एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Pune By Election: लक्ष्मण जगताप मृत्युशी झुंज देत होते, तेव्हापासूनच भाजपने पोटनिवडणुकीची तयारी सुरू केली; सुनील शेळकेंचा खळबळजनक आरोप

Chinchwad By Election: चिंचवड विधानसभेच्या तयारीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची (NCP) सोमवारी पहिलीच बैठक दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांच्या बालेकिल्ल्यात पार पडली.

Maharashtra Chinchwad By Election: पिंपरी- चिंचवड: राष्ट्रवादी काँग्रेसचे (Nationalist Congress Party) मावळचे आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) यांनी भाजपवर (BJP) एक गंभीर आरोप केला आहे. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) मृत्युशी झुंज देत असल्यापासूनच भाजपने चिंचवडच्या पोटनिवडणुकीची (Chinchwad By Election) तयारी सुरू केली होती. शेळके यांच्या आरोपामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. 

चिंचवड विधानसभेच्या तयारीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची सोमवारी पहिलीच बैठक दिवंगत आमदार लक्ष्मण जगतापांच्या बालेकिल्ल्यात पार पडली. राष्ट्रवादीने सुनील शेळकेंवर चिंचवड विधानसभेची जबाबदारी टाकली असल्याने ते ही या बैठकीला हजर होते. या बैठकीनंतर सुनील शेळकेंनी हा गंभीर आरोप केलाय. दिवंगत आमदार लक्ष्मण जगतापांचे निधन 3 जानेवारीला झाले. मात्र भाजपने प्रत्यक्षात तीन महिने आधापासूनच चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीची तयारी सुरू केली होती. मग त्यांनाच संवेदनशीलता नसेल तर मग ही निवडणूक आम्ही बिनविरोध का करावी? असा प्रश्नही शेळकेंनी यावेळी उपस्थित केला. 

पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह भाजपने आवाहन केले आहे. परंतु या पोटनिवडणुकीवरून उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी पत्र लिहिणार असल्याचे म्हटले होते. त्यांच्या भूमिकेनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी देखील त्यांची भूमिका स्पष्ट केली. कोल्हापूर उत्तर आणि पंढरपूरमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीची उदाहरणे देत पुण्यातील दोन्ही पोटनिवडणूक महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) लढवणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. 

पाहा व्हिडीओ : Sunil Shelke : राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळचे आमदार सुनील शेळके यांचा भाजपवर गंभीर आरोप

दरम्यान, भाजपकडून अद्याप उमेदवारी कोणाला द्यायची याबाबत शिक्कामोर्तब करण्यात आलेलं नाही. भाजपकडून जवळपास दहा नावे केंद्रीय निवडणूक समितीला देण्यात आली आहेत. चिंचवडमध्ये भाजपकडून लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप (Ashwin Jagtap) किंवा बंधू शंकर जगताप (Shankar Jagtap) यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता असल्याचं सांगितलं जात आहे. राहुल कलाटे देखील या पोटनिवडणुकीची तयारी करत आहेत. परंतु, याबाबत अद्याप अधिकृतरित्या कोणाचेच नाव जाहीर करण्यात आलेले नाही.   

लक्ष्मण जगतापांच्या पत्नी  किंवा भावाला भाजपकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता

