एक्स्प्लोर

Pune Bhondu Baba: ही शेवटची पूजा म्हणत दगड, सुपारी, नारळ घरात ठेवायला सांगितलं; सगळं पुरवूनही मुली बऱ्या होईनात, पुण्यातील उच्चशिक्षित दाम्पत्याची आपबिती

Pune Bhondu Baba: त्या दाम्पत्याने परदेशातील घर, शेती, दागदागिने आणि संपत्ती विकून मिळालेल्या रकमेपैकी अंदाजे १४ कोटी रुपये वेदिका आणि तिच्या सहकाऱ्यांना दिले.

पुणे : पुण्यातील एका घटनेनं सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे, एका भोंदूबाबाला (Pune Bhondu Baba) भाळून आपल्या मुलींना बरं करतो असं सांगून शिक्षित नवरा बायकोची आयुष्यभराची कमाई लुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 'शंकर महाराज अंगात येतात' असा दावा करून दाम्पत्याची (Pune Bhondu Baba) तब्बल १४ कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचं समोर आलं आहे. या दाम्पत्याने मुलींच्या आजारपणावर उपाय होईल, या आशेने आपली सर्व संपत्ती, घर, शेती आणि परदेशातील मालमत्ता विकून, ते सर्व पैसे या फसवणूक करणाऱ्याला दिले.(Pune Bhondu Baba) 

Pune Bhondu Baba: मुलींच्या आजाराचे दोष दूर करण्यासाठी सर्व रक्कम माझ्याकडे द्या

पुण्यातील हे पीडित दाम्पत्य खासगी कंपनीत काम करणारे असून त्यांना दोन मुली आहेत. त्यातील एका मुलीला अलोपेशिया नावाचा आजार असल्याने तिचे केस कमी प्रमाणात येतात. या दाम्पत्याला भजन आणि धार्मिक कार्यक्रमांची आवड असल्याने ते वेळोवेळी अशा कार्यक्रमांमध्ये जात होते, त्यामध्ये सहभागी होत होते. अशाच एका कार्यक्रमात त्यांची ओळख दीपक जनार्दन खडके या व्यक्तीसोबत झाली. खडके यांनी त्यांची ओळख वेदिका कुणाल पंढरपूरकर आणि कुणाल पंढरपूरकर यांच्याशी करून दिली. वेदिका ही 'शंकर बाबांची लेक' असून तिच्या अंगात शंकर बाबा येतात, असे या पीडित दाम्पत्याला सांगण्यात आलं. ती सर्व समस्या सोडवेल, मुलींचे आजार बरे करेल, अशी खात्री या दाम्पत्याला दिली. यानंतर एका दरबारात वेदिकाने अंगात 'शंकर बाबा' आल्याचे भासवले. त्या दाम्पत्याला मुलींच्या आजाराचे दोष दूर करण्यासाठी सर्व रक्कम माझ्याकडे द्या, असे सांगितले. वेदिका पंढरपूरकरने त्यांना सांगितले की, घर आणि शेती विका, पैसे जमा करा, मुलींचा आजार बरा होईल. त्यामुळे त्या दाम्पत्याने परदेशातील घर, शेती, दागदागिने आणि संपत्ती विकून मिळालेल्या रकमेपैकी अंदाजे १४ कोटी रुपये वेदिका आणि तिच्या सहकाऱ्यांना दिले. घरात दोष असल्याचं सांगत राहत्या घरावरतीही त्यांना कर्ज काढायला भाग पाडलं. 

Pune Bhondu Baba: ही शेवटची पूजा आहे

दाम्पत्याची जवळपास तीन वर्षे फसवणूक सुरू होती. वेदिका पंढरपूरकरने त्यांना घरात सुपारी, नारळ, दगड यांसारख्या वस्तू ठेवायला सांगून ही शेवटची पूजा आहे, असे सांगत फसवणूक सुरूच ठेवली. मात्र, तीन वर्षे उलटूनही मुलींची तब्येत बरी झाली नाही. अखेर दाम्पत्याला हे सर्व फसवणूक झाल्याचे लक्षात आले आणि त्यांनी थेट पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे तक्रार दिली. दाम्पत्याने दिलेल्या तक्रारीत म्हटले की, खोटी माहिती देऊन, 'शंकर बाबा' अंगात येतात असा भास करून आमचा विश्वास संपादन केला. आमच्या मालमत्ता विकायला लावून, रक्कम त्यांच्या खात्यात जमा करण्यास सांगून १३ ते १४ कोटी रुपयांची फसवणूक केली. पुणे पोलिसांनी प्राथमिक चौकशी सुरू केली असून, आरोपींचा शोध सुरू आहे.

