एक्स्प्लोर

मोठी बातमी! भाजपचं पुन्हा एकदा धक्कातंत्र, उपराष्ट्रपतीपदासाठी महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या नावाची घोषणा

भाजपनं उपराष्ट्रपती पदासाठी महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांचं नाव निश्चित केलं आहे. सीपी राधाकृष्णन यांना एनडीएनं उमेदवारी जाहीर केली आहे

नवी दिल्ली : उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांच्या राजीनाम्यानंतर भाजपकडून (BJP) उपराष्ट्रपतीपदासाठीची उमेदवारी कोणाला दिली जाईल, याची चर्चा देशभरात रंगली होती. अखेर भाजपने पुन्हा एकदा धक्कातंत्र देत उपराष्ट्रपदीपदासाठी महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्या नावाची घोषणा केली. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (JP nadda) यांनी राधाकृष्णन हे भाजपचे उपराष्ट्रपदीपदाचे उमेदवार असतील, असे जाहीर केले. त्यामुळे, आता महाराष्ट्राच्या राज्यपालपदी कोणाला संधी मिळणार याची उत्सुकता महाराष्ट्राला लागली आहे. 

भाजपनं उपराष्ट्रपती पदासाठी महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांचं नाव निश्चित केलं आहे. सीपी राधाकृष्णन यांना एनडीएनं उमेदवारी जाहीर केली आहे. यापूर्वीचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड हे देखील राज्यपाल पदावरुन उपराष्ट्रपती बनले होते. सीपी राधाकृष्णन हे मूळचे तामिळनाडूचे आहेत. सीपी राधाकृष्णन हे झारखंडचे राज्यपाल देखील होते, यापूर्वी ते तेलंगणाचे राज्यपाल आणि पुद्दुचेरीचे नायब राज्यपाल म्हणून कार्यरत होते.  सीपी राधाकृष्णन हे दोनवेळा लोकसभेवर निवडून आले होते, अशी माहिती भाजप नेते जे. पी. नड्डा यांनी दिली. दरम्यान, बिहारमधील हिंदुस्थानी आवाम मोर्चा पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री जितन राम मांझी यांनीही ट्विट करत राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्या नावाला आपला पाठिंबा असल्याचे जाहीर केले आहे. 

राधाकृष्णन यांना संधी का?

भाजप पक्षाच्यावतीने आज उच्चस्तरीय नेत्यांनी उपराष्ट्रपतीपदासाठी पुन्हा एकदा बैठक घेण्यात आली. या बैठकीत एनडीएचा उमेदवार कोण असणार याबाबत चर्चा झाली. माध्यमांच्या वृत्तानुसार दिल्लीचे नायब राज्यपाल वीके सक्सेना, बिहारचे राज्यपाल अरिफ मोहम्मद खान यांची नावं या बैठकीत आघाडीवर होते. याशिवाय गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत, कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत, सिक्कीमचे राज्यपाल ओम माथूर आणि जम्मू काश्मीरचे राज्यपाल मनोज सिन्हा यांची नावं देखील चर्चेत होती. मात्र, भाजपने पुन्हा एकदा नवं धक्कातंत्र देत महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांचे नाव एनडीएचे उमेदवार म्हणून जाहीर केले. राधाकृष्णन हे मूळचे तामिळनाडूचे असून पुढील वर्षी तामिळनाडूच्या विधानसभा निवडणुका होत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर भाजपकडून राधाकृष्णन यांना संधी देण्यात आल्याचाही राजकीय अंदाज बांधला जात आहे. 

उमेदवारी अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 ऑगस्ट

जगदीप धनखड यांनी 21 जुलै रोजी उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला. यानंतर निवडणूक आयोगाकडून उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख 21 ऑगस्ट आहे. त्यापूर्वी एनडीएला उमेदवार निश्चित करावा लागेल. उपराष्ट्रपतींच कार्यकाळ 5 वर्षांचा असतो. जगदीप धनखड यांनी वैद्यकीय कारण देत राजीनामा दिला होता. केंद्र सरकारचा न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या विरुद्धचा महाभियोग प्रस्ताव स्वीकारण्यावरुन जगदीप धनखड आणि केंद्र सरकारमध्ये मतभेद झाले होते.

