एक्स्प्लोर

डी. एस. कुलकर्णींना दिल्लीत अटक

मुंबई हायकोर्टाने वारंवार सूट देऊनही 50 कोटी जमा करु न शकलेल्या डीएसकेंना अटकेपासून दिलेलं संरक्षण हायकोर्टाने काढून घेतलं होतं.

पुणे : प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना दिल्लीतून अटक करण्यात आली आहे. पहाटे पाच वाजता पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं डीएसकेंना राजधानीत बेड्या ठोकल्या. डीएसकेंना आज पुण्यातील न्यायालयात हजर करण्यात येणार असून कोठडीची मागणी केली जाणार आहे. डीएस कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी हेमंती हे दिल्लीतील डीएमआर सिएट या हॉटेलमध्ये होते. पहाटे पोलिसांनी मोबाईल कॉल रेकोर्डच्या आधारे त्यांचा माग काढला आणि त्यांना अटक केली. आपण कुठेही पळून जाणार नाही, असा दावा डीएस कुलकर्णी करत होते. परंतु शुक्रवार सकाळपासूनच ते कुठे आहेत, हा प्रश्न निर्माण झाला होता. मुंबई हायकोर्टाने वारंवार सूट देऊनही 50 कोटी जमा करु न शकलेल्या डीएसकेंना अटकेपासून दिलेलं संरक्षण हायकोर्टाने काढून घेतलं होतं. हायकोर्टात काय झालं? डीएसकेंनी हायकोर्टाची फसवणूक केल्याचं स्पष्ट झालं, अशा शब्दात हायकोर्टाने संताप व्यक्त केला होता. डीएसकेंबाबत अंतिम निर्णय जरी 22 फेब्रुवारीला होणार असेल, तरी डीएसकेंना अटकेपासून दिलेलं संरक्षण आम्ही दूर करतो, असं हायकोर्टाने शुक्रवारी स्पष्ट केलं होतं. डीएसकेंचे पासपोर्ट जमा करा अशा सूचना सर्व विमानतळांना तातडीनं देण्याचे आदेश हायकोर्टाने दिले होते. डीएसकेंनी आपला पासपोर्ट तपास यंत्रणांकडे जमा केल्याची माहिती कोर्टाला देण्यात आली. त्यावर, कशावरुन डीएसकेंकडे एकच पासपोर्ट असेल? असा सवाल कोर्टाने उपस्थित केला. डीएसके हायकोर्टात हजर होते, तेव्हाच आम्ही जामीन अर्ज रद्द केला असता, पण तेव्हाही आशेचा एक किरण होता, असं हायकोर्टाने सांगितलं. तुमच्याकडे लोकांचाच पैसा आहे, हे ध्यानात ठेवण्यासही हायकोर्टाने बजावलं. त्याचप्रमाणे कागदपत्रांची पूर्ण छाननी न करताच तुम्ही कर्ज द्यायला कसे तयार झालात, अशा शब्दात बुलडाणा अर्बन कॉ-ऑपरेटिव्ह सोसायटीला हायकोर्टाने समज दिली. गुंतवणूकदारांचा कोर्टावरील विश्वास उडत चालला आहे. देशात दररोज 10 -12 हजार कोटींचे नवनवे घोटाळे उघड होत आहेत. 12 कोटींचा डीडी डीएसकेंना कोणत्या आधारे दिला होता, असा सवालही हायकोर्टाने विचारला. डीएसकेंना आता एकही संधी देण्याची इच्छा नाही, मात्र गुंतवणूकदारांबद्दल वाईट वाटत आहे. डीएसकेंच्या खात्यात परदेशातून एकही पैसा येणार नाही, असं तपासयंत्रणांनी सांगितलं होतं, तरीही तुम्हाला संधी दिली, असंही हायकोर्ट म्हणालं. "लोकांचा माझ्यावर विश्वास आहे" असं कुठल्या तोंडानं तुम्ही माध्यमांत जाऊन सांगता? आम्ही तुमच्या मुलाखती पाहिल्या आहेत, असं हायकोर्टानं डीएसकेंना सुनावलं. मालमत्ता जरी बँकेच्या ताब्यात असली तरी विकण्याची मुभा असते, विकत घेणाऱ्याला याची पूर्वकल्पना दिल्यास चिंतेचं काही कारण नसावं, असा दावा डीएसकेंच्या वतीने करण्यात आला. काय आहे नेमकं प्रकरण? गेल्या काही दिवसांपासून बांधकाम उद्योगाला मंदी आली आहे. यामुळे गुंतवणूकदार गोत्यात आले आहेत. यामुळेच पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक डी एस कुलकर्णी अर्थात डीएसके आर्थिक दृष्ट्या अडचणीत आले आहेत. मध्यमवर्गीयांना त्यांच्या स्वप्नातील घरं मिळवून देणारा बिल्डर म्हणून डीएसकेंनी स्वतःची ओळख निर्माण केली होती. पण आता गुंतवणूकदारांची अडचण झाली आहे. डीएसकेंकडे गुंतवलेले पैसे परत मिळत नसल्यानं लोक त्यांच्या कार्यालयांमध्ये चकरा मारत आहेत. 2014 पासून अनेकांनी घर बूक केलं आहे. मात्र अद्यापही त्यांना ताबा मिळालेला नाही. 2014 पर्यंत डीएसकेंचा गाडा सुरळीत होता. पण जेव्हा त्यांनी ड्रीम सिटी प्रोजेक्ट हाती घेतला. तेव्हापासून गाडी रुळावरुन घसरली. स्वप्नवत वाटणाऱ्या या ड्रीम सिटीत काय नव्हतं, कृत्रिम नद्या, त्यातून सर्व शहराला जोडणारी जलवाहतूक. कल्पनेच्या पलिकडचं विश्व साकारण्याची डीएसकेंची इच्छा होती. या प्रोजेक्टसाठी त्यांनी पुणे-सोलापूर रस्त्यालगत तीनशे एकर जागा निवडली. 19 डिसेंबर 2014 ला या योजनेचा थाटात शुभारंभ केला. सर्व सुखसोयींनी संपन्न असणाऱ्या वनबीएचके फ्लॅटची किंमत तब्बल 70 लाखांपेक्षा जास्त होती. स्वप्नवत वाटणाऱ्या हा प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी डीएसकेंनी आपली सारी आर्थिक ताकद पणाला लावली. इतर व्यवसायातून येणारी सर्व आर्थिक रसद त्यांनी ड्रीम सिटीकडे वळवली. शेअर बाजारातूनही पैसा उभा केला. मात्र या प्रोजेक्टसाठी जमीन खरेदी करताना डीएसकेंनी पत्नी आणि नातेवाईकांना कोट्यवधी रुपयांचा फायदा पोहोचवल्याचा आरोप होतो आहे. अशाप्रकारे डीएसकेंनी लोकांच्या पैशांचा गैरवापर केल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केला आहे. लोकांकडून आणखी पैसे कर्जरुपात घेण्यासाठी डीएसकेंनी आकर्षक योजनांची सुरुवात केली. ठेवींवर 12 टक्के व्याज देण्याचं आश्वासन दिलं. परिणामी हजारो लोकांनी लाखो रुपये डीएसकेंकडे गुंतवले. सुरुवातीला काही महिने लोकांना व्याज मिळालं. पण आर्थिक चणचण जाणू लागल्यानंतर लोकांना पैसे परत करणं डीएसकेंसाठी कठीण होत गेलं. मग ठेवीदार डीएसकेंच्या कार्यालयात फेऱ्या मारु लागले. त्यातून मार्ग काढण्यासाठी डीएसकेंनी इतर व्यवसायातील पैसा बांधकाम व्यवसायाकडे वळवला. मात्र, त्यामुळे परिस्थिती सुधारण्याऐवजी आणखी बिकट बनली डीएसकेंच्या वीसहून अधिक कंपन्यांमध्ये हजारो कर्मचारी काम करतात. मात्र गेल्या कित्येक महिन्यांपासून त्यांचे पगारही थकले आहेत. स्वतः डीएसके आणि त्यांच्या पत्नी ही परिस्थिती मान्य करतात. मात्र सगळं खापर नशिबावर फोडतात. आर्थिक मंदी आणि नोटबंदीमुळे अनेक उद्योगांचं कंबरडं मोडलं आहे. आपणही त्यामुळेच अडचणीत आल्याचा दावा डीएसके करत आहेत.