Pune Bhondu Baba: मुलींवर उपचार करण्यासाठी देखील त्यांचाकडे पैसे उरलेले नाहीत

पोटच्या दोन पोरी बऱ्या व्हाव्यात यासाठी मांत्रिक महिलेवर विश्वास ठेवणाऱ्या पुण्यातील डोळस दांपत्यावर आयुष्यभराची कमाई गमावण्याची वेळ आली आहे. आयटी इंजिनियर असलेले दीपक डोळस आणि त्यांच्या पत्नी अंजली डोळस हे वेदिका पंढरपूरकर या महिला मांत्रिकाच्या नादी लागून आपलं सर्वस्व गमावून बसले आहेत. आश्चर्य म्हणजे आयटी इंजिनियर असलेले आणि बारा वर्ष इंग्लंडमध्ये वास्तव्य केलेले दीपक डोळस दीपक डोळस या अंधश्रद्धेला बळी पडलेत. आपल्या अंगात शंकर महाराज संचारतात आणि त्यांच्या आशीर्वादाने आपण डोळस दांपत्याच्या दोन मुलींना असलेले जन्मजात आजारपण बरे करू असं सांगत त्यांना १४ कोटींना गंडा घातलाय. त्यासाठी दीपक डोळस यांना एक एक करत त्यांच्या सगळ्या मालमत्ता ज्यामध्ये इंगलंडमधील त्यांच्या घराचा देखील समावेश आहे, या मांत्रिक महिलेने विकायल्या लावल्या. त्यातून मिळालेले पैसे वेदिका पंढरपूरकरने स्वतःच्या खात्यावर वळते करून घेतले. त्या पैशातून वेदिका पंढरपूरकरने कोथरूडच्या महात्मा सोसायटीत आलिशान बंगला खरेदी केला आहे. तर डोळस दांपत्यावर भाड्याच्या घरात राहण्याची वेळ आली आहे. मुलींवर उपचार करण्यासाठी देखील त्यांचाकडे पैसे उरलेले नाहीत. माऊली म्हणून ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनी असा विश्वासघात केल्याचं पाहून डोळस दांपत्याच्या डोळ्यात अश्रू उभे राहतायत.  

Pune Bhondu Baba: या दांपत्याची एका भजनी मंडळाच्या माध्यमातून भोंदू बाबासोबत भेट

इंग्लंडमधील आयटी कंपनीत उच्च पदावर काम करणाऱ्या दीपक डोळस आणि त्यांच्या पत्नी अंजली यांनी  २०१८ मध्ये आपल्या दोन दिव्यांग मुलींचं व्यवस्थित संगोपन करण्याच्या उद्देशाने भारतात परतण्याचा निर्णय घेतला. पुण्यातील कोथरूड भागात वास्तव्य असलेल्या या दांपत्याची एका भजनी मंडळाच्या माध्यमातून राजेंद्र खडके या भोंदू बाबासोबत भेट झाली. या बाबाने वेदिका पंढरपूरकर या त्याच्या शिष्येच्या अंगात शांकर महाराज संचारतात असं सांगून शंकर महाराज तुमच्या मुलींचे आजार बरे करतील असं आश्वासन दिलं. मात्र त्यासाठी तुमच्या बँक अकाउंटमधील सगळे पैसे तुम्हाला वेदिका आणि तिचा नवरा कुणाल याच्या बँक अकाउंटमध्ये पाठवावे लागतील असं सांगितलं. वेदिका पंढरपूरकर यांच्यावर विश्वास ठेऊन आधी डोळस यांच्या खात्यांमधील रक्कम, एलआयसी आणि वेगवगेळ्या योजनांमधील ठेवी, म्युचअल फंडमधील रक्कम, प्रॉव्हिडंट फंडमधील पैसे वेदिका पंढरपूरकर यांच्या खात्यावर वळते करण्यात आले. त्यानंतर डोळस यांचं इंगलंडमधील घर आणि फार्म हाऊस विकून ते पैसे वेदिका यांनी स्वतःच्या ताब्यात घेतले. त्यानंतर दीपक डोळस यांचे पुण्यातील दोन्ही फ्लॅट, गावाकडील घर आणि शेतजमीन विकून ते पैसे वेदिका यांनी ताब्यात घेतले. त्यानंतर डोळस यांना त्यांच्या शेवटच्या राहत्या घरावर लोन घ्यायला लावलं आणि ते पैसे देखील वेदिका यांनी ताब्यात घेतले. आज डोळस दांपत्याला आपल्या दोन मुलींसह अक्षरश भाड्याच्या घरात राहण्याची वेळ आली आहे.         

