एक्स्प्लोर

Pune Nilesh Ghaywal Gang: कोथरूडमध्ये सामान्य लोकांवर गोळीबार अन् कोयत्याने वार, निलेश घायावळसह टोळीवर पोलिसांची मोठी कारवाई

Pune Nilesh Ghaywal Gang: सध्या परदेशात असलेल्या घायवळ याच्या अटकेसाठी पोलिसांनी देशातील महत्त्वाच्या विमानतळांवर 'लुक आउट' नोटीस लावली आहे.

Show Quick Read
Key points generated by AI, verified by newsroom

पुणे: कोथरूड गोळीबार प्रकरणात गुंड नीलेश घायवळ (Nilesh Ghaywal and gang) याच्यासह दहा जणांवर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारीविरोधी कायद्यानुसार (मकोका) कारवाई केली आहे. पोलीस ठाण्यापासून शंभर ते दोनशे मीटर अंतरावर एका तरुणावर केलेल्या गोळीबाराच्या गुन्ह्यामध्ये (Pune Crime News) ही कारवाई करण्यात आली आहे. टोळीप्रमुख आणि धुमाळ यांच्यावर गोळीबार करणारा मयूर गुलाब कुंबरे, नीलेश बन्सीलाल घायवळ, मयंक विजय व्यास, गणेश सतीश राऊत, दिनेश रामभाऊ फाटक, आनंद अनिल चांदलकर, रोहित विठ्ठल आखाडे, अक्षय दिलीप गोगावले, जयेश कृष्णा वाघ, मुसाब इलाही शेख, अशी मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेल्यांची नावे आहेत. यातील कुंबरे, राऊत, चदिलकर, फाटक, व्यास यांना अटक करण्यात आली असून, इतर फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.(Nilesh Ghaywal and gang) 

Nilesh Ghaywal: घायवळ याच्या अटकेसाठी विमानतळांवर 'लुक आउट' नोटीस

सध्या परदेशात असलेल्या घायवळ याच्या अटकेसाठी पोलिसांनी (Pune Crime News) देशातील महत्त्वाच्या विमानतळांवर 'लुक आउट' नोटीस लावली आहे. घायवळ हा सराईत असून पुणे शहर आणि पुणे ग्रामीण येथे गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर यापूर्वीही मकोकाअंतर्गत कारवाई झालेली आहे. रस्त्यावर गप्पा मारत थांबलेल्यांनी दुचाकीला जाण्यास जागा दिली नाही, या क्षुल्लक कारणावरुन झालेल्या वादावादीनंतर तरुणावर गोळीबार करण्यात आला होता. गोळीबारात प्रकाश मधुकर धुमाळ (३६) रा. थेरगाव हा जखमी झाला. मुठेश्वर मित्र मंडळासमोर १७सप्टेंबर रोजी रात्री ११.४० मिनिटांनी हा प्रकार घडला. या प्रकरणातील आरोपींनी त्यानंतर जुन्या वादाच्या कारणावरून आणखी एका इसमाच्या मानेवर कोयत्याने वार करून त्याला गंभीर जखमी केले होते. या दोन्ही घटनांप्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे कोथरूड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले होते.(Pune Crime News) 

Nilesh Ghaywal Gang: प्रकाश धुमाळ यांच्यावर गोळीबार नंतर एकावर कोयत्याने वार

काही दिवसांपूर्वी (१७-१८ सप्टेंबर) मध्यरात्री कुख्यात निलेश घायवळ (Nilesh Ghaywal) टोळीने पुण्यात धुमाकूळ घालत सलग दोन गंभीर गुन्हे केले होते. कोथरूडमधील मुठेश्वर परिसरात पहिल्यांदा ३६ वर्षीय प्रकाश धुमाळ यांच्यावर गोळीबार करण्यात आला. त्यानंतर काही अंतरावरच सागर साठे या तरुणावर कोयत्याने  (Pune Crime News) वार करून हल्ला करण्यात आला. एका रात्री दोन रक्तरंजित कृत्यांमुळे पुन्हा एकदा घायवळ टोळी चर्चेत आली होती. या प्रकरणी पोलिसांनी टोळीतील सदस्यांना अटक केली आहे. प्राथमिक चौकशीत, आरोपींनी “आम्हीच इथले भाई” असा दहशतीचा आव आणत हे हल्ले केल्याचे समोर आले. केवळ गाडीला साईड न दिल्याच्या कारणावरून धुमाळ यांच्यावर गोळीबार झाला, तर सागर साठे यांच्यावर कोणतेही कारण नसताना फक्त दहशत पसरवण्यासाठी कोयत्याने वार करण्यात आला. मागील काही दिवसांपासून शांत असलेली घायवळ टोळी पुन्हा सक्रिय झाल्याची चर्चा स्थानिकांमध्ये रंगू लागली आहे.(Pune Crime News)

Who is Nilesh Ghaywal: कोण आहे निलेश घायवळ?

