एक्स्प्लोर

Pune Crime News : जेवणाच्या टेबलावरुन झालेल्या वाद; पुण्यात लग्नाच्या दिवशीच नवरदेवाने कट्यार थेट काळजात घुसवली!

जेवणाच्या टेबलावरुन झालेल्या वादातून विवाह समारंभात नवरदेवाने मंगल कार्यालय चालकावर कट्यारने वार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी अभिजीत मिरगणे, राहुल सरोदे यासह इतर 5 ते 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पुणे :  जेवणाच्या टेबलावरुन झालेल्या वादातून विवाह समारंभात नवरदेवाने मंगल कार्यालय चालकावर (CRIME) कट्यारने वार केल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे लग्नाच्या दिवशीच नवरदेवावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगल कार्यालयाचे मालक करण सणस यांनी याप्रकरणी पोलिसात तक्रार दिली आहे. या प्रकरणी अभिजीत मिरगणे, राहुल सरोदे यासह इतर 5 ते 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सणस यांचे पुणे-सोलापूर रस्त्यावरील उरळी कांचन भागात श्रीकृष्ण मंगल कार्यालय आहे. हा सगळा प्रकार 6 जानेवारी रोजी रात्री 8 : 30 वाजताच्या दरम्यान याच ठिकाणी घडला. या ठिकाणी आरोपी नवरदेव अभिजीत याचा विवाह संपन्न झाला होता. 

विवाह समारंभानंतर अभिजीत आणि नातेवाईक  स्टेजजवळ टेबल-खुर्ची मांडून जेवण करत होते. त्यामुळे तेथून इतर काही जणांना ये-जा करता येत नव्हती. मंगल कार्यालय चालक सणस यांनी अभिजीत आणि नातेवाईकांना टेबल-खुर्ची सरकावण्यास सांगितले. या कारणावरून अभिजीत आणि त्याच्याबरोबर असलेल्या नातेवाईकांनी सणस यांच्याशी वाद घालायला सुरुवात केली. सणस यांना शिवीगाळ करुन त्यांच्या हातावर अभिजीतने त्याच्याकडे असणाऱ्या कट्यारने वार केला. कट्यारीला धार नसल्याने फिर्यादी यांना गंभीर दुखापत झाली नाही. लोणी काळभोर पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

पुण्यात गुन्हेगारीत वाढ

पुण्यामध्ये काही दिवसांपासून गुन्हेगारीत वाढ झालेली बघायला मिळत आहेत. अशताच काही दिवसांपूर्वी पुण्यात चक्क मटणाची (Mutton) उधारी न देता दुकान मालकाची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता. विशेष म्हणजे, ही उधारी थोडी थोडकी नव्हे तर तब्बल 61 लाखांची उधारी होती. धक्कादायक म्हणजे पुण्यातील (Pune) एका प्रसिद्ध हॉटेल मालकानेच ही फसवणूक केल्याचं देखील समोर आलं होतं. हॉटेलसाठी मटन, चाप खिमा असे मटणाचे अनेक प्रकार घेतल्यावर त्याचे पैसे दिले नसल्याने मटन विक्रेत्याने हा गुन्हा दाखल केला होता. फजल युसुफ बागवान आणि अहते शाम आयाज बागवान या दोघांवर हा गुन्हा दाखल झाला. ते पुण्यातील प्रसिद्ध बागबान हॉटेलचे  मालक आहेत. 

अफजल युसुफ बागवान आणि अहते शाम आयाज बागवान या दोघांवर पुण्यातील लष्कर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील 35 वर्षे पीडित फिर्यादी यांचे पुण्यातील लष्कर परिसरात असलेल्या शिवाजी मार्केट या ठिकाणी मटणाचे दुकान आहे. 

इतर महत्वाची बातमी-

Goa Murder Case : गोव्यात आईनेच केली मुलाची हत्या, कर्नाटकातील स्टार्ट अप कंपनीची सीईओ अटकेत; जाणून घ्या घटनाक्रम

