एक्स्प्लोर
आईच्या अंगातील भूत काढण्यासाठी मुलीकडे शरीरसंबंधांची मागणी
आईच्या अंगातील भूत काढण्यासाठी तिच्या 23 वर्षीय मुलीला देवासोबत लग्न करावं लागेल, असं सांगून भोंदूबाबाने तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली
पुणे : महिलेच्या अंगातील भूत काढण्याच्या बहाण्याने तिच्याच मुलीकडे भोंदूबाबाने शरीरसंबंधांची मागणी केली. राजू अप्पा साळवे या भोंदूबाबाला पुण्यातील खडक पोलिसांनी गजाआड केलं.
या प्रकरणी जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
42 वर्षीय आरोपी राजू साळवे हा इलेक्ट्रिशियन म्हणून कामं करतो. संबंधित महिलेच्या घरी लाईटींगचे काम करण्यासाठी गेला असताना ती आजारी असल्याचं राजूच्या लक्षात आलं. तुमच्या आईला भूताने झपाटलं आहे, असं त्याने महिलेचा मुलगा आणि मुलीला सांगितलं.
आईच्या अंगातील भूत काढण्यासाठी तिच्या 23 वर्षीय मुलीला देवासोबत लग्न करावं लागेल, असं त्याने सांगितलं. त्यानंतर भूत आईच्या अंगातून मुलीच्या अंगात प्रवेश करेल आणि नंतर निघून जाईल अशी बतावणी त्याने केली. आईची आजारातून सुटका होणार असल्यामुळे मुलांनीही याला होकार दर्शवला.
आरोपीने एके दिवशी संबंधित कुटुंबाला रिक्षाने वाईतील मांढरदेवीच्या मंदिरात नेलं. तिथे गेल्यानंतर मुलीला हिरवी साडी नेसण्यास प्रवृत्त केलं आणि तिच्या गळ्यात मंगळसूत्र घालून तिच्याशी विवाह केला. इतक्यावरच न थांबता त्याने पीडित मुलीला आपला विवाह झाल्याचं कागदावर लिहिण्यास भाग पाडलं आणि ती चिठ्ठी स्वत:जवळ ठेऊन तिच्याकडे शारीरिक सुखाची मागणी केली.
या सर्व प्रकारानंतर पीडितेला संशय आला आणि तिने पोलिसात तक्रार केली. विशेष म्हणजे पीडित मुलगी ही उच्चशिक्षीत आहे. तर आरोपी अविवाहित असून आपल्या आईसोबत राहतो.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
महाराष्ट्र
राजकारण
शिक्षण
Advertisement