एक्स्प्लोर

Anant chaturdashi 2024: उरले अवघे काही तास, चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या दर्शनाची रांग लवकरच बंद होणार? महत्त्वाची अपडेट

mumbai Ganesh visarjan 2024: मुंबईत उद्या सार्वजनिक गणपतींची मिरवणूक निघेल. लालबागचा राजा आणि चिंचपोकळीचा चिंतामणी हे दोन प्रमुख गणपती उद्या विसर्जनासाठी मंडपातून निघतील. त्यासाठी आतापासूनच तयारी सुरु झाली आहे.

मुंबई: तमाम महाराष्ट्राचे लाडके आराध्यदैवत असलेल्या गणपती बाप्पााच्या निरोपाची वेळ आता जवळ येऊन ठेपली आहे. घरांमध्ये आणि सार्वजनिक मंडळांचा 10 दिवसांचा पाहुणचार घेऊन लाडका गणपती बाप्पा मंगळवारी अनंत चतुदर्शीच्या (Anant chaturdashi 2024) दिवशी विसर्जनासाठी निघणार आहे. अनंत चतुदर्शीच्या दिवशी मुंबईतील प्रमुख सार्वजनिक मंडळांच्या गणपतीची मिरवणूक निघेल. त्यासाठी आतापासूनच सार्वजनिक मंडळांनी तयारी सुरु केली आहे.

मुंबईत लालबागच्या राजाच्या पाठोपाठ गणेश गल्लीचा गणपती, चिंचपोकळीचा चिंतामणी (chinchpokli cha Chintamani) हे गणपती भाविकांच्या आकर्षणाचा विषय असतात. या गणपतींचे दर्शन घेण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत भाविकांची धडपड सुरु असते. मात्र, उद्या मिरवणूक असल्याने लालबागचा राजा आणि चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या दर्शनाची रांग आता बंद केली जाणार आहे. त्यामुळे भाविकांकडे या गणपतींचे मंडपात जाऊन दर्शन घेण्यासाठी अवघ्या काही तासांची मुदत उरली आहे.

चिंचपोकळीचा चिंतामणीची विसर्जन मिरवणूकीची तयारी करावयाची असल्याने सोमवारी सायंकाळी 6 वाजता चरणस्पर्श दर्शन बंद करण्यात येईल. तर रात्री ठीक 12 वाजता मुखदर्शन बंद करण्यात येईल. तरी याची सर्वांनी नोंद घ्यावी.व सहकार्य करावे, असे आवाहन मंडळाकडून करण्यात आले आहे.

अजित पवार शेवटच्या क्षणी लालबागमध्ये गणपतीच्या दर्शनाला

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी सकाळी लालबागचा राजा आणि चिंचपोकळीच्या चिंतामणीचे दर्शन घेऊन आशिर्वाद घेतले. यावेळी त्यांना मंडळाचे उप मानदसचिव प्रविण राणे यांनी शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी मंडळाचे मानद सचिव वासुदेव सावंत यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

लालबागचा राजाची दर्शनाची रांग कधी बंद होणार?

लालबागच्या राजाच्या (Lalbaug Cha Raja) विसर्जन मिरवणुकीच्या पूर्व तयारीसाठी  दर्शनाची रांग सोमवारी रात्री बंद करण्यात येणार आहे. चरण स्पर्शाची रांग सोमवारीपहाटे 6 वाजता बंद करण्यात आली. तर मुखदर्शनाची रांग सोमवारी रात्री 12 वाजता बंद करण्यात येणार आहे.

विसर्जन मिरवणुकीनिमित्ताने मुंबई पोलिसांची महत्त्वाची सूचना

मुंबई पोलिसांनी गणपती विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील धोकादायक पुलांची यादी जाहीर केली आहे. जुन्या तशाच धोकादायक पुलावरून गणेश विसर्जन मिरवणूक निघताना काळजी घेण्याची सूचना करण्यात आली आहे. जुन्या तशाच धोकादायक पुलावरून १०० पेक्षा अधिक व्यक्ती विसर्जन मिरवणूकी वेळी जाणार नाहीत, पुलावर ध्वनीक्षेपकाचा वापर करण्यात येवू नये तसेच नाचू नये, असेही पोलिसांकडून बजावण्यात आले आहे.

