एक्स्प्लोर

आधारची माहिती न दिल्याने शिक्षकाची जबर मारहाण, विद्यार्थ्याचा गुडघा फुटला

मुलावर 6 ऑक्टोबरपासून ते 15 ऑक्टोबरपर्यंत उपचार सुरु होते. यादरम्यान त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली.

पुणे : सध्या आधार कार्ड अतिशय महत्त्वाचं आणि अनिवार्य कागदपत्र बनलं आहे. पण आधार कार्डची माहिती शाळेत न दिल्याने शिक्षकाकडून दहा वर्षांच्या विद्यार्थ्याला मारहाण झाल्याची घटना पुण्यात घडली आहे. ही मारहाण एवढी जबर होती की, विद्यार्थ्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. चिंचवडच्या मोरया शिक्षण संस्थेत काही आठवड्यांपूर्वी ही दुर्दैवी घटना घडली. पण चिंचवड पोलिस स्टेशनमध्ये विद्यार्थ्याच्या पालकांनी शनिवारी शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी या प्रकरणी 324 बाल न्याय/बाल संरक्षण कलम 75 अंतर्गत खरात नावाच्या शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. शाळेत विद्यार्थ्यांना आधार क्रमांक आणण्यासाठी सांगितलं होतं. पण शिक्षकांनी सांगितलेल्या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्याची शिक्षा या विद्यार्थ्याला भोगावी लागली. शिक्षकाने विद्यार्थ्याच्या पायावर छडीने जबर मारहाण केली. यात त्याच्या गुडघ्याच्या मागच्या बाजूला गंभीर दुखापत झाली. मुलावर 6 ऑक्टोबरपासून ते 15 ऑक्टोबरपर्यंत उपचार सुरु होते. यादरम्यान त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली. “तो एवढा घाबरला होता की, शाळेत नेमकं काय घडलं हे त्याने आम्हाला सांगितलंच नव्हतं. त्याला चालताना त्रास होत असल्यामुळे त्याला उपचारांसाठी डॉक्टरांकडे घेऊन गेलो. शस्त्रक्रियेसाठी त्याला रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याने शाळेत घडलेला सगळा प्रसंग सांगितला. तो ऐकून आम्हाला धक्काच बसला,” असं विद्यार्थ्याच्या आईने सांगितलं. मुलाला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर पालक पोलिस स्टेशनमध्ये गेले आणि शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिस आता या प्रकरणाचा तपास करत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यात 'या' मतदारसंघात लाडक्या बहिणींचे सर्वाधिक मतदान! वाढलेला टक्का कोणाला रडवणार?
कोल्हापूर जिल्ह्यात 'या' मतदारसंघात लाडक्या बहिणींचे सर्वाधिक मतदान! वाढलेला टक्का कोणाला रडवणार?
विधानसभेच्या निकालापूर्वी मुंबईतून मोठी अपडेट, काँग्रेसच्या नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, मुंबई पोलीस अलर्ट मोडवर
काँग्रेसच्या नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, मुंबई पोलीस अलर्ट मोडवर
Prakash Ambedkar : विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यात 'या' मतदारसंघात लाडक्या बहिणींचे सर्वाधिक मतदान! वाढलेला टक्का कोणाला रडवणार?
कोल्हापूर जिल्ह्यात 'या' मतदारसंघात लाडक्या बहिणींचे सर्वाधिक मतदान! वाढलेला टक्का कोणाला रडवणार?
विधानसभेच्या निकालापूर्वी मुंबईतून मोठी अपडेट, काँग्रेसच्या नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, मुंबई पोलीस अलर्ट मोडवर
काँग्रेसच्या नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, मुंबई पोलीस अलर्ट मोडवर
Prakash Ambedkar : विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
Maharashtra Vidhan Sabha Result 2024: विधानसभेच्या निकालापूर्वी महायुतीने ‘प्लॅन बी’ आखला, बहुमत मिळालं नाही तर.....
एक्झिट पोलचे निकाल अनुकूल, पण महायुतीचा भरवसा नाही, बॅकअप प्लॅन आखला
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
ब्रेकअप झाल्यामुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
ब्रेकअपमुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
Embed widget