एक्स्प्लोर

Pranjal Khewalkar: मोठी बातमी: एकनाथ खडसेंच्या जावयावरील सर्वात मोठा कलंक फॉरेन्सिकने पुसला

Pranjal Khewalkar: प्रांजल खेवलकर आणि इतर आरोपींची ड्रग्स पार्टी प्रकरणात फॉरेन्सिक चाचणी करण्यात आली होती. त्याचे रिपोर्ट पोलिसांना प्राप्त झाले आहेत.

पुणे:  राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर (Pranjal Khewalkar) यांच्या खराडी ड्रग्स पार्टी प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. प्रांजल खेवलकर (Pranjal Khewalkar) आणि इतर आरोपींनी अंमली पदार्थांचे सेवन केले नसल्याचा फॉरेन्सिकचा रिपोर्ट पोलिसांना प्राप्त झाला असल्याची माहिती समोर आली आहे. प्रांजल खेवलकर आणि इतर आरोपींची ड्रग्स पार्टी प्रकरणात फॉरेन्सिक चाचणी करण्यात आली होती. त्याचे रिपोर्ट पोलिसांना प्राप्त झाले आहेत. या प्रकरणात एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर (Pranjal Khewalkar) तब्बल दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ जेलमध्ये होते. प्रांजल खेवलकर यांची येरवडा जेलमधून सुटका झाली आहे.

Pranjal Khewalkar: प्रांजल खेवलकर यांना जामीनावरती बाहेर

पुण्यातील खराडी परिसरात कथित ड्रग्ज पार्टी प्रकरणी प्रांजल खेवलकर (Pranjal Khewalkar) यांना २५ सप्टेंबर रोजी जामीन मंजूर करण्यात आला आहे. प्रांजल खेवलकर हे रोहिणी खडसे यांचे पती आणि एकनात खडसे यांचे जावई आहेत. दीड महिन्यांपेक्षा अधिक वेळ प्रांजल खेवलकर तुरुंगात होते. त्यामुळं त्यांना मिळालेला जामीन मोठा दिलासा होता. खेवलकर यांच्यासह इतर आरोपींना देखील जामीन मंजूर करण्यात आला होता.

Pranjal Khewalkar: नेमकं प्रकरण काय?

पुण्यातील खराडी भागातील एका पार्टीवर पोलिसांनी छापा टाकला होता. त्या पार्टीत अंमली पदार्थ पोलिसांनी जप्त केले होते. त्या पार्टीत काही महिला देखील होत्या.  त्या पार्टीमध्ये काही प्रमाणात अंमली पदार्थ देखील आढळले होते. अंमली पदार्थाचं सेवन प्रांजल खेवलकर यांनी केलं हा कळीचा मुद्दा होता. त्याच मुद्यावर त्यांना जामीन मिळालेला होता. दीड महिन्यांहून अधिक काळ तुरुंगात राहिल्यानंतर पुणे सत्र न्यायालयानं त्यांना जामीन मंजूर केला. दरम्यान प्रांजल खेवलकर आणि इतर आरोपींनी अंमली पदार्थांचे सेवन केले नसल्याचा फॉरेन्सिकचा रिपोर्ट पोलिसांना प्राप्त झाला असल्याची माहिती समोर आली आहे. 

पुण्यातील खराडी भागात सुरु असलेल्या एका खोलीतील पार्टीवर पोलिसांनी 27 जुलै रोजी छापा टाकला होता. त्या कारवाईदरम्यान प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर प्रांजल खेवलकरांसह इतर आरोपींना पुणे सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आलेला आहे. प्रांजल खेवलकर सहभागी असलेल्या पुण्यातील पार्टीत अंमली पदार्थ सापडल्याने त्यांना अटक करण्यात आली होती. पुणे पोलिसांनी 27 जुलै रोजी छापा टाकून प्रांजल खेवलकर आणि इतर सात जणांना अटक केली होती. पोलिसांनी खराडीतील त्या खोलीत 25 जुलै रोजी देखील पार्टी झाल्याचा दावा केला होता. 

