(Source: ECI/ABP News/ABP Majha)
नो पार्किंमध्ये गाडी लावण्यास विरोध, पुण्यात कॉन्स्टेबलकडून महिलेला बेदम मारहाण
Pune Crime News : पुण्यातील मंडई पोलिस चौकीत एका कॉन्स्टेबलकडून महिलेला लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्यात आलीय. मारहाण होत असताना पोलिस चौकीत दोन कॉन्स्टेबल उपस्थित होते. मात्र कोणीही या महिलेच्या मदतीला आलं नाही.
Pune Crime News : पुण्यात एका महिलेला कॉन्स्टेबलने पोलिस चौकीत बेदम मारहाण केली आहे. या मारहाणीत या महिलेच्या चेहऱ्याला गंभीर इजा झाली आहे. पीडितेच्या डोळ्याला देखील गंभीर इजा झाली आहे. या महिलेने तिच्या दुकानासमोर नो पार्किंमध्ये गाडी लावणाऱ्या राहुल शिंगे नावाच्या कॉन्स्टेबलला विरोध केल्यामुळे शिंगेने या महिलेला मारहाण केलीय. मात्र पुणे पोलिस या प्रकरणाची तक्रार नोंद करून घेण्यास देखील तयार नाहीत. कांचन दोडे असे मारहाण झालेल्या महिलेचे नाव आहे.
पुण्यातील मंडई पोलिस चौकीत दोडे यांना मारहाण करण्यात आलीय. शिंगेने केलेल्या मारहाणीमुळे कांचन दोंडे यांच्या उजव्या दृष्टीवर परिणाम झाला असून त्यांना या डोळ्याने अंधुक दिसत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विश्रामबाग पोलिस स्टेशनच्या हद्दीतील पुण्यातील मंडई पोलिस चौकीच्या समोर कांचन दोंडे यांचं बांगड्यांचं दुकान आहे. 19 ऑकटोबर रोजी शेजारच्या खडकमाळ पोलिस स्टेशनमध्ये काम करणारा राहुल शिंगे नावाचा कॉन्स्टेबल खरेदीसाठी मंडईत आला होता. त्यानं त्याची दुचाकी दोंडे यांच्या दुकानासमोर लावली. ही जागा पार्किंगची नसल्यानं कांचन दोंडे यांनी त्याला आक्षेप घेतला. त्यावरून सुरु झालेला वाद समोरच असलेल्या पोलीस चौकीत पोहचला. पण पोलिस चौकीत कॉन्स्टेबल शिंगे यांना कांचन दोंडे यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली.
राहुल शिंगेकडून कांचन दोंडे यांना मारहाण होत असताना पोलिस चौकीत दोन कॉन्स्टेबल उपस्थित होते. मात्र कोणीही कांचन दोंडे यांच्या मदतीला आलं नाही. त्यानंतर त्यांनी विश्रामबाग पोलिस चौकीत जाऊन कॉन्स्टेबल शिंगेच्या विरोधात तक्रार अर्ज दिला. पण पोलिसांनी त्या अर्जाची दखल घेतली नाही. या प्रकरणी तक्रार देऊनही गुन्हा दाखल करून घेतला नाही. त्यामुळे कांचन दोंडे यांनी दाद मागण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालय, पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर अशा सर्वांशी संपर्क केला. या सर्व नेत्यांनी पोलिसांकडे याबाबत विचारणा केली असता या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस आयुक्त
या प्रकारानंतर कांचन दोंडे यांनी शासकीय रुग्णालयात जाऊन वैद्यकीय तपासणी केली असता त्यांच्या उजव्या डोळ्याची नस मारहाणीमुळे दबली गेल्यानं त्यांच्या दृष्टीवर परिणाम झाल्याचं डॉक्ट्रांनी सांगितलं. त्यांच्या डोळ्यातून सतत पाणी वाहत आहे. संकटकाळी सामान्य नागरिक मदतीसाठी पोलिस चौकीत धाव घेतात. पण पोलिस चौकीतच आणि तेही पोलिसांकडूनच मारहाण होत असेल तर सामान्यांनी दाद कोणाकडे मागायची असा प्रश्न दोंडे यांनी उपस्थित केलाय.