एक्स्प्लोर

Pune Ganesh Visarjan 2024: अनंत चतुदर्शीला गणपती मिरवणुकांसाठी पुण्यातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल, 17 रस्ते बंद राहणार

Pune News: पुण्यात मंगळवारी सकाळी मानाच्या गणपतींची मिरवणूक निघेल. पुण्यातील विसर्जनाचा सोहळा दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत रंगतो. या काळात पुण्यातील रस्त्यांवरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाचा महत्त्वाचा निर्णय

पुणे: अनंत चतुर्दशीला पुण्यातील सार्वजनिक गणपतींच्या विसर्जन मिरवणुका (Ganesh Visarjan 2024) निघणार असल्याने शहरातील वाहतूक व्यवस्थेत महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. सोमवारी संध्याकाळी पाच वाजल्यानंतर पुण्यातील (Pune) प्रमुख 17 रस्ते हे बंद केले जाणार आहेत.  विसर्जन मिरवणुकीची सांगता झाल्यानंतर प्रमुख रस्ते वाहतुकीस खुले करून देण्यात येणार आहेत.

पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीला मंगळवारी सकाळी साधारण साडेदहाच्या सुमारास सुरुवात होईल. प्रथम मानाचे गणपती विसर्जनासाठी बाहेर पडतील. त्यानंतर इतर सार्वजनिक मंडळांच्या गणपतीची मिरवणूक निघेल. मिरवणूक सुरू होण्यापूर्वी मध्यभागातील लक्ष्मी रस्ता, छत्रपती शिवाजी रस्ता, टिळक रस्ता, शास्त्री रस्ता, केळकर रस्ता, बाजीराव रस्ता, कुमठेकर रस्ता गणेश रस्ता, जंगली महाराज रस्ता, कर्वे रस्ता, फर्ग्युसन रस्ता, भांडारकर रस्ता, पुणे-सातारा रस्ता, सोलापूर रस्ता, प्रभात रस्ता, बगाडे रस्ता गुरू नानक या रस्त्यांवरील वाहतूक विसर्जन मिरवणुकीची सांगता होईपर्यंत बंद राहील. 

पार्किंगची व्यवस्था कुठे?

न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाद (दुचाकी), शिवाजी आखाडा, मंगळवार पेठे (दुचाकी आणि चारचाकी), एच.व्ही.देसाई महाविद्यालय (दुचाकी अन् चारचाकी), हमालवाडा, नारायणपेठ (दुचाकी), गोगटे प्रशाला, नारायण पेठ (दुचाकी), एसएसपीएमएस, शिवाजीनगर (दुचाकी अन् चारचाकी), पीएमपीएल मैदान, पूरम चौक, सारसबाग (दुचाकी), हरजीवन हॉस्पिटल, सारसबाग (दुचाकी), पाटील प्लाझा, मित्रमंडळ चौक (दुचाकी), पर्वती ते दांडेकर पूर ते गणेश मळा (दुचाकी), नीलायम चित्रपटगृह (दुचाकी, चारचाकी), विमलाबाई गरवाले प्रशाला, डेक्कन जिमखाना (दुचारी अन् चारचाकी), संजीवन रुग्णालय मैदान, कर्वे रस्ता (दुचाकी अन् चारचाकी), फर्ग्युसून कॉलेज (दुचाकी अन् चारचाकी), दैन हॉस्टेल, बीएमसीसी रस्ता (दुचाकी, चारचाकी), मराठवाडा कॉलेज (दुचाकी), पेशवे पथ (दुचाकी), काँग्रेस भवन रस्ता, शिवाजीनगर (दुचाकी), न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रस्ता (दुचाकी अन् चारचाकी), नदीपात्र भिडे पूल ते गाडगीळ पूल (दुचाकी अन् चारचाकी)

पुण्यात चोख पोलीस बंदोबस्त

गणेशोत्सवाची सांगता मंगळवारी दिमाखदार विसर्जन मिरवणुकीने होणार आहे. पुण्यात विसर्जन सोहळ्यासाठी साडेसहा हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून, विसर्जन मार्गावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे. लक्ष्मी रस्ता, कुमठकेर रस्ता, केळकर रस्ता, टिळक रस्ता या मार्गांवरून मिरवणूक जाणार आहे...मुख्य विसर्जन मार्गासह उपनगरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. शहर तसेच उपनगरात साडेसहा हजार पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. 

कसा असणार पोलीस बंदोबस्त?

