एक्स्प्लोर

Vice President Election : उपराष्ट्रपती पदाची निवडणूक बिनविरोध करण्याचा NDA चा प्रयत्न, राजनाथ सिंह यांचा मल्लिकार्जून खरगे यांना फोन, सूत्रांची माहिती

Vice President Election : एनडीएनं आगामी उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांचं नाव जाहीर केलं आहे.

नवी दिल्ली : उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी एनडीएनं महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांचं नाव जाहीर केलं आहे. भाजप अध्यक्ष केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांसोबत आमच्या पक्षातील वरिष्ठांची भेट झालेली आहे, चर्चा सुरु आहेत, असं म्हणत एनडीए उपराष्ट्रपती पदाची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करेल असे संकेत दिले होते. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जून खरगे यांच्याशी फोनवरुन संपर्क केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसंदर्भात राजधानी नवी दिल्लीत घडामोडी वाढल्या आहेत. उद्या इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे, अशी माहिती आहे. 

राजनाथ सिंह यांचा मल्लिकार्जून खरगे यांना फोन

भाजपनं सीपी राधाकृष्णन यांचं उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून जाहीर केलं आहे. भाजप आणि एनडीएची बैठक पार पडल्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांना फोन केल्याची माहिती आहे. राजनाथ सिंह यांनी एनडीएच्या वतीनं ही निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून खर्गे यांना फोन केला. मल्लिकार्जून खरगे यांनी इंडिया आघाडीतील घटकपक्षांच्या नेत्यांसोबत चर्चा करणार असल्याचं सांगितल्याची माहिती आहे. इंडिया आघाडीची उद्या बैठक होणार आहे. उद्या सकाळी इंडिया आघाडीची बैठक होईल त्या बैठकीत उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीबाबत चर्चा होईल.

सत्ताधारी एनडीएचा प्रयत्न उपराष्ट्रपती पदाची निवडणूक बिनविरोध व्हावी, असा प्रयत्न आहे. उद्या सकाळपर्यंत इंडिया आघाडीचा उपराष्ट्रपती पदा संदर्भातील निर्णय स्पष्ट होईल. 

जेपी नड्डा यांचे देखील बिनविरोधचे संकेत

भाजप अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांनी सीपी राधाकृष्णन यांचं नाव जाहीर केल्यानंतर उपराष्ट्रपती पदाची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी पक्षातर्फे प्रयत्न केला जाईल, असं म्हटलं. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची मुदत 21 ऑगस्ट आहे, तर मतदानाची तारीख 9 सप्टेंबर आहे. 

जेपी नड्डा म्हणाले की आम्ही विरोधी पक्षांसोबत चर्चा करु, उपराष्ट्रपती पदाची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आम्हाला त्यांच्याकडून पाठिंबा मिळेल, अशी अपेक्षा आहे. अगोदर सांगितल्याप्रमाणं आम्ही त्यांच्या संपर्कात आहोत, आमच्या वरिष्ठ नेत्यांनी विरोधकांसोबत अगोदरच संपर्क केला आहे, आम्ही त्यांच्या संपर्कात राहू, एनडीएतील आमच्या सहकाऱ्यांनी आम्हाला पाठिंबा दिलाय, असं जेपी नड्डा यांनी म्हटलं आहे. एनडीएकडे उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी आवश्यक असलेले संख्याबळ आहे. एनडीएचं संख्याबळ 427 इतकं आहे.  