Pune Bhondu Baba: आधी भाड्याचं घर नंतर कोथरूडच्या महात्मा सोसायटीत आलिशान बंगला

दीपक डोळस यांनी आरटीजीएसच्या माध्यमातून हे पैसे वेदिका पंढरपूरकर यांच्या खात्यावर जमा केलेत. त्याचे सगळे पुरावे त्यांच्याकडे आहेत. पोलिसांकडे त्यांनी फसवणुकीची तक्रार दाखल केली असून वकिलांमार्फत त्यांनी कारवाईची मागणी केली आहे. डोळस यांची भेट होण्याआधी वेदिका आणि तिचा पती कुणाल हे एका भाड्याच्या घरात राहत होते. मात्र डोळस यांच्या पैश्यातून त्यांनी कोथरूडच्या महात्मा सोसायटीत आलिशान बंगला खरेदी केला आहे. एबीपी माझाच्या टीमने या बंगल्यात जाऊन वेदिका यांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी बोलण्यास नकार दिला आहे. 

Pune Bhondu Baba:  ज्यांना माउली म्हटलं त्यांनीच घात केला

इतके शिकले - सावरलेले असताना डोळस अंधश्रद्धेला बळी कसे पडले असं विचारलं असता मुलींवरील प्रेमापोटी आपण मांत्रिक महिलेवर विश्वास ठेवत गेलो, ज्यांना माउली म्हटलं त्यांनीच घात केला असं त्यांचं म्हणणंय. आपल्या  दोन्ही मुलींच्या उपचारांचा खर्च उचलण्यासाठी वेदिका पंढरपूरकर यांनी लुबाडलेले पैसे आपणाला परत मिळावेत अशी मागणी डोळस यांनी पोलिसांकडे अर्ज करून केलीय. डोळस यांच्या तक्रारीनंतर वेदिका पंढरपूरकर यांच्या भूलथापांना बळी पडलेले इतरही भक्तगण समोर येण्याची शक्यता आहे. त्यामुळं पुणे पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची गरज आहे. 

