एक्स्प्लोर

Pune Accident: पुणे-नाशिक महामार्गावर वडाप हवेत उडवून 9 जणांना चिरडणाऱ्या फरार आयशर ड्रायव्हरच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या

Pune Accident: पुणे-नाशिक महामार्गावरील नारायणगाव येथील अपघातातील फरार आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने चाकण परिसरातून त्याला ताब्यात घेतलं आहे.

पुणे: पुण्यात काल (शुक्रवारी) भीषण अपघाताची (Pune Accident) घटना घडली होती. पुणे-नाशिक महामार्गावरील नारायणगाव परिसरात हा अपघात (Pune Accident) झाला होता. या घटनेमध्ये नऊ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता, तर अनेक जण जखमी झाले आहेत. नारायणगाव जवळ हा अपघात (Pune Accident) काल (शुक्रवारी) सकाळी दहाच्या सुमारास झाला आहे. प्रवासी वाहतूक करणाऱ्या मॅक्स ऑटो गाडीला पाठीमागून आयशर टेम्पोने जोराची धडक दिल्याने हा अपघात (Pune Accident) झाला होता.आयशरने मागून घडक दिल्याने ही मॅक्स ऑटो पुढे असलेल्या एसटीबसवरती फेकली गेली. या घटनेमध्ये चार महिला, चार पुरुष आणि एका बाळाचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर फरार झालेल्या आयशर चालकाला अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. अपघातानंतर आयशर चालक फरार झाला होता. 

अपघातानंतर आयशर चालक फरार झाला होता, त्याला ताब्यात घेण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आलं आहे. चाकण परिसरातून आरोपीला ताब्यात घेतलं आहे. रोहित कुमार जगमालसिंग चौधरी असे या आयशर चालकाचे नाव आहे. हरियाणा येथे पळून जात असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. पुणे नाशिक महामार्गावर नारायणगाव येथील अपघातात नऊ जणांचा मृत्यू तर सात जण गंभीर जखमी झाले आहेत. पुणे - नाशिक महामार्गावरती एसटीच्या मागे मॅक्स ऑटो जात होती. तर त्याच्या पाठीमागून आयशर टेम्पो जात होता. आयशरने जोरात धडक दिल्याने मॅक्स ऑटो हा बसवर जाऊन आपटली. दोन्ही गाड्यांच्यामध्ये आल्याने मॅक्स ऑटो मधील प्रवासी हे गंभीर जखमी झाले आहेत. 

अपघातातील मृतांना मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर

या अपघातातील मृतांच्या कुटूंबाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मदत जाहीर केली आहे. त्याचबरोबर जखमींवर योग्य प्रकारे उपचार व्हावेत, अशा सूचना देखील त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. त्यांनी याबाबत सोशल मिडियावर पोस्ट केली आहे. "पुणे-नाशिक महामार्गावर नारायणगाव जवळ झालेल्या भीषण अपघातात 9 कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना करतो.मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक सहाय्य मुख्यमंत्री सहायता निधीतून करण्यात येईल. जखमींच्या उपचाराची योग्य काळजी घ्या, असे मी पुणे पोलिस अधीक्षक यांना सांगितले आहे", अशी पोस्ट फडणवीस यांनी शेअर केली आहे. 

अपघातील मृतांची नावे

1) देबुबाई दामू टाकळकर वय 65 वर्ष रा. वैशखखेडे तालुका जुन्नर जिल्हा पुणे
2)विनोद केरूभाऊ रोकडे 50 वर्ष राहणार कांदळी तालुका जुन्नर जिल्हा पुणे
3)युवराज महादेव वाव्हळ वय 23 वर्ष रा 14 नंबर कांदळी तालुका जुन्नर जिल्हा पुणे
4)चंद्रकांत कारभारी गुंजाळ वय 57 वर्ष राहणार कांदळीतालुका जुन्नर जिल्हा पुणे
5)गीता बाबुराव गवारे वय 45 वर्षे 14 नंबर कांदळी तालुका जुन्नर जिल्हा पुणे
6)भाऊ रभाजी बडे वय 65 वर्ष रा नगदवाडी कांदळीतालुका जुन्नर जिल्हा पुणे
7)नजमा अहमद हनीफ शेख वय- 35 वर्ष रा.गडही मैदान खेड राजगुरुनगर
8)वशिफा वशिम इनामदार वय 5 वर्ष
9)मनीषा नानासाहेब पाचरणे वय 56 वर्षे रा.14 नंबर तालुका जुन्नर जिल्हा पुणे

कांदळी गावातील पाच कुटुंबावर काळाचा घाला

कांदळी गावातील पाच कुटुंबावर काळाचा घाला, गावात शोककळा पसरली. चालक ही याचं गावचा या अपघातात आत्तापर्यंत नऊ जण दगावले असल्याची माहिती आहे, तर जखमींवरती शासकीय रूग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. मृतांमध्ये जुन्नरच्या कांदळी गावातील पाच जणांचा समावेश आहे. मॅक्स ऑटोचा चालक विनोद रोकडे ही याचं गावचा असल्यानं गावावर शोककळा पसरली आहे. गावात पूर्वीप्रमाणे एसटी येत असती तर कदाचित हा अपघात टाळता आला असता, अशी खंत गावकऱ्यांनी व्यक्त केली. या अपघातात एका पाच वर्षांच्या लहान बाळाचा देखील मृत्यू झाला असल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