संबंधित बातम्या :

डीएसकेंनी फसवलं, अटकेपासून संरक्षण नाही : हायकोर्ट

डीएसकेंचा बनाव उघड, जामीन अर्जावर तातडीची सुनावणी

डीएसकेंना तूर्तास दिलासा, बुलडाणा अर्बन बँक मदतीला धावली!

डीएसकेंकडून 12 कोटींच्या संपत्तीची कागदपत्रे लिलावासाठी कोर्टात सादर

"डीएसके, पैसे उसने घ्या किंवा भीक मागा, पण रिकामे येऊ नका

कोठडीत पाठवायला एक क्षण पुरे, हायकोर्टाची डीएसकेंना तंबी

कोणाला फसवायला मी काही विजय मल्ल्या नाही : डी एस कुलकर्णी

राज ठाकरे डीएसकेंच्या पाठीशी!

बँकांकडून डीएसकेंच्या मालमत्ता जप्तीला सुरुवात

डीएसकेंचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टानं फेटाळला

शून्यातून विश्व निर्माण करणारे डीएसके अडचणीत, माझाचा विशेष रिपोर्ट

शून्यातून विश्व निर्माण करणारे डीएसके अडचणीत, माझाचा विशेष रिपोर्ट

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Teacher Recruitment: राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती, मात्र भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; आठवडाभर मुदत वाढवा, उमेदवारांची मागणी
राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती, मात्र भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; आठवडाभर मुदत वाढवा, उमेदवारांची मागणी
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
सत्तेत असूनही सरकार ऐकत नसेल तर ही सत्ता काय कामाची? राष्ट्रवादीच्या माझ्या आमदाराचा स्वपक्षाला घरचा आहेर
सत्तेत असूनही सरकार ऐकत नसेल तर ही सत्ता काय कामाची? राष्ट्रवादीच्या माझ्या आमदाराचा स्वपक्षाला घरचा आहेर
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Teacher Recruitment: राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती, मात्र भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; आठवडाभर मुदत वाढवा, उमेदवारांची मागणी
राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती, मात्र भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; आठवडाभर मुदत वाढवा, उमेदवारांची मागणी
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
Embed widget