(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune APMC Election: विजय शिवतारे यांना मोठा धक्का; मविआचे उमेदवार विजयी तर इंदापुरात राष्ट्रवादी-भाजप युती चालली; संपूर्ण निकाल एका क्लिकवर...
भाजप आणि शिवसनेचा सर्व जागांवर पराभव झाला असून महविकास आघाडीने आपला गड राखला आहे. त्याउलट दौंडमध्ये राष्ट्रवादीला धक्का बसला आहे आणि इंदापुरात राष्ट्रवादी-भाजप युतीनं आघाडी घेतली आहे.
Pune APMC election : पुणे जिह्यातील बाजार (Pune APMC election) समितीचे निकाल हाती आले आहेत. कुठे भाजपला धक्का बसला आहे तर कुठे राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडी गड राखण्यात यशस्वी झाले आहेत. नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आघाडीचा अठरा जागांवर विजय झाला आहे. विजय शिवतारे यांना मोठा धक्का मिळाला आहे. या निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसनेचा सर्व जागांवर पराभव झाला असून महविकास आघाडीने आपला गड राखला आहे. त्याउलट दौंडमध्ये राष्ट्रवादीला धक्का बसला आहे आणि इंदापुरात राष्ट्रवादी-भाजप युतीनं आघाडी घेतली आहे.
पुरंदर तालुका आणि बारामती तालुक्यातील 22 गावांमध्ये कार्यक्षेत्र असलेल्या या बाजार समितीवर विरोधी पक्षनेते अजित पवार आणि पुरंदरचे आमदार संजय जगताप यांची एक हाती सत्ता मागील काळात होती. यावेळेस सुद्धा आपली सत्ता राखण्यास त्यांना यश आले. या निवडणुकीत सर्वच्या सर्व म्हणजे 18 जागांवर आघाडीचे उमेदवार निवडून आले आहेत
दौंडमध्ये राष्ट्रवादीला धक्का...
दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीत राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. 18 जागांपैकी नऊ जागांवर भाजप तर नऊ जागांवर राष्ट्रवादी विजयी झाले आहे. दौंड मध्ये ग्रामपंचायतच्या प्रवर्गात भरभक्कम वर्चस्व मिळवल्यानंतर कुल गटाने राष्ट्रवादीच्या मातब्बर बालेकिल्ला असलेल्या सोसायटीच्या प्रवर्गात देखील दणका दिला. ग्रामपंचायत आणि सोसायटीतही एकूण दहा जागी भाजपचे उमेदवार निवडून आले होते. मात्र एका ठिकाणी फेरमतमोजणी घेतल्यानंतर थोरात गटाचा उमेदवार विजयी झाला. त्यामुळे येथील एकूण जागांची स्थिती समसमान झाली आहे. हा राष्ट्रवादीला मोठा धक्का आहे. नुकतीच दौंड तालुक्यातील वरवंड येथे खासदार संजय राऊत यांची मोठी सभा झाली होती. राहुल कुल यांच्या ताब्यात असलेल्या कारखान्यावर आरोप केले होते. परंतु त्याचे मतात रुपांतर करण्यात राष्ट्रवादी अपयशी ठरली. त्यातच जसे निवडणुकीच्या निकाल लागू लागले, तसतसा भाजपचा उत्साह वाढत गेला आणि कार्यकर्त्यांनी संजय राऊत मुर्दाबाद च्या घोषणा दिल्या.
इंदापूरात राष्ट्रवादी-भाजप युती चालली...
इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकरी विकास पॅनल आघाडीवर आहे. इंदापुरात राष्ट्रवादी आणि भाजपची युती झाली होती. त्यांच्या विरोधात शिवसेनेनं पॅनेल उभे केलं होतं. चार जागा यापूर्वी बिनविरोध झाल्या होत्या. 18 जागांपैकी 14 जागांवर शेतकरी विकास पॅनल सर्व उमेदवार आघाडीवर आहेत. शिवसेनेला मात्र पॅनल उभं करणं महागात पडलं त्यांना पराभव पत्करावा लागला.