एबीपी माझा सोबत 7 वर्षांपासून, 13 वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव...
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Delhi Bomb Blast PM Modi: दिल्ली बॉम्बस्फोटाने हादरलेली असतानाच पीएम मोदी भूतानला रवाना; चौथ्या राजेंच्या वाढदिवसाला हजेरी लावणार
दिल्ली बॉम्बस्फोटाने हादरलेली असतानाच पीएम मोदी भूतानला रवाना; चौथ्या राजेंच्या वाढदिवसाला हजेरी लावणार
Delhi Blast Updates: दिल्ली स्फोटातील 'त्या' छिन्नविछिन्न मृतदेहांचे पोस्टमार्टेम पूर्ण, पोलिसांना मिळाली महत्त्वाची माहिती, शार्पनेल ऑब्जेक्ट....
दिल्ली स्फोटातील 'त्या' छिन्नविछिन्न मृतदेहांचे पोस्टमार्टेम पूर्ण, पोलिसांना मिळाली महत्त्वाची माहिती, शार्पनेल ऑब्जेक्ट....
Maharashtra Live blog: दिल्लीतील स्फोटानंतर 100 पेक्षा जास्त सीसीटीव्ही फुटेजची तपासणी, मेट्रो 1 आणि मेट्रो 4 गेट बंद
LIVE: दिल्लीतील स्फोटानंतर 100 पेक्षा जास्त सीसीटीव्ही फुटेजची तपासणी, मेट्रो 1 आणि मेट्रो 4 गेट बंद
Delhi Bomb Blast News: दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशन स्फोटाचे पुलवामा कनेक्शन; पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर
दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशन स्फोटाचे पुलवामा कनेक्शन; पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Delhi Blast: दिल्लीतील स्फोटानंतर America सतर्क, नागरिकांसाठी Security Alert जारी.
Delhi Terror Plot : Faridabad मॉड्यूलचा हात? संशयित Dr. Umar आत्मघाती हल्ल्यात सामील असल्याचा संशयa
Delhi Blast : आत्मघाती हल्ल्याचा संशय, Delhi Police कडून UAPA अंतर्गत गुन्हा दाखल
Delhi Blast: i20 कारमध्ये स्फोट, घटनास्थळी शार्पनेल नाही, Delhi Police कडून 4 संशयित ताब्यात.
Delhi Car Blast: i20 कारचा मार्ग उघड, Haryana-Badarpur सीमेवरुन Delhi मध्ये एंट्री

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Delhi Bomb Blast PM Modi: दिल्ली बॉम्बस्फोटाने हादरलेली असतानाच पीएम मोदी भूतानला रवाना; चौथ्या राजेंच्या वाढदिवसाला हजेरी लावणार
दिल्ली बॉम्बस्फोटाने हादरलेली असतानाच पीएम मोदी भूतानला रवाना; चौथ्या राजेंच्या वाढदिवसाला हजेरी लावणार
Delhi Blast Updates: दिल्ली स्फोटातील 'त्या' छिन्नविछिन्न मृतदेहांचे पोस्टमार्टेम पूर्ण, पोलिसांना मिळाली महत्त्वाची माहिती, शार्पनेल ऑब्जेक्ट....
दिल्ली स्फोटातील 'त्या' छिन्नविछिन्न मृतदेहांचे पोस्टमार्टेम पूर्ण, पोलिसांना मिळाली महत्त्वाची माहिती, शार्पनेल ऑब्जेक्ट....
Maharashtra Live blog: दिल्लीतील स्फोटानंतर 100 पेक्षा जास्त सीसीटीव्ही फुटेजची तपासणी, मेट्रो 1 आणि मेट्रो 4 गेट बंद
LIVE: दिल्लीतील स्फोटानंतर 100 पेक्षा जास्त सीसीटीव्ही फुटेजची तपासणी, मेट्रो 1 आणि मेट्रो 4 गेट बंद
Delhi Bomb Blast News: दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशन स्फोटाचे पुलवामा कनेक्शन; पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर
दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशन स्फोटाचे पुलवामा कनेक्शन; पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर
Operation Sindoor 2.0 : पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवण्याची हीच योग्य वेळ; दिल्ली स्फोटानंतर सोशल मीडियावर ऑपरेशन सिंदूर 2.0 ची चर्चा
पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवण्याची हीच योग्य वेळ; दिल्ली स्फोटानंतर सोशल मीडियावर ऑपरेशन सिंदूर 2.0 ची चर्चा
Delhi Bomb Blast : दिल्ली स्फोटामध्ये वापरलेल्या i20 कारचा मूळ मालक सलमान, फरिदाबाद कनेक्शन समोर, दहशतवादी हल्लाच असल्याचं स्पष्ट
दिल्ली स्फोटामध्ये वापरलेल्या i20 कारचा मूळ मालक सलमान, फरिदाबाद कनेक्शन समोर, दहशतवादी हल्लाच असल्याचं स्पष्ट
Delhi Blast : लाल किल्ला मेट्रो स्टेशन स्फोटानंतर राजधानी हादरली, संपूर्ण दिल्लीसह मुंबईमध्ये हाय अलर्ट जारी
लाल किल्ला मेट्रो स्टेशन स्फोटानंतर राजधानी हादरली, संपूर्ण दिल्लीसह मुंबईमध्ये हाय अलर्ट जारी
दिल्ली हादरली! लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ मोठा स्फोट, कारमध्ये धमाका झाल्यानंतर हाय अलर्ट जारी
दिल्ली हादरली! लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ मोठा स्फोट, कारमध्ये धमाका झाल्यानंतर हाय अलर्ट जारी
Embed widget