Pune Crime : 'पाच मिनिटांत आली नाहीस, तर तुझ्या आईचं घर जाळेन...'; किरकोळ भांडणावरून जावयाने सासूच्या घराला लावली आग
Pune Crime News : पत्नीशी वाद झाला होता. त्यामुळे पत्नी रागाच्या भरात बुधवारी रात्री माहेरी निघून गेली. तिला आणण्यासाठी गेलेल्या जावयाने सासरवाडीच्या घराला आग लावली.
पुणे - पत्नी माहेरी गेली या कारणावरून जावयाने चक्क सासुरवाडीतील घराला आग लावल्याचा धक्कादायक प्रकास समोर आला आहे. या घटनेत घरातील काही साहित्य जळाल्याने नुकसान झालं आहे. ही घटना कोथरूड परिसरातील सुतारदरा परिसरात गुरुवारी मध्यरात्री घडली आहे. या प्रकरणी सासूने कोथरूड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी जावई साहिल हनुमंत हाळंदे (वय 25, रा. भूगाव, ता. मुळशी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)
साहिलचा पत्नीशी वाद झाला होता. त्यामुळे पत्नी रागाच्या भरात बुधवारी रात्री माहेरी निघून गेली. त्यामुळे साहिल गुरुवारी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास सासुरवाडीत गेला. त्याने पत्नीला ‘मी तुझ्या घराजवळ आलो आहे. तू पाच मिनिटांत माझ्यासोबत घरी आली नाहीस, तर तुझ्या आईचे घर जाळून टाकेन’, अशी धमकी दिली. त्यानंतर साहिलने सासूच्या घराला आग लावली. त्यात घरातील साहित्य जळाल्याने मोठं नुकसान झालं आहे. कोथरूड पोलिसांनी पसार झालेल्या पतीला अटक केली आहे.अधिक तपास पोलीस करत आहेत.(Pune Crime News)
नेमकं काय घडलं?
साहिलचा आपल्या पत्नीशी वाद झाला होता. त्यामुळे पत्नी रागाच्या भरात बुधवारी रात्री माहेरी निघून गेली. त्यानंतर साहिल गुरुवारी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास सासुरवाडीत गेला. त्याने पत्नीला ‘मी तुझ्या घराजवळ आलो आहे. तू पाच मिनिटांत माझ्यासोबत घरी आली नाहीस, तर तुझ्या आईचे घर जाळून टाकेन’, अशी धमकी दिली. त्यानंतर पत्नी सोबत आली नाही, म्हणून साहिलने सासूच्या घराला आग लावली. त्यात घरातील साहित्य जळालं त्यामुळं मोठं नुकसान झालं आहे.(Pune Crime News)
या घटनेची माहिती मिळताच परिमंडळ तीनचे पोलिस उपायुक्त संभाजी कदम, विशेष शाखेचे सहाय्यक आयुक्त विठ्ठल दबडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप देशमाने, पोलिस निरीक्षक (गुन्हे) विक्रमसिंह कदम, पोलिस निरीक्षक सीमा ढाकणे यांनी घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास सहाय्यक निरीक्षक संदीप पवार करीत आहेत.