Pune: दहावीच्या विद्यार्थीनीवर धारदार शस्त्रानं हल्ला करणाऱ्या तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
Pune: शाळेत घुसून वर्गातील विद्यार्थी आणि शिक्षिकेसमोर हा धक्कादायक प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

Pune: पुण्यात दहावीच्या विद्यार्थीनीवर धारदार शस्त्रानं हल्ला करणाऱ्या तरूणानं आत्महत्येचा करण्याचा प्रयत्न केलाय. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती समोर आलीय. संबंधित तरूणानं काल (14 मार्च) दहावीच्या वर्गात निरोप समारंभ सुरू असताना एका विद्यार्थीनीवर तीक्ष्ण शस्त्रानं सपासप वार करत घटनास्थळावरून पळ काढला. या हल्ल्यात संबंधित विद्यार्थीनी गंभीर जखमी झाली. तिच्यावर वडगाव शेरीमधील रुग्णालयात उपचार सुरु असताना आरोपी तरूणानं विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं समजत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी मुलगा हा पीडित मुलीच्या परिचयातील आहे. पीडित मुलगी ही शेरीमधल्या एका शाळेत दहावीच्या वर्गात शिकते. तिच्या शाळेत काल दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ होता. याच कार्यक्रमादरम्यान आरोपी तीक्ष्ण शस्त्रासह वर्गात घुसला आणि त्यानं पीडितावर सपासप वार केले. या हल्ल्यात मुलगी गंभीररित्या जखमी झाली. त्यानंतर आरोपीनं घटनास्थळावरून पळ काढला. दरम्यान, रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या विद्यार्थिनी उपचारांसाठी तातडीने वडगाव शेरीमधल्याच सिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपी तरूणाविरोधात गुन्हा दाखल केला. याप्रकरणी स्थानिक पोलीस आरोपीचा शोध घेत असताना त्यानं विष प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आलीय. त्याला उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.
पीडिताची प्रकृती कशी?
हल्ल्यात मुलीच्या पोटाला आणि हाताला गंभीर जखमा झाल्या आहेत. दरम्यान तरुणी धोक्याबाहेर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. पुण्यात दिवसेंदिवस महिला, तरुणी अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यात आरोपी धारदार शस्त्र घेऊन थेट वर्गात घुसला आणि त्याने विद्यार्थिनीवर हल्ला केला. शाळेत घुसून वर्गातील विद्यार्थी आणि शिक्षिकेसमोर हा धक्कादायक प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. तसेच विद्यार्थी, शिक्षकांसह पालकावर्गांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालंय.
हे देखील वाचा-
- Sangli Crime : आटपाडी तहसीलदाराच्या शासकीय वाहनावर डम्पर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न
- भिवंडी हादरले! किरकोळ वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला; आरोपींना पोलिसांनी घेतले ताब्यात
- रक्षकच निघाले भक्षक! लुटमारीच्या गुन्ह्यात पुण्याच्या तीन पोलिसांसह चौघांना बेड्या
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
