एक्स्प्लोर

राजगड किल्ल्याजवळ उन्हाळी शिबिरासाठी आलेल्या 200 जणांवर मधमाशांचा हल्ला, 151 विद्यार्थ्यांचा समावेश

भडक रंग आणि नवीन टी-शर्टला असलेल्या वासामुळे आकर्षित होवून झाडावरील मधमाशांनी मुलांवर हल्ला चढवला असण्याची शक्यता आहे.

पुणे : राजगड किल्ल्याच्या पायथ्याजवळ उन्हाळी शिबिरासाठी आलेल्या 200 जणांवर मधमाशांनी हल्ला केला. यामध्ये 151 शालेय विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या हल्ल्यात शिक्षकांसह सात जण गंभीर असून इतरांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती करंजावणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांनी दिली. राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या गुंजवणे गावात प्राध्यापक गजानन व्हावळ यांनी चार दिवसीय उन्हाळी शिबीर आयोजित केलं होतं. शिबिराच्या पहिल्या दिवशी सर्वजण गुंजवणी गावात एकत्र जमले होते. त्यावेळी शेजारच्या झुडुपांमधून मधमाशांनी अचानक या सर्वांवर हल्ला चढवला. मधमाशांच्या हल्ल्यानंतर विद्यार्थ्यांना कुठे पळावं हे देखील सूचलं नाही. गुंजवणे गावातील ग्रामस्थांनी या विद्यार्थ्यांना स्वत:च्या घरात घेत मधमाशांपासून त्यांची सुटका केली. त्यानंतर काही वेळाने त्यांना गुंजवणे गावापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या गावात उपचारांसाठी नेण्यात आलं. तिथे तहसीलदार आणि पोलिसांनी जखमींना मदत केली. या हल्ल्यात शिक्षकांसह सात जण गंभीर असून इतरांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती करंजावणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांनी दिली. या चार दिवसीय उन्हाळी शिबिरात 151 शालेय विद्यार्थी, 34 स्वयंसेवक आणि 15 शिक्षक असे 200 जण सहभागी झाले होते. ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांना मिळेल त्या वाहनातून तीन किलोमीटर अंतरावरील करंजावणे गावात हलवलं. मात्र मधमाशांनी काही अंतरापर्यंत त्यांचा पाठलाग केला. मधमाशांचा हल्ला सुरु असताना शिक्षिका ज्योती कड यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता शक्य होईल तेवढ्या विद्यार्थ्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र या प्रयत्नात त्या स्वत: गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यासह अनुष्का रुगे, श्रेयस क्षीरसागर, स्वाती पाटील, ओंकार शेलार, अशोक चव्हाण आणि प्रवीण वराडे हे सात जण गंभीर जखमी आहेत. टी-शर्टचा वास ठरला हल्ल्याला कारण ? 'शिवशौर्य साहसी बालसंस्कार शिबीर, शिवतीर्थ राजगड' हे नाव छापलेले नवीन भडक केशरी रंगाचे टी-शर्ट घालून विद्यार्थी शिबिराला आले होते. भडक रंग आणि नवीन टी-शर्टला असलेल्या वासामुळे आकर्षित होऊन झाडावरील मधमाशांनी मुलांवर हल्ला चढवल्याची शक्यता आहे. कारण टी-शर्ट न घातलेल्या इतरांवर मधमाशांनी हल्ला केला नसल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं. तसंच जखमी मुलांना वैद्यकीय उपचारांसाठी नेताना जोपर्यंत त्यांचे टी-शर्ट काढले नाहीत, तोपर्यंत मधमाशांनी त्यांची पाठ सोडली नसल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या

Radhakrishna Vikhe Patil on Rohit Pawar: 'रोहित पवारांनी सध्या सुरू असलेले उद्योग थांबवले तरी खूप झाले'; राधाकृष्ण विखे पाटलांचा खोचक टोला
'रोहित पवारांनी सध्या सुरू असलेले उद्योग थांबवले तरी खूप झाले'; राधाकृष्ण विखे पाटलांचा खोचक टोला
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
Harshvardhan Sapkal: वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Chandigarh Protest: अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
Harshvardhan Sapkal: वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
Uday Samant Maratha Reservation: जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
Mumbai Azad Maidan Riots: मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
Embed widget