(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Majha Impact : पुण्यात महिलेला मारहाण करणाऱ्या पोलिस कॉन्स्टेबलवर गुन्हा दाखल
पुण्यातील (pune) मंडई भागात बांगड्यांचं दुकान चालवणाऱ्या महिलेला मारहाण करणाऱ्या पोलिस कॉन्स्टेबलवर अखेर गुन्हा दाखल झाला आहे.
Majha Impact : पुण्यातील (pune) मंडई भागात बांगड्यांचं दुकान चालवणाऱ्या महिलेला मारहाण करणाऱ्या पोलिस कॉन्स्टेबलवर अखेर गुन्हा दाखल झाला आहे. पुण्यातील विश्रामबाग पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, एबीपी माझानं यासंदर्भातील वृत्त दाखवलं होतं. पोलिस कॉन्स्टेबल महिलेला मारहाण केल्यामुळं त्यांच्या डोळ्याची दृष्टी अधू झाली आहे. अखेर याप्रकरणी पोलिस कॉन्स्टेबलच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
पुण्यात कॉन्स्टेबलकडून पोलीस चौकीत महिलेला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली होती. या मारहाणीत महिलेच्या चेहऱ्याला इजा झाली होती. तसेच त्या महिलेची दृष्टीही अधू झाली आहे. नो पार्किंगमध्ये गाडी लावण्यास विरोध केल्यानं मारहाणीचा आरोप करण्यात आला आहे.
नेमकं प्रकरण काय?
नो पार्किंगमध्ये कॉन्स्टेबलला गाडी लावण्यास विरोध केल्यानं मारहाण करण्यात आली होती. कॉन्स्टेबलने पिण्याच्या पाण्याचा जो नळ होता त्याच्यापुढे गाडी लावली होती. यावेळी मंडई भागात बांगड्यांचं दुकान चालवणाऱ्या महिलेनं गाडी नळापुढे न लावण्याची विनंती पोलिस कॉन्स्टेबलला केली होती. यावेळी कॉन्स्टेबलने दमदाटीच्या भाषा केल्याची माहिती त्या महिलेनं दिली होती. मी गाडी इथेच लावणार, तुम्हाला जी तक्रार करायची ती करा असेही ते म्हणाले होते. तसेच त्यांनी शिवी पण दिल्याची माहिती महिलेनं दिली होती. त्यानंतर मला पोलीस चौकीत बोलावण्यात आले. त्यानंतर त्यांनी मला मारहाण केल्याची माहिती महिलेनं दिली होती. मी त्यांना कोणत्याही प्रकारची शिवीगाळ केली नव्हती. ज्यावेळी मला मारहाण होत होती, त्यावेळी सोडवायला कोणीही आलं नसल्याचे महिलेने सांगितले.
माझ्या डोळ्याला इजा
माझा मेडिकलचा रिपोर्ट आला आहे. यामध्ये पोलिस कॉन्स्टेबलनं मारहाण केल्यामुळं माझ्या डोळ्याची नस दबली असल्याची माहिती महिलेनं दिली. डोळ्याला प्रचंड त्रास होत आहे. मेडिकलचा रिपोर्ट घेऊन मी पोलिस चौकीत देखील गेले होते, त्यावेळी माझी तक्रार घेतली नसल्याची माहिती महिलेनं दिली होती. त्यांनी मला सकाळी येण्यास सांगितले होते. मात्र, अखेर पोलिस कॉन्स्टेबलच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या: