Pune crime News : नराधम बाप! दुसऱ्या लग्नाला नकार दिल्याने वडिलांनीच केला लेकीचा विनयभंग
Pune crime News : वडिलांच्या दुसऱ्या लग्नाला विरोध केल्याने वडिलांनीच 13 वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Pune crime News : वडीलांच्या दुसऱ्या लग्नाला विरोध केल्याने (Pune Crime News)वडीलांनीच 13 वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पत्नीचं निधन झालं आणि त्यानंतर वडील दुसऱ्या लग्नाचा विचार करत होते. हे सगळं मुलीला पटलं नाही त्यामुळे मुलीने वडीलांना दुसऱ्या लग्नासाठी विरोध केला होता. त्यानंतर वडीलांनीच तिचा विनयभंग केला असल्याची घटना समोर घडली आहे.
याप्रकरणी 13 वर्षीय मुलीने वारजे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ही मुलगी कर्वेनगरमध्ये राहते. या मुलीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई केली आहे. त्यानुसार पोलिसांनी तक्रारदार अल्पवयीन मुलीचे वडील आणि आजीविरोधात गुन्हा (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार 2020 पासून आजपर्यंत घडल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार अल्पवयीन मुलीच्या आईचे निधन झाल्यानंतर वडीलांना दुसरे लग्न करायचे होते. मात्र मुलीने यांचा त्यास विरोध दर्शवला. या विरोधामुळे अल्पवयीन मुलीचे वडील संतापले होते. त्यानंतर त्यांनी स्वत:च्याच लेकीला शिवीगाळ केली. घरात वावरत असताना तिला त्रास दिला. एकटी असताना पाहून मुलीच्या गुप्तांगाला हात लावून विनयभंग केला. तसंच आजीनेही त्या मुलीला मानसिक त्रास दिला. मुलगी आजीला विनाकारण मारहाण करते म्हणत तिची बदनामी केली, असं तक्रारीत म्हटलं आहे.
आईनेच केली लेकीची हत्या; घटनेनं खळबळ
पुण्यात गुन्हेगारीचं प्रमाण जास्त वाढलं आहे. दिवसेंदिवस गुन्ह्यांच्या घटनेत सातत्याने वाढ होत आहे. काही दिवसांपूर्वी आईनेच पोटच्या लेकीची हत्या केल्याची घटना समोर आली होती. अनैतिक संबंधात अडथळा ठरणार्या तीन वर्षीय चिमुकलीचा आई आणि तिच्या प्रियकराने गळा आवळून खून केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात (Pune Crime News) समोर आला होता. खडकी पोलिसांना तीन वर्षीय मुलीचा मृतदेह सापडला होता. त्यानंतर तिचा गळा आवळून हत्या केल्याचं शवविच्छेदनातून समोर आलं होतं. पोलिसांनी या सगळ्या प्रकरणाचा तपास सुरु केला आणि अखेर पोलिसांना या चिमुकलीच्या हत्येचा उलगडा करण्यात यश आलं होतं. या चिमुरडीची हत्या आई आणि तिच्या प्रियकराने गळा आवळून केल्याचं पोलीस तापासात समोर आलं होतं. या प्रकरणी आई आणि तिच्या प्रियकराला पोलिसांनी अटक केली होती. संतोष देवमन जामनिक (वय 25) आणि लक्ष्मी संतोष गवई (वय 26, दोघे रा. खेरपुडी, ता. बाळापूर, जि. अकोला) अशी अटक केलेल्या दोघांची नावे होतं. खडकी रेल्वे स्टेशन ते खडकी बाजार रोडच्या दरम्यान सीएफडी मैदानाजवळ तीन वर्षाच्या चिमुकलीचा 2 मार्च रोजी दुपारी मृतदेह आढळून आला होता.