एक्स्प्लोर
कोल्हापूरनंतर पिंपरी-चिंचवडमध्येही पोस्ट ऑफिस पासपोर्ट केंद्र

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवडमधल्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. पासपोर्ट काढू इच्छिणाऱ्यांना आता पिंपरी-चिंचवडमध्येच सोय उपलब्ध होणार आहे. पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्रामुळे पासपोर्ट काढण्यासाठी त्यांना पुण्यात येण्याची गरज नाही. शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते पिंपरी चिंचवडमध्ये पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्राचं उद्धाटन करण्यात आलं. देशात सध्या 89 पासपोर्ट केंद्र आहेत. त्यामुळे नागरिकांची पासपोर्ट काढण्यासाठीची धावपळ कमी होत आहे. काहीच दिवसांपूर्वी कोल्हापुरात पोस्ट ऑफिसमध्ये पासपोर्ट मिळण्याची सुविधा सुरु झाली. परराष्ट्र सचिव ज्ञानेश्वर मुळे यांच्या हस्ते या कार्यालयाचं उद्घाटन झालं होतं. कोल्हापूर हे राज्यातलं पहिलं पोस्ट ऑफिस पासपोर्ट केंद्र ठरलं होतं. दरम्यान, पासपोर्ट काढण्यासाठी आता आधार कार्डही जन्माचा दाखला म्हणून गृहित धरणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे परदेशवारीची इच्छा बाळगणाऱ्यांसाठी पासपोर्टचा मार्ग सुकर झाला आहे. पासपोर्ट काढण्यासाठी तुम्हाला www.passportindia.gov.in या वेबसाईटवरुन अर्ज करावा लागेल. याद्वारे दररोज 50 अर्ज स्वीकारले जातील. त्या अर्जांची पोस्टातच छाननी,आणि कागदपत्रे तपासून पासपोर्ट वितरित केले जातील. संबंधीत बातम्या
कोल्हापुरात पहिलं पोस्ट ऑफिस पासपोर्ट केंद्र!
7 दिवसात पासपोर्ट मिळवण्यासाठी अर्ज कसा करावा?
7 दिवसात पासपोर्ट बनवण्यासाठी सोप्या टिप्स
औरंगाबाद, बीडमध्ये लवकरच पासपोर्ट केंद्र
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
राजकारण
भारत























