फिर से दिखाऊंगा सडक पे खेल, बिल्डरपुत्राच्या नावाने व्हीडिओ व्हायरल, शिवीगाळ करणारं रॅप
Pune Porsche Car Accident : पुणे अपघातात बेल मिळाल्यानंतर धनाढ्य विशाल अग्रवालच्या मुलाच्या नावाने सोशल मीडियावर एक व्हीडिओ व्हायरल झाला होता. मात्र, हा व्हीडिओ डीपफेक असल्याचे नंतर स्पष्ट झाले.
पुणे: पुण्यातील कल्याणीनगर परिसरातील अपघातामुळे चर्चेत आलेल्या बिल्डरपुत्राच्या नावे एक व्हीडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हीडिओतील रॅप साँगमध्ये शिवीगाळ करण्यात आल्याने संतापाचा भडका उडाला होता. मात्र, काहीवेळाच हा धनिकपुत्राचा नसल्याचे स्पष्ट झाले होते. हा व्हीडिओ एका दुसऱ्याच कंटेट क्रिएटरने तयार केला होता. हा कंटेट क्रिएटर आणि पुणे अपघातामधील अल्पवयीन आरोपी यांच्या दिसण्यात सार्धम्य असल्याने हा व्हीडिओ त्याचाच असल्याचा समज झाला होता.
एबीपी माझा या व्हिडीओची पुष्टी करत नाही. पोलिसांनी तसेच या मुलाच्या कुटुंबीयांनीदेखील हा व्हिडीओ त्याचा नसल्याचं सांगितलं आहे. हा व्हिडीओ डीपफेक आहे का, एआयच्या वापर करून तो तयार करण्यात आला आहे का याचा तपास पुणे पोलिसांनी सुरू केला आहे.
बिल्डरचा मुलगा आहे म्हणून मला एका दिवसात बेल मिळाल्याचं सांगत त्या अल्पवयीन आरोपीने शिवीगाळ केल्याचं दिसतंय. त्यानंतर त्यांने रॅप साँग करत व्हिडीओ केला. पण हा व्हिडीओ डीप फेक असू शकतो, त्या मुलाचा नसू शकतो अशीही शक्यता वर्तवली आहे. व्हायरल होणारा हा व्हिडीओ एआय टूल वापरून तयार केला असल्याची शक्यता पुणे पोलिसांनी वर्तवली आहे.
काय आहे मुलाच्या रॅप साँगमध्ये?
मिली बेल, फिर से दिखाऊंगा सडक पे खेल,
चार यार मेरे साथ, सिधे फाड देते गां+++
करके बैठा मै नशे...
इन माय पोर्शे
सामने आया कपल मेरे
अब वो है निचे
साऊंड सो क्लिंचे
सॉरी गाडी चढ आप पे
१७ साल की उमर
पैसे मेरे बाप पे
1 दिन में मिल गयी मुझे बेल
फीर से दिखा दुंगा सडक पे खेल
प्लेइंगद केरोसिन फोन्क इन माय नेक्स्ट स्पोर्ट्स कार
अल्पवयीन मुलाचा जामीन रद्द
अल्पवयीन मुलाची बालसुधारगृहात रवानगी
पुण्यातल्या कल्याणीनगर रॅश ड्रायव्हिंग प्रकरणातल्या अल्पवयीन मुलाचा जामीन बाल न्याय मंडळाने रद्द केला आहे. बाल न्याय मंडळात बुधवारी 8 तासांहून अधिक वेळ सुनावणी झाली. या मुलाची आता 5 जूनपर्यंत बालसुधारगृहात रवानगी होणार आहे. तसंच मुलगा सज्ञान आहे की अल्पवयीन हे पोलीस तपासानंतर ठरवलं जाईल. तोवर मुलाला बालसुधारगृहातच राहावं लागणार आहे.
अपघातानंतर या मुलाला तातडीने मिळालेल्या जामिनानंतर प्रचंड रोष निर्माण झाला होता. स्वतः गृहमंत्री फडणवीसांनी पुण्यात जात पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याशी चर्चा केली होती. मुलगा 17 वर्षे 8 महिन्यांचा असल्यामुळे निर्भया प्रकरणानंतरच्या सुधारित ऑर्डरनुसार आरोपी अल्पवयीन असल्यास त्याला काही प्रकरणात सज्ञान आरोपीनुसार कारवाई करता येते हा मुद्दा पोलिसांनी कोर्टात मांडला. तसंच पोलिसांनी अल्पवयीन मुलावर वाहन कायद्याच्या कलम 185 अंतर्गत नव्यानं गुन्हा दाखल केला आणि त्याला पुन्हा कोर्टात हजर केलं. बाल न्याय मंडळाने आता त्याचा जामीन रद्द करत बालसुधारगृहात रवानगी केलीय.
ही बातमी वाचा :