला आहे. त्यातच आता पुण्यात एकापाठोपाठ एक शुल्लक कारणावरुन हत्या केल्याचं समोर येत आहे.
इतर महत्वाची बातमी-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)