आणखी वाचा

मुंबईकरांना विसर्जन मिरवणुकीनिमित्ताने पोलिसांची सूचना; धोकादायक पुलांची यादीही जारी

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आठवड्यापूर्वी लग्न, देवदर्शनासाठी निघाले अन् लोणावळा स्टेशनवर तोल गेला; RPF पोलिसामुळे तरुण बचावला
आठवड्यापूर्वी लग्न, देवदर्शनासाठी निघाले अन् लोणावळा स्टेशनवर तोल गेला; RPF पोलिसामुळे तरुण बचावला
जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री अहे, तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही; मुख्यमंत्र्यांचा शब्द
जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री अहे, तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही; मुख्यमंत्र्यांचा शब्द
गौरीच्या आई-वडिलांशी बोलल्या, अनंत गर्जेच्या वकिलावर संतापल्या अंजली दमानिया; म्हणाल्या, ते ॲब्सुलेटली रबीश
गौरीच्या आई-वडिलांशी बोलल्या, अनंत गर्जेच्या वकिलावर संतापल्या अंजली दमानिया; म्हणाल्या, ते ॲब्सुलेटली रबीश
Bollywood Drug Case: शक्ती कपूरच्या लेकाची ड्रग्ज प्रकरणात चौकशी, सिद्धांत कपूर मुंबई पोलिसांचं समन्स
मोठी बातमी : शक्ती कपूरच्या लेकाची ड्रग्ज प्रकरणात चौकशी, सिद्धांत कपूर मुंबई पोलिसांचं समन्स
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Baramati Ganesh Market : कोटींची मंडई,भाजी विक्रेत्यांचे हाल; रोखठोक बारामतीकारांशी संवाद
Bajrang Sonawane on Dhananjay Munde : खूप आठवण येत असेल तर भेटायला जा, धनंजय मुंडेंना सल्ला
Udhayanidhi Stalin on Language War: हिंदी लादली तर लँग्वेज वॉर पुकारु,त्रिभाषा सूत्राला कडाडून विरोध
Ayodhya Ram Mandir : अयोध्येत ध्वजारोहणाचा ऐतिहासिक सोहळा, मोदींच्या हस्ते राममंदिरावर Dhwajarohan
PM Modi Full Speech Ayodhya : शतकानुशतकाची जखम आज भरुन निघालीराम मंदिर ध्वजारोहणानंतर UNCUT भाषण

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आठवड्यापूर्वी लग्न, देवदर्शनासाठी निघाले अन् लोणावळा स्टेशनवर तोल गेला; RPF पोलिसामुळे तरुण बचावला
आठवड्यापूर्वी लग्न, देवदर्शनासाठी निघाले अन् लोणावळा स्टेशनवर तोल गेला; RPF पोलिसामुळे तरुण बचावला
जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री अहे, तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही; मुख्यमंत्र्यांचा शब्द
जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री अहे, तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही; मुख्यमंत्र्यांचा शब्द
गौरीच्या आई-वडिलांशी बोलल्या, अनंत गर्जेच्या वकिलावर संतापल्या अंजली दमानिया; म्हणाल्या, ते ॲब्सुलेटली रबीश
गौरीच्या आई-वडिलांशी बोलल्या, अनंत गर्जेच्या वकिलावर संतापल्या अंजली दमानिया; म्हणाल्या, ते ॲब्सुलेटली रबीश
Bollywood Drug Case: शक्ती कपूरच्या लेकाची ड्रग्ज प्रकरणात चौकशी, सिद्धांत कपूर मुंबई पोलिसांचं समन्स
मोठी बातमी : शक्ती कपूरच्या लेकाची ड्रग्ज प्रकरणात चौकशी, सिद्धांत कपूर मुंबई पोलिसांचं समन्स
Uddhav Thackeray & Sanjay Raut: येसSSSS संजय राऊत लवकरच तलवार घेऊन पुन्हा मैदानात दिसतील, बंगल्याबाहेर पडताच उद्धव ठाकरेंचं वक्तव्य
येसSSSS संजय राऊत लवकरच तलवार घेऊन पुन्हा मैदानात दिसतील, बंगल्याबाहेर पडताच उद्धव ठाकरेंचं वक्तव्य
अंग भाजल्यानं रुग्णालयात दाखल, यातना असह्य झाल्यानं रुग्णाने इमारतीच्या छतावरुन उडी टाकून आयुष्य संपवलं, भंडाऱ्यात थरार
अंग भाजल्यानं रुग्णालयात दाखल, यातना असह्य झाल्यानं रुग्णाने इमारतीच्या छतावरुन उडी टाकून आयुष्य संपवलं, भंडाऱ्यात थरार
राज्यातील नगरपालिका निवडणुकांचं काय होणार? आर्टिकल 231 ब काय सांगते; ओबीसी नेत्यानं स्पष्टच सांगितलं
राज्यातील नगरपालिका निवडणुकांचं काय होणार? आर्टिकल 231 ब काय सांगते; ओबीसी नेत्यानं स्पष्टच सांगितलं
Mumbai News: मुंबई ते वाढवण फक्त 60 मिनिटांत, नवीन मार्ग कसा असणार? जाणून घ्या सविस्तर
मुंबई ते वाढवण फक्त 60 मिनिटांत, नवीन मार्ग कसा असणार? जाणून घ्या सविस्तर
Embed widget