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe: महाप्रसाद, लंगर, भंडाऱ्यांमधील अन्नाची गुणवत्ता आता रडारवर; तुकाराम मुंढेंनी सर्वधर्मीयांच्या सणासाठी जारी केला थेट ‘स्थायी आदेश’
महाप्रसाद, लंगर, भंडाऱ्यांमधील अन्नाची गुणवत्ता आता रडारवर; तुकाराम मुंढेंनी सर्वधर्मीयांच्या सणासाठी जारी केला थेट ‘स्थायी आदेश’
Devendra Fadnavis on Vidyanand Bapat : पुण्यात विद्यानंद बापट यांना मारहाण, देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
पुण्यात विद्यानंद बापट यांना मारहाण, देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
CJP Controversy : सीजेपीमध्ये मोठी फूट, विरोधात आता CJP D पक्षाची घोषणा; म्हणाले, अभिजीत दिपकेने टीममध्ये मैत्रिणी...
सीजेपीमध्ये मोठी फूट, विरोधात आता CJP D पक्षाची घोषणा; म्हणाले, अभिजीत दिपकेने टीममध्ये मैत्रिणी...
Devendra Fadnavis on Eknath Shinde and Ganesh Naik: एकनाथ शिंदे की गणेश नाईक, सर्वात समजूतदार कोण वाटतं? देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'माझ्यासारख्या छोट्या नेत्याला...'
एकनाथ शिंदे की गणेश नाईक, सर्वात समजूतदार कोण वाटतं? देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'माझ्यासारख्या छोट्या नेत्याला...'

व्हिडीओ

Majha Infra Vision Mahendra Kalyankar: धारावीमधील झोपडपट्टी धारकांना 350 चौरस फूट घरे मोफत; महेंद्र कल्याणकर काय म्हणाले?
Majha Infra Vision Nitesh Rane: जिहादमुक्त किनारपट्टी, वाढवण बंदर, दिशा सालियान; नितेश राणे UNCUT
Manoj Jarange Jalna : प्रसाद लाड यांच्याकडून पाणी प्यायले, पण मनोज जरांगे उपोषणावर ठाम
Sandeep Deshpande Mumbai : दुसऱ्यांना पप्पू म्हणता, आम्ही तुम्हाला फेकू म्हटलं तर राग येईल ना?
Ravindra Chavan News: अमित ठाकरेंच्या विरोधात भाजपने केलेल्या आंदोलनावर रवींद्र चव्हाणांची नापसंती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dharashiv : धाराशिवमध्ये आईची तीन मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरून उडी; माय-लेकाचा मृत्यू, दोन चिमुकल्या गंभीर
धाराशिवमध्ये आईची तीन मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरून उडी; माय-लेकाचा मृत्यू, दोन चिमुकल्या गंभीर
CJP Controversy : सीजेपीमध्ये मोठी फूट, विरोधात आता CJP D पक्षाची घोषणा; म्हणाले, अभिजीत दिपकेने टीममध्ये मैत्रिणी...
सीजेपीमध्ये मोठी फूट, विरोधात आता CJP D पक्षाची घोषणा; म्हणाले, अभिजीत दिपकेने टीममध्ये मैत्रिणी...
Tukaram Mundhe: महाप्रसाद, लंगर, भंडाऱ्यांमधील अन्नाची गुणवत्ता आता रडारवर; तुकाराम मुंढेंनी सर्वधर्मीयांच्या सणासाठी जारी केला थेट ‘स्थायी आदेश’
महाप्रसाद, लंगर, भंडाऱ्यांमधील अन्नाची गुणवत्ता आता रडारवर; तुकाराम मुंढेंनी सर्वधर्मीयांच्या सणासाठी जारी केला थेट ‘स्थायी आदेश’
Devendra Fadnavis on Vidyanand Bapat : पुण्यात विद्यानंद बापट यांना मारहाण, देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
पुण्यात विद्यानंद बापट यांना मारहाण, देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Rich Dad Poor Dad चे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांच्यावर किती कोटींचं कर्ज? आकडेवारी सांगत कर्जाबाबत म्हणाले...
Rich Dad Poor Dad चे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांच्यावर किती कोटींचं कर्ज? कर्जाबाबत म्हणाले...
Nagpur DJ Ban : इकडे DJ वरुन पुण्यात गोंधळ, तिकडे नागपुरात डॉल्बी साऊंड सिस्टिमवर बंदी, विश्वास नांगरे पाटलांचा धडाकेबाज निर्णय
इकडे DJ वरुन पुण्यात गोंधळ, तिकडे नागपुरात डॉल्बी साऊंड सिस्टिमवर बंदी, विश्वास नांगरे पाटलांचा धडाकेबाज निर्णय
... तर साखर कारखाने बंद होतील, एकही कारखाना शेतकऱ्यांना FRP देऊ शकणार नाही, नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री? 

Embed widget