एखादी व्यक्ती साक्षर झाली म्हणजे ती सुशिक्षित होते का? परदेशात राहिली म्हणजे ती व्यक्ती वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगते का? दीपक डोळस यांच्याकडे पाहिल्यानंतर या प्रश्नांच उत्तरं दुर्दैवाने नाही असं आहे. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील फरक जर ओळखता नाही आला तर आयुष्य कसं उध्वस्त होतं हे डोळस कुटुंबाकडे पाहून लक्षात येतंय. पोटच्या पोरी बऱ्या होतील या आशेवर जगणाऱ्या डोळस दांपत्याकडून या चुका झाल्यात त्यांचा त्यांना अतिशय पश्चाताप होतोय. त्यामुळं आता पोलिसांनी त्यांची जबाबदारी पार पाडत मांत्रिक महिलेने लुबाडलेले त्यांचे पैसे वसूल करण्यासाठी कारवाई करण्याची गरज आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime News: 'रस्ता तुझ्या बापाचा आहे का?', एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण, वाहकालाही धक्काबुक्की; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
'रस्ता तुझ्या बापाचा आहे का?', एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण, वाहकालाही धक्काबुक्की; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
बाप रे... पुण्यातून मुंबईला जाणे लंडन, थायलंडपेक्षाही महाग; विमान प्रवासाचे दर गगनाला भिडले, 61 हजार
बाप रे... पुण्यातून मुंबईला जाणे लंडन, थायलंडपेक्षाही महाग; विमान प्रवासाचे दर गगनाला भिडले, 61 हजार
Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यात टीईटी सक्तीविरोधात गुरुजी एकवटले, पण पदवीधर, शिक्षक आमदारकीचा वास लागला!
कोल्हापूर जिल्ह्यात टीईटी सक्तीविरोधात गुरुजी एकवटले, पण पदवीधर, शिक्षक आमदारकीचा वास लागला!
बँकेच्या लॉकरमधून शिवसेना नेत्याची रिव्हॉल्वर अन् दागिने गायब; माजी आमदाराची पोलिसांत धाव, बँकेकडून मिळेना प्रतिसाद
बँकेच्या लॉकरमधून शिवसेना नेत्याची रिव्हॉल्वर अन् दागिने गायब; माजी आमदाराची पोलिसांत धाव, बँकेकडून मिळेना प्रतिसाद
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Amol Kolhe Lok Sabha : अमोल कोल्हे यांच्या प्रश्नाला केंद्रीय जलशक्ती मंत्र्‍यांचं मराठीतून उत्तर
Pune Pashan Leopard News : पुण्यातील पाषाण - सुतारवाडी भागात बिबट्याचा संचार, नागरिकांमध्ये भीती
Election Politics : राजकराण बेभान, राडेबाजीला उधाण; मतदान झालं, गोंधळ सुरूच..Special Report
Wedding Fight : लग्नाचा मंडप की कुस्तीचा फड? अजब लग्नांच्या गजब कहाण्या Special Report
Godwoman Defrauded : माझाची काठी, वसूल 14 कोटी, माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime News: 'रस्ता तुझ्या बापाचा आहे का?', एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण, वाहकालाही धक्काबुक्की; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
'रस्ता तुझ्या बापाचा आहे का?', एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण, वाहकालाही धक्काबुक्की; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
बाप रे... पुण्यातून मुंबईला जाणे लंडन, थायलंडपेक्षाही महाग; विमान प्रवासाचे दर गगनाला भिडले, 61 हजार
बाप रे... पुण्यातून मुंबईला जाणे लंडन, थायलंडपेक्षाही महाग; विमान प्रवासाचे दर गगनाला भिडले, 61 हजार
Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यात टीईटी सक्तीविरोधात गुरुजी एकवटले, पण पदवीधर, शिक्षक आमदारकीचा वास लागला!
कोल्हापूर जिल्ह्यात टीईटी सक्तीविरोधात गुरुजी एकवटले, पण पदवीधर, शिक्षक आमदारकीचा वास लागला!
बँकेच्या लॉकरमधून शिवसेना नेत्याची रिव्हॉल्वर अन् दागिने गायब; माजी आमदाराची पोलिसांत धाव, बँकेकडून मिळेना प्रतिसाद
बँकेच्या लॉकरमधून शिवसेना नेत्याची रिव्हॉल्वर अन् दागिने गायब; माजी आमदाराची पोलिसांत धाव, बँकेकडून मिळेना प्रतिसाद
मोहम्मद शमी कुठाय? रोहित कोहलीवरूनही, गौतम गंभीर, अजित आगरकरांवर आगपाखड! गोलंदाजांची धुलाई पाहून कोणाच्या संतापाचा उद्रेक झाला?
मोहम्मद शमी कुठाय? रोहित कोहलीवरूनही, गौतम गंभीर, अजित आगरकरांवर आगपाखड! गोलंदाजांची धुलाई पाहून कोणाच्या संतापाचा उद्रेक झाला?
प्रवाशांचे हाल, दिल्ली विमानतळावरुन रात्री 11.59 वाजेपर्यंतचे उड्डाण रद्द; इंडिगोचा माफीनामा, पॅसेंजरला आवाहन
प्रवाशांचे हाल, दिल्ली विमानतळावरुन रात्री 11.59 वाजेपर्यंतचे उड्डाण रद्द; इंडिगोचा माफीनामा, पॅसेंजरला आवाहन
'माझी बायको पूनमला सुद्धा पाण्यात बुडवून तडफडून ठार मारली पाहिजे' पोटच्या शुभमसह चार निष्पाप लेकरांना बुडवून मारणाऱ्या क्रुर बायकोचा चेहरा समोर येताच नवरा हादरला
'माझी बायको पूनमला सुद्धा पाण्यात बुडवून तडफडून ठार मारली पाहिजे' पोटच्या शुभमसह चार निष्पाप लेकरांना बुडवून मारणाऱ्या क्रुर बायकोचा चेहरा समोर येताच नवरा हादरला
लोकशाही संपली.. निवडणूक आयोग झोकांड्या खातोय का? उत्तम जानकरांचा सवाल, जयकुमार गोरेंना आर्चीचा उपमा
लोकशाही संपली.. निवडणूक आयोग झोकांड्या खातोय का? उत्तम जानकरांचा सवाल, जयकुमार गोरेंना आर्चीचा उपमा
Embed widget