महेश गलांडे एबीपी माझा डिजिटलमध्ये डेप्युटी प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. पत्रकारितेत एकूण 13 वर्षे आणि डिजिटल पत्रकारितेत 11 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठिशी आहे. यापूर्वी ईटीव्ही मराठी, लोकमत या माध्यम संस्थांमध्ये त्यांनी काम पाहिलं असून राजकीय लेखन, सामाजिक विषयाची जाण व भान आहे. 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Supreme Court Form 6 : 'फॉर्म 6' मधील बदलाला सुप्रीम कोर्टाची मान्यता नाही, ECI च्या दाव्यावर CJI सूर्यकांत यांनी ठणकावले, काय आहे वाद?
'फॉर्म 6' मधील बदलाला सुप्रीम कोर्टाची मान्यता नाही, ECI च्या दाव्यावर CJI सूर्यकांत यांनी ठणकावले, काय आहे वाद?
'वृत्तपत्रातील बातमीवर बोलताय..' सुप्रीम कोर्टाचा ज्ञानेश कुमारांविरोधात तत्काळ कारवाईस नकार, अंतरिम आदेश सुद्धा नाही, निवडणूक आयोगाला नोटीस
'वृत्तपत्रातील बातमीवर बोलताय..' सुप्रीम कोर्टाचा ज्ञानेश कुमारांविरोधात तत्काळ कारवाईस नकार, अंतरिम आदेश सुद्धा नाही, निवडणूक आयोगाला नोटीस
Sanjay Raut: फडणवीसांच्या राजकारणाला उतरती कळा लागली, अमित शाह अंडरग्राऊंड झालेत; संजय राऊतांचा सडकून प्रहार
फडणवीसांच्या राजकारणाला उतरती कळा लागली, अमित शाह अंडरग्राऊंड झालेत; संजय राऊतांचा सडकून प्रहार
Nirmala Sitharaman: अर्थमंत्री निर्मला सीतारमण भाषणाला उभ्या राहिल्या अन् अचानक जोरदार घोषणाबाजी; नंतर चंद्राबाबू नायडूंनी स्वतः माईक हाती घेतला अन्..., नेमकं काय घडलं?
अर्थमंत्री निर्मला सीतारमण भाषणाला उभ्या राहिल्या अन् अचानक जोरदार घोषणाबाजी; नंतर चंद्राबाबू नायडूंनी स्वतः माईक हाती घेतला अन्..., नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

CEC Gyanesh Kumar Case : ज्ञानेश कुमारांविरोधात सुनावणी, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
Sharad Koli Arrested : ठाकरेंच्या शिनसेनेचे उपनेते शरद कोळींना पोलिसांनी घेतलं ताब्यात | ABP Majha
Pune MPSC Protest : एमपीएससीचे आंदोलन, राजकारण्यांचा आखाडा? | Special Report ABP Majha
Raj Thackeray & India Alliance : 'इंडिया'ला मनसेचं इंजिन? | Special Report ABP Majha
Raj Thackeray Garjan Morcha Speech : SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या, राज ठाकरे कडाडले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BJP Yuva Morcha Team : भाजप युवा मोर्चाची नवी टिम, 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी; शंभवी साळेकडे मोठी जबाबदारी, पाहा जिल्हानिहाय यादी
भाजप युवा मोर्चाची नवी टिम, 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी; शंभवी साळेकडे मोठी जबाबदारी, पाहा जिल्हानिहाय यादी
Video: मी तुमच्या रागात सामिल व्हायला आलोय; राज ठाकरेंचा पुण्यातील MPSC आंदोलनात सहभाग, सांगितली 'मन की बात'
Video: मी तुमच्या रागात सामिल व्हायला आलोय; राज ठाकरेंचा पुण्यातील MPSC आंदोलनात सहभाग, सांगितली 'मन की बात'
Ravindra Chavan : नागपूर पदवीधरमध्ये बंडखोरी करत अनिल सोलेंकडून अर्ज दाखल, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण सोले यांच्या घरी पोहोचले पण...
नागपूर पदवीधरमध्ये बंडखोरी करत अनिल सोलेंकडून अर्ज दाखल, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण थेट सोले यांच्या घरी पोहोचले पण...
Modi Cabinet Reshuffle : मोदी मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाचे वारे, दोन बड्या मंत्र्यांची गच्छंती निश्चित, श्रीकांत शिंदेंना लॉटरी लागणार?
मोदी मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाचे वारे, दोन बड्या मंत्र्यांची गच्छंती निश्चित, श्रीकांत शिंदेंना लॉटरी लागणार?
शॉकींग! इंजिनिअरिंगच्या विद्यार्थीनीवर दोघांचा सामूहिक अत्याचार; गुंगीचं औषध देऊन लॉजवर नेलं, नराधमांना अटक
शॉकींग! इंजिनिअरिंगच्या विद्यार्थीनीवर दोघांचा सामूहिक अत्याचार; गुंगीचं औषध देऊन लॉजवर नेलं, नराधमांना अटक
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 ऑक्टोबर 2026 | सोमवार
मुंबईच्या गोरेगाव फिल्म सिटी परिसरात मोठी आग; अग्निशमनच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल
मुंबईच्या गोरेगाव फिल्म सिटी परिसरात मोठी आग; अग्निशमनच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल
संभाजीनगर पदवीधरची लढाई ठरली; ठाकरेंकडून दिलीप घुगे अन् राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण आमनेसामने, राजकीय खलबतं
संभाजीनगर पदवीधरची लढाई ठरली; ठाकरेंकडून दिलीप घुगे अन् राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण आमनेसामने, राजकीय खलबतं
Embed widget