Pune : पुणेकरांसाठी महत्वाचं! पीएमपीएमएलच्या ठेकेदारांनी बस वाहतूक अचानक थांबवली, प्रवाशांना फटका
Pune PMPML Bus News : ठेकेदारांनी वाहतूक थांबवल्यामुळं पीएमपीच्या ताफ्यातील सहाशे बसची वाहतूक बंद आहेत.अचानक पुकारलेल्या संपामुळे प्रवाशांना मात्र महत्वाच्या वेळेत त्रासाचा सामना करावा लागणार आहे.
Pune PMPML Bus News : थकबाकी मिळावी या मागणीसाठी पीएमपीएमएलच्या खाजगी ठेकेदारांनी सकाळपासून बस वाहतूक अचानक थांबवली आहे. यामुळं पुणेकरांना सकाळी कामाच्या वेळेत फटका बसणार आहे. ठेकेदारांनी अचानक वाहतूक थांबवल्यामुळं पीएमपीच्या ताफ्यातील सहाशे बसची वाहतूक बंद आहेत. थकबाकी मिळावी म्हणून हा संप करण्यात आल्याचं वाहतूकदारांचे म्हणणं आहे.
अचानक पुकारलेल्या संपामुळे प्रवाशांना मात्र सकाळच्या महत्वाच्या वेळेत त्रासाचा सामना करावा लागणार आहे. दरम्यान ठेकेदारांवर अत्यावश्यक सेवा कायद्यान्वये कारवाई करण्याची नोटीस पीएमपीने सर्व ठेकेदारांना पाठवली आहे. पीएमपीमध्ये सुमारे सात खाजगी ठेकेदारांच्या 956 बस भाडेतत्त्वावर धावतात. यापैकी सुमारे 650 ते 700 बस दररोज मार्गांवर धावतात.
पीएमपीएमएलच्या खाजगी ठेकेदारांची जवळपास पाच ते सहा महिन्यांची थकबाकी आहे. याआधीही त्यांनी प्रशासनाला वारंवार पत्र लिहून थकबाकी देण्याची मागणी केली होती. थकबाकी नाही मिळाली तर आम्ही बस कशा चालवणार? बसचा मेटेनन्स वगेरे अशा बऱ्याच गोष्टींचा खर्च कसा भागवणार असा सवाल ठेकेदारांकडून केला जात आहे.
आधी सूचना देऊनही थकबाकी न मिळाल्यानं आज अचानक पीएमपीएमएलच्या खाजगी ठेकेदारांनी बसेस बंद केल्या. ठेकेदारांच्या जवळपास 600 हून अधिक बसेस बंद असल्याची माहिती आहे. थकबाकी मिळेपर्यंत बसेस सुरु न करण्याच्या पवित्र्यात ठेकेदार आहेत.
पीएमपीएमएलच्या खाजगी ठेकेदारांच्या या अचानक संपामुळं प्रवाशांचे मात्र हाल होत आहेत. अनेक ठिकाणी प्रवाशी थांब्यांवर प्रवाशी उभे असल्याचे चित्र आहेत. कामाला जायच्या वेळेलाच बसेस बंद असल्यानं प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. शिवाय सध्या उन्हाचा तडाखा असल्यानं त्याचाही त्रास सोसावा लागत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Petrol Diesel Prices : तुमच्या शहरांतील एक लिटर पेट्रोलची किंमत काय? जाणून घ्या आजचे दर
राणा दाम्पत्य उद्या हनुमान चालीसा पठण करणार, 'मातोश्री'बाहेर बॅरिकेडिंग करुन पोलीस बंदोबस्तात वाढ