निलेश घायवळ हा कुख्यात गुंड गजा मारणेच्या टोळीत गुंड म्हणून काम करायचा. त्याच्यावर पुण्यामध्ये हत्या, हत्येचा प्रयत्न, बेकायदा शस्त्र बाळगणं, मारामारी करणं, परिसरात दहशत पसरवणं यासारख्या गुन्ह्यांची नोंद आहे. पुण्यातील कोथरुड परिसरातील सुतारवाडीत निलेश घायवळची मोठी दहशत होती. मात्र, गजा मारणेशी बिनसल्यावर मारणे गॅंगने घायवळवर दोनदा हल्ले केले होते. त्याचं प्रत्युत्तर देखील घायवळ टोळीने दिलं. दत्तवाडीत गुंड सचिन कुडलेची निलेश घायवळ आणि साथीदारांनी रस्त्यात पाठलाग करुन फिल्मी स्टाईलने हत्या केली होती. कुडलेच्या हत्येनंतर घायवळसह 26 जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई झाली. 2019 मध्ये निलेश घायवळ तुरुंगातून सुटला. बाकी गुन्ह्यातदेखील घायवळला जामीन मिळाला आणि 2023 मध्ये तो अखेर तुरुंगातून बाहेर आला.

घायवळ खंडणी, टोळीयुद्ध आणि इतर हिंसक गुन्ह्यांसह अनेक गुन्हेगारी कारवायांमध्ये सामील आहे. घायवळचे नाव अनेक गुन्हेगारी प्रकरणांमध्ये समोर आले आहे आणि तो पुण्यातील टोळी युध्द, हत्या, हत्येचा प्रयत्न, बेकायदा शस्त्र बाळगणं, मारामारी करणं, परिसरात दहशत पसरवणं यामध्ये होता. निलेश घायवळ मूळ राहणार सोनेगाव ता. जामखेडचा आहे. निलेश घायवळ विरोधात पुण्यातील विविध पोलीस ठाण्यात 23 ते 24 गुन्हे दाखल आहेत. निलेश घायवळ उच्चशिक्षित आहे, त्याच मास्टर इन कॉमर्सपर्यंत शिक्षण झालं आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde : मस्क्युलर डिस्ट्रॉफीग्रस्त मुलांसाठी सरकारचा पाठपुरावा; उपमुख्यमंत्री शिंदेंची 100 इलेक्ट्रिक व्हीलचेअर देण्याची घोषणा
मस्क्युलर डिस्ट्रॉफीग्रस्त मुलांसाठी सरकारचा पाठपुरावा; उपमुख्यमंत्री शिंदेंची 100 इलेक्ट्रिक व्हीलचेअर देण्याची घोषणा
Smriti Mandhanna And Palash Muchhal: लग्न मोडलं, सगळं संपलं! पहिले स्मृतीची पोस्ट, मग पलाशही सगळं बोलून गेला; एकमेकांना अनफॉलोही केलं, नेमकं काय काय घडलं?
सगळं संपलं! पहिले स्मृतीची पोस्ट, मग पलाशही सगळं बोलून गेला; एकमेकांना अनफॉलोही केलं, काय घडलं?
Palash Muchhal: 'त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करणार'! पलाश मुच्छलकडूनही स्मृतीशी लग्न मोडल्याचं जाहीर, पण जाता जाता गंभीर इशारा कोणाला दिला?
'त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करणार'! पलाश मुच्छलकडूनही स्मृतीशी लग्न मोडल्याचं जाहीर, पण जाता जाता गंभीर इशारा कोणाला दिला?
Ayodhya Crime News: मध्यरात्री सुनेच्या खोलीतून कुजबूज अन् हसण्याचे आवाज; सासूने केला आरडाओरडा; गावकऱ्यांनी खोली तपासताच बेडखाली निघाला प्रियकर अन्...
मध्यरात्री सुनेच्या खोलीतून कुजबूज अन् हसण्याचे आवाज; सासूने केला आरडाओरडा; गावकऱ्यांनी खोली तपासताच बेडखाली निघाला प्रियकर अन्...
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

