Pooja Khedkar: पूजा खेडकरच्या वडिलांच्या अडचणी वाढणार, पुणे पोलिसांनी आज चौकशीला बोलावलं, आता पुढे काय घडणार?
Pooja Khedkar: गल्लीपासून दिल्लीपर्यत चर्चेत आलेल्या पूजा खेडकरच्या अडचणी वाढल्या आहेतच. मात्र आता तिचे वडिल दिलीप खेडकरांच्या देखील अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
Pooja Khedkar: गल्लीपासून दिल्लीपर्यत चर्चेत आलेल्या पूजा खेडकरच्या (Pooja Khedkar) अडचणी वाढल्या आहेतच. मात्र आता तिचे वडिल दिलीप खेडकरांच्या देखील अडचणी वाढण्याची शक्यता आहे. आयएएस उमेदवारी रद्द केलेली आणि तत्कालीन प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर (Pooja Khedkar) हिला जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र दालन मिळावे, यासाठी दबाव आणल्याने पूजा हिचे वडील दिलीप खेडकर (Dlilip Khedkar) यांच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. तहसीलदारांनी ही तक्रार दिल्याने दिलीप खेडकर (Dlilip Khedkar) यांच्या अडचणींत आणखी वाढ झाली आहे.
आज पुणे पोलिसांनी या तहसीलदारांला जबाब नोंदवण्यासाठी बोलावण्यात आलं आहे, त्यांनी जबाब नोंदवल्यानतर दिलीप खेडकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला जाऊ शकते. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात पूजा खेडकरला स्वतंत्र दालन आणि इतर गोष्टी मिळाव्या यासाठी दिलीप खेडकरांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार आणि इतर कर्मचाऱ्यांना धमकावल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
मुळशीतील शेतकऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवल्याप्रकरणी दिलीप खेडकरांची (Dlilip Khedkar) पत्नी मनोरमा यांना नुकतीच अटक करण्यात आली होती. त्यांची जामिनावर सुटका झाली आहे. आता दिलीप यांच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज देण्यात आला आहे. याबाबत जबाब नोंदवल्यानतर त्यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.
काय आहे प्रकरण?
पूजा खेडकरला (Pooja Khedkar) जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र दालन मिळावं, कार्यालयातील कामकाजात शिपाई उपलब्ध करून देण्यासाठी दिलीप खेडकरांनी (Dlilip Khedkar) कर्मचाऱ्यांवर दबाव टाकला होता. याप्रकरणी तहसीलदार दीपक आकडे यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे. त्यांनी दिलेल्या दोन पानी तक्रार अर्जाची चौकशी सुरू करण्यात आलेली आहे. दीपक आकडे यांना जबाब नोंदविण्यासाठी आज (बुधवारी) बंडगार्डन पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले होते. मात्र ते काल जाऊ शकले नाहीत.
प्रशिक्षण काळात पूजा खेडकरने (Pooja Khedkar) स्वतंत्र दालनाची मागणी केली होती. तसेच कारला अंबर दिवा आणि महाराष्ट्र शासन अशी पाटी लावली. पूजा खेडकरच्या मागण्यांविरोधात तक्रार जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्याकडे करण्यात आली. त्यानंतर दिवसे यांनी याबाबतचा अहवाल राज्य शासनाकडे पाठवला. त्यानंतर पूजा खेडकर आणि कुटुंबाचे एक-एक कारनामे समोर येऊ लागले आहेत.
पूजा खेडकरला २ दिवसांत मिळणार आदेशाची प्रत
पूजा खेडकरची उमेदवारी रद्द करण्याच्या आदेशाची प्रत तिला दोन दिवसात देण्यात येईल, असे केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) बुधवारी दिल्ली उच्च न्यायालयात सांगितले आहे. यूपीएससीचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायमूर्ती ज्योती सिंह यांनी खेडकर हिची उमेदवारी रद्द करण्यात आल्याच्या प्रसिद्धीपत्रकाला आव्हान देणारी याचिका काल (बुधवारी) निकाली काढली.