अतिरिक्त पोलीस आयुक्त : 4

पोलीस उपायुक्त : 10

सहायक पोलीस आयुक्त : 25

पोलीस निरीक्षक : 135

पोलीस कर्मचारी : 5709

राज्य राखीव पोलीस दल : एक तुकडी

गृहरक्षक दलाचे जवान : 394

आणखी वाचा

उरले अवघे काही तास, चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या दर्शनाची रांग लवकरच बंद होणार? महत्त्वाची अपडेट

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Donald Trump Narendra Modi: डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत संवाद साधणारे नरेंद्र मोदी पहिले जागतिक नेते ठरले; दोघांमध्ये नेमकं काय बोलणं झालं?
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत संवाद साधणारे नरेंद्र मोदी पहिले जागतिक नेते ठरले; दोघांमध्ये नेमकं काय बोलणं झालं?
Nashik Crime: विधानसभा निवडणुकीच्या काळात नाशिकमध्ये धक्कादायक प्रकार, बेरोजगार तरुणांच्या मालेगाव मर्चंट बँकेतील खात्यांमध्ये अचानक 125 कोटींची रक्कम जमा
नाशिकमध्ये धक्कादायक प्रकार, 12 बेरोजगार तरुणांच्या बँक खात्यात अचानक 125 कोटींची रक्कम डिपॉझिट
Deepak Kesarkar : ज्याला Today आणि Tomorrow मधील फरक कळत नाही असा माणूस माझ्याविरोधात उभा : दीपक केसरकर
ज्याला Today आणि Tomorrow मधील फरक कळत नाही असा माणूस माझ्याविरोधात उभा : दीपक केसरकर
वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, 17 कामगार जखमी; गंभीर जखमींना नागपूरला हलवले
वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, 17 कामगार जखमी; गंभीर जखमींना नागपूरला हलवले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Wardha  Bhugaon Factory Accident : वर्ध्यात भुगावमधील एवोनिथ कंपनीत स्फोट, 22 कामगार जखमीManisha Kayande On Varsha Gaikwad : वर्षा गायकवाडांनी शिवाजी महराजांचा अपमान केलाABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 7 AM 07 November 2024 सकाळी ७ च्या हेडलाईन्स-Chhatrapati shivaji maharaj Statue : महाराजांच्या पुतळ्याचा मुद्दा विधानसभेच्या प्रचारात तापणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump Narendra Modi: डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत संवाद साधणारे नरेंद्र मोदी पहिले जागतिक नेते ठरले; दोघांमध्ये नेमकं काय बोलणं झालं?
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत संवाद साधणारे नरेंद्र मोदी पहिले जागतिक नेते ठरले; दोघांमध्ये नेमकं काय बोलणं झालं?
Nashik Crime: विधानसभा निवडणुकीच्या काळात नाशिकमध्ये धक्कादायक प्रकार, बेरोजगार तरुणांच्या मालेगाव मर्चंट बँकेतील खात्यांमध्ये अचानक 125 कोटींची रक्कम जमा
नाशिकमध्ये धक्कादायक प्रकार, 12 बेरोजगार तरुणांच्या बँक खात्यात अचानक 125 कोटींची रक्कम डिपॉझिट
Deepak Kesarkar : ज्याला Today आणि Tomorrow मधील फरक कळत नाही असा माणूस माझ्याविरोधात उभा : दीपक केसरकर
ज्याला Today आणि Tomorrow मधील फरक कळत नाही असा माणूस माझ्याविरोधात उभा : दीपक केसरकर
वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, 17 कामगार जखमी; गंभीर जखमींना नागपूरला हलवले
वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, 17 कामगार जखमी; गंभीर जखमींना नागपूरला हलवले
भाजपाचे बंडखोर स्वत:चेच चिन्ह विसरले; कार्यकर्त्यांना तुतारी वाजविण्याचे आवाहन, लक्षात येताच गोंधळले
भाजपाचे बंडखोर स्वत:चेच चिन्ह विसरले; कार्यकर्त्यांना तुतारी वाजविण्याचे आवाहन, लक्षात येताच गोंधळले
Narendra Modi : राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवताच नरेंद्र मोदींचा डोनाल्ड ट्रम्प यांना फोन
राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवताच नरेंद्र मोदींचा डोनाल्ड ट्रम्प यांना फोन
Varsha Gaikwad : 'भारत जोडो' यात्रेत सहभागी झालेल्या लाखो बहुजनांना देवेंद्र फडणवीस नक्षलवादी समजतात का? वर्षा गायकवाडांचा सवाल
'भारत जोडो' यात्रेत सहभागी झालेल्या लाखो बहुजनांना देवेंद्र फडणवीस नक्षलवादी समजतात का? वर्षा गायकवाडांचा सवाल
मोठी बातमी! शेतकऱ्यांचं 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार, नियमीत कर्जफेड करणाऱ्यांना 50000 चं प्रोत्साहन मिळणार, शरद पवारांची घोषणा
मोठी बातमी! शेतकऱ्यांचं 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार, नियमीत कर्जफेड करणाऱ्यांना 50000 चं प्रोत्साहन मिळणार, शरद पवारांची घोषणा
Embed widget