MVA PC Winter Session :  ज्यांना लोकशाही मान्य नाही अशा लोकांसोबत चहापानाला का जायचं? भास्कर जाधव
Supriya Sule Dance : नवीन जिंदाल यांच्या मुलीच्या लग्नात सुप्रिया सुळेंचा डान्स
Nagpur Winter Session अधिवेशनाआधी दिवसभरात काय होणार? कशाप्रकारे तयारी?
Nagpur Winter Session : सरकारच्या चहापानावरती विरोधक बहिष्कार टाकणार - सूत्र
Thane Crime News : ठाणे फॅमिली कोर्टाच्या बाहेर केकमध्ये गुंगीचं औषध देऊन महिलेवर वारंवार अत्याचार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde : मस्क्युलर डिस्ट्रॉफीग्रस्त मुलांसाठी सरकारचा पाठपुरावा; उपमुख्यमंत्री शिंदेंची 100 इलेक्ट्रिक व्हीलचेअर देण्याची घोषणा
मस्क्युलर डिस्ट्रॉफीग्रस्त मुलांसाठी सरकारचा पाठपुरावा; उपमुख्यमंत्री शिंदेंची 100 इलेक्ट्रिक व्हीलचेअर देण्याची घोषणा
Smriti Mandhanna And Palash Muchhal: लग्न मोडलं, सगळं संपलं! पहिले स्मृतीची पोस्ट, मग पलाशही सगळं बोलून गेला; एकमेकांना अनफॉलोही केलं, नेमकं काय काय घडलं?
सगळं संपलं! पहिले स्मृतीची पोस्ट, मग पलाशही सगळं बोलून गेला; एकमेकांना अनफॉलोही केलं, काय घडलं?
Palash Muchhal: 'त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करणार'! पलाश मुच्छलकडूनही स्मृतीशी लग्न मोडल्याचं जाहीर, पण जाता जाता गंभीर इशारा कोणाला दिला?
'त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करणार'! पलाश मुच्छलकडूनही स्मृतीशी लग्न मोडल्याचं जाहीर, पण जाता जाता गंभीर इशारा कोणाला दिला?
Ayodhya Crime News: मध्यरात्री सुनेच्या खोलीतून कुजबूज अन् हसण्याचे आवाज; सासूने केला आरडाओरडा; गावकऱ्यांनी खोली तपासताच बेडखाली निघाला प्रियकर अन्...
मध्यरात्री सुनेच्या खोलीतून कुजबूज अन् हसण्याचे आवाज; सासूने केला आरडाओरडा; गावकऱ्यांनी खोली तपासताच बेडखाली निघाला प्रियकर अन्...
Video: भाजप खासदाराच्या लेकीच्या लग्नात कंगनाच्या साथीत सुप्रिया सुळे अन् महुआ मोईत्रा थिरकल्या!
Video: भाजप खासदाराच्या लेकीच्या लग्नात कंगनाच्या साथीत सुप्रिया सुळे अन् महुआ मोईत्रा थिरकल्या!
Smriti Mandhana: स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! अफवांना वैतागून स्वत: पोस्ट करत म्हणाली, 'मला आता स्वतः बोलणं गरजेचं वाटतं म्हणून..'
स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! अफवांना वैतागून स्वत: पोस्ट करत म्हणाली, 'मला आता स्वतः बोलणं गरजेचं वाटतं म्हणून..'
Winter Session: विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेस नव्याने मुख्यमंत्री व विधानपरिषद सभापतींकडे प्रस्ताव देणार
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेस नव्याने मुख्यमंत्री व विधानपरिषद सभापतींकडे प्रस्ताव देणार
Sarangkheda Horse Market: मध्य प्रदेशातून आली खास पाहुणी; पुष्करमध्ये 1 कोटी 17 लाखांची किंमत, रोज 8 लिटर दूध पिणारी ऐटदार 'रुद्राणी' घोडी सारंगखेडा अश्वबाजारात
मध्य प्रदेशातून आली खास पाहुणी; पुष्करमध्ये 1 कोटी 17 लाखांची किंमत, रोज 8 लिटर दूध पिणारी ऐटदार 'रुद्राणी' घोडी सारंगखेडा अश्वबाजारात
Embed widget