चिंचवड विधानसभा मतदारसंघातून दिवंगत लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप किंवा भाऊ शंकर जगताप यांना भाजपकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. अश्विनी जगताप यांना उमेदवारी मिळाल्यास ही निवडणूक बिनविरोध होऊ शकते, तर शंकर जगताप यांन उमेदवारी मिळाल्यास मागील वेळी लक्ष्मण जगताप यांच विरोधात अपक्ष निवडणूक लढवणारे नाना काटे पुन्हा निवडणूक लढवू शकतात. लक्ष्मण जगताप यांचे अजित पवार यांच्याशी नजीकचे संबंध राहिलेत. त्यामुळे अश्विनी जगताप यांनी निवडणूक लढवल्यास राष्ट्रवादीकडून निवडणूक बिनविरोध करण्यास प्राधान्य मिळू शकते. शंकर जगताप यांच्या विरोधात मात्र राष्ट्रवादी, शिवसेनेचे दोन्ही गट आणि कॉंग्रेस एकवटू शकते.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde on CM: एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपदाबाबत मोठ्ठं विधान, म्हणाले, 'आमचं काहीच ठरलं नव्हतं'
एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपदाबाबत मोठ्ठं विधान, म्हणाले, 'आमचं काहीच ठरलं नव्हतं'
Maharashtra vidhansabha results 2024 : परळीत धनुभाऊंचीच हवा, बीड जिल्ह्यातील सर्वात मोठा विजय ; तुतारीचा करिश्मा चालला नाही
परळीत धनुभाऊंचीच हवा, बीड जिल्ह्यातील सर्वात मोठा विजय ; तुतारीचा करिश्मा चालला नाही
Maharashtra Assembly Election Result : मुहायुतीची बुलेट ट्रेन सुस्साट, महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड, नियम काय सांगतो?
मुहायुतीची बुलेट ट्रेन सुस्साट, महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड, नियम काय सांगतो?
Eknath Shinde : हा विजय लाडक्या बहिणींचे प्रेम, आमच्या कामाची पोचपावती; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
हा विजय लाडक्या बहिणींचे प्रेम, आमच्या कामाची पोचपावती; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raju Waghamare on CM : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा मुख्यमंत्रिपदावर दावा #electionresults2024Maharashtra Election Result 2024 :निवडणुकीत कोणते मुद्दे चर्चेत राहिले?Uday Tanpathakयांचं विश्लेषणMaharashtra Election Result 2024:सत्तेचा मार्ग विदर्भातून?जनता ठरवणार खरी शिवसेना, राष्ट्रवादी कोणतीMaharashtra Election Result 2024 : पहिला कल भाजपच्या बाजूने, टपाली मतमोजणी सुरू

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde on CM: एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपदाबाबत मोठ्ठं विधान, म्हणाले, 'आमचं काहीच ठरलं नव्हतं'
एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपदाबाबत मोठ्ठं विधान, म्हणाले, 'आमचं काहीच ठरलं नव्हतं'
Maharashtra vidhansabha results 2024 : परळीत धनुभाऊंचीच हवा, बीड जिल्ह्यातील सर्वात मोठा विजय ; तुतारीचा करिश्मा चालला नाही
परळीत धनुभाऊंचीच हवा, बीड जिल्ह्यातील सर्वात मोठा विजय ; तुतारीचा करिश्मा चालला नाही
Maharashtra Assembly Election Result : मुहायुतीची बुलेट ट्रेन सुस्साट, महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड, नियम काय सांगतो?
मुहायुतीची बुलेट ट्रेन सुस्साट, महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड, नियम काय सांगतो?
Eknath Shinde : हा विजय लाडक्या बहिणींचे प्रेम, आमच्या कामाची पोचपावती; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
हा विजय लाडक्या बहिणींचे प्रेम, आमच्या कामाची पोचपावती; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
Vidhan Sabha Election Results 2024 : महाराष्ट्राचे नवे आमदार, सर्व विजयी उमेदवारांची यादी, पाहा
महाराष्ट्राचे नवे आमदार, सर्व विजयी उमेदवारांची यादी, पाहा
Maharashtra vidhansabha Results 2024 देवाभाऊंचं यश पाहून सख्खा भाऊ पहिल्यांदाच टीव्हीवर; आशिष फडणवीस मुख्यमंत्रीपदाबाबत स्पष्टच म्हणाले....
देवाभाऊंचं यश पाहून सख्खा भाऊ पहिल्यांदाच टीव्हीवर; आशिष फडणवीस मुख्यमंत्रीपदाबाबत स्पष्टच म्हणाले....
Mahad Assembly Election results : ठाकरेंच्या पहिल्या उमेदवाराकडून पराभव मान्य, भरतशेठ गोगावलेंचा विजय जवळपास निश्चित
ठाकरेंच्या पहिल्या उमेदवाराकडून पराभव मान्य, भरतशेठ गोगावलेंचा विजय जवळपास निश्चित
Eknath Shinde vs Uddhav Thackeray: अबतक 56! खरी शिवसेना कोणाची, फैसला झाला? ठाकरेंना धक्का, एकनाथ शिंदेंना घवघवीत यश
अबतक 56! खरी शिवसेना कोणाची, फैसला झाला? ठाकरेंना धक्का, एकनाथ शिंदेंना घवघवीत यश
Embed widget