Pune : राजगडवर मधमाशांचा पर्यंटकांवर हल्ला; एक महिला दरीत कोसळून जखमी
Pune : रायगड किल्ल्यावर मधमाशांकडून झालेल्या हल्ल्यात महिला दरीत कोसळून जखमी झाली आहे.
Pune : राजगड (Raigad) किल्ल्यावर सध्या अनेक पर्यटक जात आहेत. अशातच किल्ल्यावर मधमाशांकडून अनेक पर्यटकांना चावा घेण्यात आला आहे. मधमाशांचे मोहोळ मागे लागल्याने किल्ल्यावर पर्यटकांची चांगलीच पळापळ झाली. मधमाशांकडून झालेल्या या हल्ल्यात एक महिला दरीत कोसळून जखमी झाली आहे.
मधमाशांकडून झालेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेचे नाव रोहिनी सागर वराट असे आहे. 29 वर्षीय ही महिला राजगड किल्ल्याच्या तटबंदीवरून 200 फुल खोल दरीत कोसळली. आता स्थानिकांनी दरीत कोसळलेल्या महिलेला बाहेर काढले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
रोहिनी वराट ही महिला पिंपरी-चिंचवडमधील वाकड भागात राहणारी आहे. चार जणांच्या ग्रुपसह ही महिला राजगड किल्ल्यावर पर्यटनासाठी आली होती. दरम्यान मधमाशांकडून किल्ल्यावर आलेल्या पर्यटकांवर हल्ला करण्यात आला. याआधीदेखील राजगड किल्ल्यावर मधमाशांकडून करण्यात आलेल्या हल्ल्यामुळे अनेक जीवघेणे अपघात घडले आहेत.
राजगड किल्ल्याजवळ याआधीदेखील उन्हाळी शिबिरासाठी आलेल्या 200 जणांवर मधमाशांनी हल्ला केला होता. यामध्ये 151 शालेय विद्यार्थ्यांचा समावेश होता. मधमाशांचा हल्ला सुरू असताना शिक्षिका ज्योती कड यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता शक्य होईल तेवढ्या विद्यार्थ्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र या प्रयत्नात त्या स्वत: गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांच्यासह अनुष्का रुगे, श्रेयस क्षीरसागर, स्वाती पाटील, ओंकार शेलार, अशोक चव्हाण आणि प्रवीण वराडे हे सात जण गंभीर जखमी झाले होते.
संबंधित बातम्या
राजगड किल्ल्याजवळ उन्हाळी शिबिरासाठी आलेल्या 200 जणांवर मधमाशांचा हल्ला, 151 विद्यार्थ्यांचा समावेश
Pune : पुणेकरांसाठी महत्वाचं! पीएमपीएमएलच्या ठेकेदारांनी बस वाहतूक अचानक थांबवली, प्रवाशांना फटका
Rain in Maharashtra : राज्यातील अनेक जिल्ह्यात ढगाळ वातावरण, मुंबईसह पुणे आणि सातारा जिल्ह्यात पावसाची हजेरी
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha