एक्स्प्लोर
सुलतान सलमान, बादशाह शाहरुख, पुण्यात बॉलिवूड फटाके
पुणे : दिवाळी म्हटलं की लहान मुलं फटाके उडवून आनंद साजरा करतात. याच फटाक्यांवर पूर्वी देवदेवतांचे फोटो असायचे, मात्र काळाच्या ओघात बॉलीवूड हिरो-हिरोईनचे फोटो यावर अवतरले. मात्र आता थेट हॉलिवूडची क्रेझ यंदाच्या दिवाळीला पाहायला मिळत आहे.
दिवाळी आली की लहान मुलांना आई-वडील फटाके खरेदी करुन देतात. काही वेळा कमी आवाजाचे तर काही वेळेला नुसत्याच रोषणाईचे फटाके उडवून दिवाळी साजरी केली जाते. पूर्वी अशाच वेगवेगळ्या फटाक्यांवर देवदेवतांचे फोटो असायचे. मात्र देवतांच्या फोटोवरुन भावनिक मुद्दा तयार होऊन ते फोटो फटाक्यावरुन गायब झाले.
काही काळाने विविध प्रसिद्ध कार्टून या फटाक्यांवर दिसू लागली. आता तोही ट्रेंड गेला आणि बॉलिवूडचे हिरो हिरोईन या फटाक्यांवर अवतरले. सुलतान सलमान खान, बादशाह शाहरुख खान, ऐश्वर्या राय, कतरीना कैफ यांचे फटाके बाजारात आले आहेत.
यापुढे जाऊन आता हॉलिवूडची क्रेझ या फटाक्यांच्या निमित्ताने पाहायला मिळत आहे. जेम्स बॉण्ड, हॅरी पॉटर तसेच फॉरेनर मॉडेलचे फोटो वापरुन फटाके निर्माते आपले प्रॉडक्ट बाजारात दाखल करत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement