एक्स्प्लोर

Pune Bypoll election :  शंकर जगतापांनी दाखल केला उमेदवारी अर्ज; म्हणाले मी...

दिवंगत आमदार लक्ष्मण यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांनी चिंचवड विधानसभा मतदार संघातून भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर लगेच शंकर जगतापांनी ही अर्ज दाखल केला.

Pune Bypoll election :  दिवंगत आमदार लक्ष्मण याच्या पत्नी अश्विनी जगताप (Ashwini jagtap)  यांनी चिंचवड विधानसभा मतदार संघातून भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर लगेच दिवंगत आमदार लक्ष्मण जगतापांचे लहान बंधू शंकर जगतापांनी  (Shankar Jagtap)  ही अर्ज दाखल केला. भाजपकडून खबरदारी म्हणून हा डमी अर्ज दाखल केलेला असू शकतो, असं बोललं जात आहे. 

भाजपच्या अधिकृत उमेदवार अश्विनी जगतापांचा अर्ज छाननीत बाद झाला तर ऐनवेळी कोणती अडचण निर्माण होऊ नये. म्हणून भाजपने हे पाऊल उचलले असू शकते. पण यानिमित्ताने शहरात वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. मात्र शंकर जगतापांनी खबदारी म्हणून अर्ज भरुन ठेवला आहे, असं स्पष्ट केलं आहे. 

ते म्हणाले की, आमदार लक्ष्मण जगताप उमेदवारी अर्ज भरत असतानादेखील मी खबरदारी म्हणून अर्ज भरत होतो.  अर्जाच्या छाननीच्या वेळी अनेक अर्ज नाकारले जाऊ शकतात. त्यामुळे लक्ष्मण जगताप असा डमी अर्ज भरुन ठेवायचे. आजदेखील मी खबरदारी म्हणूनच डमी अर्ज भरून ठेवला आहे. ऐन वेळी अनेक तांत्रिक अडचणी निर्माण होतात. त्यावेळी कोणतीही गफलत होऊ नये, यासाठी मी आज अर्ज भरला आहे. 

अधिकृत उमेदवार अश्विनी जगताप

अश्विनी जगताप आणि शंकर जगताप या दोघांनीही उमेदवारी अर्ज घेतले होते. त्यावेळी वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं होतं. क कुटुंबीयांबाबत तर्कवितर्क लढवले जात होते. मात्र पक्षाचा आदेश आम्हाला मान्य आहे आणि अश्विनी जगतापच भाजपच्या अधिकृत उमेदवार आहेत, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.  उमेदवारी अश्विनी जगताप यांना दिल्यावर शंकर जगताप आठ तास माध्यमांसमोर आले नव्हते त्यामुळे ते नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र त्यावर त्यांनी स्पष्टीकरण दिलं होतं. मी माझ्या कामासाठी बाहेर गेलो होतो, असं ते म्हणाले होते. त्यानंतर ते आज मोठ्या उत्साहाने अश्विनी जगताप यांच्यासोबत पदयात्रेत सहभागी झाले होते.

भाजपकडून मोठं शक्ती प्रदर्शन

आज अश्विनी जगताप मोठं शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल दाखल केला. यावेळी भाजपकडून मोठं शक्तीप्रदर्शन केलं. शेकडो भाजप कार्यकर्ते या पदयात्रेत सहभागी झाले होते. शिवाय लक्ष्मण जगतापांचे समर्थकदेखील मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. अश्विनी जगताप या बचतगटाचं कार्य करतात. त्यामुळे बचत गटाच्या महिलादेखील मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या. लेकीच्या वाढदिवशी अश्विनी जगतापांनी उमेदवारी अर्ज भरुन नव्या वाटचालीची सुरुवात केली .यावेळी बोलताना ऐश्वर्या म्हणाली की, वडिलांसाठी जशी मी लकी चार्म होते तशीच आईसाठीदेखील असेल. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Saif ali khan Attack: सैफ अली खानवर हल्ला करणारा सापडला, ठाण्यातील  लेबर कॅम्पला पोलिसांनी घेरलं, आरोपी मोहम्मद अलियानला अलगद जाळ्यात पकडलं
सैफ अली खानवर हल्ला करणारा सापडला, ठाण्यातील लेबर कॅम्पमध्ये सापळ रचून मोहम्मद अलियानच्या मुसक्या आवळल्या
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हातीABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Saif ali khan Attack: सैफ अली खानवर हल्ला करणारा सापडला, ठाण्यातील  लेबर कॅम्पला पोलिसांनी घेरलं, आरोपी मोहम्मद अलियानला अलगद जाळ्यात पकडलं
सैफ अली खानवर हल्ला करणारा सापडला, ठाण्यातील लेबर कॅम्पमध्ये सापळ रचून मोहम्मद अलियानच्या मुसक्या आवळल्या
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Embed widget