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शाकाहाराचा अट्टाहास! अनंत अंबानींनी कत्तलाखान्यात जाणाऱ्या 250 कोंबड्या दुप्पट पैसा देऊन विकत घेतल्या
शाकाहाराचा अट्टाहास! अनंत अंबानींनी कत्तलाखान्यात जाणाऱ्या 250 कोंबड्या दुप्पट पैसा देऊन विकत घेतल्या
शिवसेनेला दे धक्का! विधानसभा निवडणुकीत 1 लाखांवर मतं घेतलेल्या उमेदवाराचा उद्धव ठाकरेंना 'जय महाराष्ट्र'
शिवसेनेला दे धक्का! विधानसभा निवडणुकीत 1 लाखांवर मतं घेतलेल्या उमेदवाराचा उद्धव ठाकरेंना 'जय महाराष्ट्र'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 एप्रिल  2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 एप्रिल  2025 | मंगळवार
Manoj Jarange : फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवून संतोष देशमुख प्रकरणातील सगळ्यांना फाशी देऊन टाका, नाहीतर जेलमध्येच गँगवॉर होऊन सगळे संपतील : मनोज जरांगे
फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवून संतोष देशमुख प्रकरणातील सगळ्यांना फाशी देऊन टाका, नाहीतर जेलमध्येच गँगवॉर होऊन सगळे संपतील : मनोज जरांगे
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manoj Jarange on Beed : कळंब महिला हत्या प्रकरणावर मनोज जरांगे यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले...Prithviraj Chavan : शेतकऱ्यांची कर्जमाफी ते बांगलादेशी घुसखोरी,पृथ्वीराज चव्हाणांचं विश्लेषणABP Majha Headlines 4 PM Top Headlines  4 PM 1 April 2025 संध्या 4 च्या हेडलाईन्सAditya Thackeray Full PC : 'हा 'अदानी कर' लादला जातोय, घनकचरा नियोजन शुल्कला कडाडून विरोध करणार'

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शाकाहाराचा अट्टाहास! अनंत अंबानींनी कत्तलाखान्यात जाणाऱ्या 250 कोंबड्या दुप्पट पैसा देऊन विकत घेतल्या
शाकाहाराचा अट्टाहास! अनंत अंबानींनी कत्तलाखान्यात जाणाऱ्या 250 कोंबड्या दुप्पट पैसा देऊन विकत घेतल्या
शिवसेनेला दे धक्का! विधानसभा निवडणुकीत 1 लाखांवर मतं घेतलेल्या उमेदवाराचा उद्धव ठाकरेंना 'जय महाराष्ट्र'
शिवसेनेला दे धक्का! विधानसभा निवडणुकीत 1 लाखांवर मतं घेतलेल्या उमेदवाराचा उद्धव ठाकरेंना 'जय महाराष्ट्र'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 एप्रिल  2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 एप्रिल  2025 | मंगळवार
Manoj Jarange : फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवून संतोष देशमुख प्रकरणातील सगळ्यांना फाशी देऊन टाका, नाहीतर जेलमध्येच गँगवॉर होऊन सगळे संपतील : मनोज जरांगे
फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवून संतोष देशमुख प्रकरणातील सगळ्यांना फाशी देऊन टाका, नाहीतर जेलमध्येच गँगवॉर होऊन सगळे संपतील : मनोज जरांगे
दिशा सालियन प्रकरणी सुनावणीपूर्वीच न्यायमूर्तींच्या भूमिकेवर प्रश्न; वकील निलेश ओझांनी सांगितलं मविआ कनेक्शन
दिशा सालियन प्रकरणी सुनावणीपूर्वीच न्यायमूर्तींच्या भूमिकेवर प्रश्न; वकील निलेश ओझांनी सांगितलं मविआ कनेक्शन
रायगडमध्ये लिफ्ट कोसळून भीषण अपघात, 2 जखमी; उल्हासनगरमध्ये ग्रील तुटल्याने 2 लहानगे खाली पडले
रायगडमध्ये लिफ्ट कोसळून भीषण अपघात, 2 जखमी; उल्हासनगरमध्ये ग्रील तुटल्याने 2 लहानगे खाली पडले
श्री सिद्धिविनायक चरणी भाविकांचं भरभरुन दान; गत आर्थिक वर्षात कोट्यवधींचं उत्पन्न, अपेक्षेपेक्षा जास्त
श्री सिद्धिविनायक चरणी भाविकांचं भरभरुन दान; गत आर्थिक वर्षात कोट्यवधींचं उत्पन्न, अपेक्षेपेक्षा जास्त
राज्यात लवकरच 'श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना'; मुलींच्या नावे 10,000 रुपये, समितीच्या बैठकीत मंजुरी
राज्यात लवकरच 'श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना'; मुलींच्या नावे 10,000 रुपये, समितीच्या बैठकीत मंजुरी
Embed widget