प्रांजल खेवलकर हे एकनाथ खडसे यांचे जावई आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांचे पती असल्यानं या प्रकरणाची राज्यभरात चर्चा झाली होती. यामुळे राजकीय वातावरण देखील मोठ्या प्रमाणावर तापल्याचं पाहायला मिळालं होतं, त्यानंतर प्रांजल खेवलकर यांच्या संदर्भात बीडच्या एका स्वयंसेवी संस्थेच्यावतीनं राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी प्रांजल खेवलकर यांच्यावर आरोप केले होते. 

शिवानी पांढरे
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका, 'पुणे शिक्षक'साठी भाजपच्या विरोधात बंडखोराला पाठिंबा जाहीर
मोठी बातमी! अमरावतीतील उट्टे शिवसेना पुण्यात काढणार, 'पुणे शिक्षक'साठी बंडखोर उमेदवाराला एकनाथ शिंदेंचा पाठिंबा
ठाकरेंचे फोटो आणि मशाल चिन्ह वापरु नका, अन्यथा कायदेशीर कारवाई करणार, राष्ट्रवादी शरद पवार गटाला इशारा
ठाकरेंचे फोटो आणि मशाल चिन्ह वापरु नका, अन्यथा कायदेशीर कारवाई करणार, राष्ट्रवादी शरद पवार गटाला इशारा
Pune Crime News: गैरहजेरीचा जाब विचारल्याने वरिष्ठांशी वाद; 'मी आयुष्य संपवतोय..'! मेसेज पाठवून अंमलदार बेपत्ता; पोलिसांची काही तास धावपळ, नंतर एका बारमध्ये...,पुण्यातील घटना
गैरहजेरीचा जाब विचारल्याने वरिष्ठांशी वाद; 'मी आयुष्य संपवतोय..'! मेसेज पाठवून अंमलदार बेपत्ता; पोलिसांची काही तास धावपळ, नंतर एका बारमध्ये...,पुण्यातील घटना
Pune FDA Action: जिवंत झुरळं, मृत झुरळांचे अवशेष, दुर्गंधी अन्...,वारजेतील डॉमिनोज पिझ्झाचा अन्न परवाना निलंबित, मुलांना डॉमिनोझ पिझ्झा खाऊ घालण्याआधी हे पाहाच
जिवंत झुरळं, मृत झुरळांचे अवशेष, दुर्गंधी अन्...,वारजेतील डॉमिनोज पिझ्झाचा अन्न परवाना निलंबित, मुलांना डॉमिनोझ पिझ्झा खाऊ घालण्याआधी हे पाहाच

व्हिडीओ

Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: मालेगाव शहरात आजपासून 10 मिनिटांची पाणी कपात
Maharashtra Live blog updates: मालेगाव शहरात आजपासून 10 मिनिटांची पाणी कपात
Bhandara News : दूष्काळात 'समाधाना'ची साठवण, भंडाऱ्यातील गोसेखुर्द धरण शंभर टक्के भरलं, तीन जिल्ह्यांतील 2.59 लाख हेक्टर शेती सिंचनाची चिंता मिटली!
दूष्काळात 'समाधाना'ची साठवण, भंडाऱ्यातील गोसेखुर्द धरण शंभर टक्के भरलं, तीन जिल्ह्यांतील 2.59 लाख हेक्टर शेती सिंचनाची चिंता मिटली!
Gold Import: सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 81.27 टक्क्यांनी घटली, सलग दुसऱ्या महिन्यात ट्रेंड कायम, चांदीच्या आयातीमध्येही घसरण
सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 81.27 टक्क्यांनी घटली, सलग दुसऱ्या महिन्यात ट्रेंड कायम, जाणून घ्या कारण
School Admission Age : शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
Election Commission : SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
CJP : सीजेपीकडून सेंट्रल पार्कमध्ये लहरा दो तिरंगा मार्चचं आयोजन, NDMC नं पार्क 2 दिवस बंद ठेवण्याचा आदेश काढला, अभिजीत दीपकेंची प्रतिक्रिया समोर
सीजेपीचा लहरा दो तिरंगा मार्च रोखण्यास हायकोर्टाचा नकार, NDMC नं सेंट्रल पार्क बंद ठेवण्याचा आदेश काढला
Mumbai Firecracker Ban : दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
Voter Registration : मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
Embed widget