Pune Crime News : पुण्यात ATS कडून मोठी कारवाई; दहशतवादी संघटनेशी संबंधित तरुण अटकेत
Pune Crime News: पुण्यात दहशतवादी विरोधी पथकाने मोठी कारवाई केली आहे. दहशतवादी संघटनेशी संबंधित तरुणाला अटक केली आहे. जुनेद मोहम्मद असं या तरुणाचं नाव आहे.
Pune Crime News : पुणे दहशतवादी विरोधी पथकाकडून पुण्यात मोठी कारवाई करण्यात आली आहे. जम्मू काश्मीरमधील एका अतिरेकी संघटनेच्या संपर्कात असल्याने दापोडी परिसरातून एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. जुनेद मोहम्मद असं 28 वर्षीय तरुणाचे नाव आहे. त्याबरोबरच तीन आरोपी फरार आहे. त्यांचा तपास सुरु आहे.
काश्मीर मधील अतिरेकी संघटनेकडून फंडींग झाल्याचा आरोप या तरुणावर करण्यात आला आहे. त्यामुळे पुण्यात खळबळ उडाली आहे. या कारवाईनंतर आज जुनेद मोहोम्मदला दुपारी पुणे न्यायालयात हजर करण्यात येणार आहे .
काय आहे प्रकरण?
या प्रकरणी पुणे दहशतवादी विरोधी संघटनेनी दिलेल्या माहितीनूसार, गझवाते अल हिंद या काश्मीरमधील अतिरेकी संघटनेने महिनाभरापुर्वीच या तरुणाच्या बँक खात्यात दहा हजार रुपये जमा केले होते. मात्र हे पैसे त्याला कुठल्या कामासाठी देण्यात आले होते हे मात्र अजून उघड झाल नसल्याचं देखील पुणे एटीएसने सांगितलं आहे.
राज्यात कारवायांसाठी काश्मीरच्या एका संघटनेने त्याला महिनाभरापुर्वी 10 हजार रुपये पाठवले होते.त्याच्या वैयक्तिक बँक खात्यात हे पैसे टाकण्यात आले होते. काही दिवसांपासून पुणे दहशतवादी विरोधी पथक आरोपीच्या मागावर होते. अखेर पुणे दहशतवादी विरोधी पथकाने आज मुसक्या आवळल्या आहेत
सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्क झाला
लष्कर-ए-तोयबासाठी काम केलं तर पैसे मिळत होते. यावरुन जुनेदला अटक करण्यात आली आहे. हा तरुण जम्मू काश्मीर मधील एका दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असल्याचे उघड झाला आहे.सोशल मीडियाच्या माध्यमातून कश्मिर संघटनेच्या संपर्कात आला होता,अशी माहिती आहे.
विदर्भाशी काय कनेक्शन?
आरोपी जुनेद मोहम्मह हा २८ वर्षांचा असून मुळचा विदर्भाच्या बुलढाणा जिल्ह्याचा रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे. जुनेदला पैसे नेमके का पाठवण्यात आले? तो या पैशांचे काय करणार होता? हे अद्याप समोर आलेले नाही. मात्र, दहशतवादी कृत्यांसाठीच हे फंडिग करण्यात आल्याचा पुणे दहशतवादी विरोधी पथकाचा आरोप आहे. जुनेद मौहम्मद त्यांच्या भावाबरोबर पु्ण्यातील दापोडी परिसरात राहत होता. अकोला दहशतवादी विरोधी पथकाकडून त्यांची चौकशी सुरु होती.