Jalgaon Accident : रेल्वे गेट तोडून ट्रक ट्रॅकवर, अमरावती एक्सप्रेसची धडक, जळगावमध्ये अपघात

जळगावमधील बोदवड रेल्वे स्थानकाजवळ ट्रक आणि मुंबई-अमरावती एक्स्प्रेसचा अपघात झाला. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. परंतु अपघातानंतर अनेक गाड्या मलकापूर, नांदुरा, शेगाव, अकोला स्थानकात अडकल्या आहे. त्यामुळे ऐन सणासुदीच्या दिवशी प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. बोदवड नाढगावजवळ रेल्वे गेट तोडून धान्याने भरलेला एक ट्रक ट्रॅकवर अडकला. रेल्वे रुळावर अडकलेला ट्रक आणि रेल्वे इंजिन वेगळे करण्याचे प्रयत्न युद्ध पातळीवर सुरू आहेत. काही वेळात वाहतूक सुरू होईल असा अंदाज रेल्वे प्रशासनाने व्यक्त केला आहे.