एक्स्प्लोर
Advertisement
पुण्यात ढोरे-भांबुरवाडीच्या सरपंचपदी 94 वर्षीय आजीबाई
पिंपरी चिंचवड : तुम्ही तुमच्या गावचं सरपंचपद 94 वर्षीय आजीबाईंना द्याल का हो? पुणे जिल्ह्यातील ढोरे-भांबुरवाडी या संयुक्त ग्रामपंचायतीचा गाडा मात्र आता 94 वर्षीय महिलेच्या हाती सोपवण्यात आला आहे.
94 वर्षीय गंगुबाई भांबुरे अंगठेबहाद्दर या आजी सरपंच झाल्या आहेत. पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील जेरवाडी, ढोरेवाडी आणि भांबुरवाडी या तिन्ही गावांच्या संयुक्त ढोरे-भांबुरवाडी ग्रामपंचायतीचा गाडा त्या हाकणार आहेत.
सरपंचपद महिलांसाठी राखीव घोषित होताच, वयाच्या 93 व्या वर्षी या आजीबाईंनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला. विरोधकाला पाणी पाजून विजयही निश्चित केला. मात्र तेव्हा सुमित्रा ढोरे यांच्या गळ्यात सरपंचपदाची माळ पडली. परंतु त्यांनी पदाचा राजीनामा दिला आणि 94 वर्षीय गंगूबाई बिनविरोध सरपंच झाल्या.
अंगठेबहाद्दर असल्या तरी त्यांनी गावाचा विकास करण्याचा ध्यास बांधला आहे. गंगूबाईंनी सरपंचपदाच्या खुर्चीवर बसून एक इतिहास रचला आहे. आता या वयात तिन्ही गावचा गाडा हाकून त्या गावचा विकास करतील असा विश्वास गावकऱ्यांनी दाखवला, तर इतर ग्रामपंचायत सदस्यांनी एकमुखाने त्यांना पाठिंबा दर्शवला.
गावच्या विकासासाठी त्यांची ही धडपड नव्या पिढीला लाजवेल अशीच आहे. आज्जीबाईनी यातून भावी पिढीसमोर मात्र एक आदर्श उभा केला, हे नक्की.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
पुणे
निवडणूक
निवडणूक
Advertisement