एक्स्प्लोर

धक्कादायक! 200 फूट खोल दरीत भाविकांचा ट्रॅक्टर कोसळला, दोन जणांचा मृत्यू तर 13 जण जखमी 

नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथील पिनाकेश्वर महादेव मंदिर येथून दर्शन घेऊन परतत असतांना पिनाकेश्वर घाटात भाविकांची ट्रॅक्टर-ट्रॉली सुमारे दोनशे फूट खोल दरीत कोसळल्याची घटना घडली आहे.

Nashik Accident : नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथील पिनाकेश्वर महादेव मंदिर येथून दर्शन घेऊन परतत असतांना पिनाकेश्वर घाटात भाविकांची ट्रॅक्टर-ट्रॉली सुमारे दोनशे फूट खोल दरीत कोसळल्याची घटना घडली आहे. यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर 13 भाविक जखमी झाले आहेत. अपघातानंतर स्थानिक नागरिक व  पोलिसांनी तत्काळ मदतकार्य करत भाविकांना बाहेर काढले. दरम्यान, दुसरीकडे लातूरमध्येही तुटलेल्या विद्युत तारेचा शॉक लागून लातूर जिल्ह्यात शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. 

दरम्यान, या अपघातात जखमी झालेल्यांना बोलठाण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात  प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी संभाजीनगर येथे हलवण्यात आले आहे. अपघातातील मृत व जखमी हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जाणेफळ व खामगाव येथील रहिवासी होते.

महावितरणचे दुर्लक्ष; तुटलेल्या विद्युत तारेचा शॉक लागून लातूर जिल्ह्यात शेतकऱ्याचा मृत्यू

लातूर तालुक्यातील हंचनाळ येथील शेतकरी अशोक भानुदास बिरादार (वय 48 ) यांचा रविवारी दुपारी शेतात तुटलेल्या विद्युत तारेचा शॉक लागून मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, ग्रामस्थांनी महावितरणच्या निष्काळजीपणावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. गेल्या दोन दिवसांपासून वादळी पावसाने तालुक्यातील अनेक भागात हजेरी लावली होती. अनेक ठिकाणी विद्युत खांब कोसळले, तर काही ठिकाणी विद्युत तारा जमिनीवर पडल्या होत्या . तरीदेखील महावितरणने अशा ठिकाणी वेळीच वीजपुरवठा बंद केला नाही, अशी गंभीर चूक झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. रविवारी दुपारी अशोक बिरादार हे शेतात गेले होते. मात्र संध्याकाळपर्यंत ते घरी परतले नाहीत. मोबाईलवर संपर्क साधूनही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे घरच्यांनी शेताकडे धाव घेतली असता, तेथे त्यांच्या हातात विद्युत तार अडकलेली दिसली. ते बेशुद्धावस्थेत पडलेले आढळले. तातडीने त्यांना अंबुलगा बु येथील शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. परंतु डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.

या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शेतकरी बिरादार यांचा मृत्यू महावितरणच्या निष्काळजीपणामुळे झाल्याचे ग्रामस्थांचे ठाम म्हणणे आहे. वीजवाहिनी तुटून जमिनीवर पडली असूनही, त्या भागात वीजपुरवठा खंडित केला गेला नव्हता. "हे थेट दुर्लक्ष असून, याची जबाबदारी महावितरणचीच आहे," असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.  गावकऱ्यांनी घटनेनंतर महावितरणच्या अधिकाऱ्यांविरोधात संताप व्यक्त केला. अशा प्रकारे निष्काळजीपणामुळे निर्दोष शेतकऱ्याचा जीव गेला असून, मयतच्या कुटुंबीयांना तात्काळ आर्थिक मदत आणि दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

महत्वाच्या बातम्या:

चंद्रपुरात नदीत बुडून दोघांचा मृत्यू; भंडाऱ्यात दुचाकीच्या अपघातात मुलगा ठार, वडिल गंभीर


 

महत्त्वाच्या बातम्या

नाशिकमध्ये अमृत भारत एक्स्प्रेसच्या डब्यात कारवाई, 1 कोटी 48 लाखांच्या रोकडसह संशयित व्यक्ती ताब्यात
नाशिकमध्ये अमृत भारत एक्स्प्रेसच्या डब्यात कारवाई, 1 कोटी 48 लाखांच्या रोकडसह संशयित व्यक्ती ताब्यात
Kumbh Mela 2026 : कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर परिसरात भूकंपाचा विशेष अभ्यास सुरू! चार यंत्रांद्वारे सलग तीन महिने 24 तास भूगर्भातील हालचालींवर लक्ष
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर परिसरात भूकंपाचा विशेष अभ्यास सुरू! चार यंत्रांद्वारे सलग तीन महिने 24 तास भूगर्भातील हालचालींवर लक्ष
दिवाळीसाठी पाहुण्यांकडे आले, ह्रदयद्रावक दुर्घटना; वडिलांसह दोन मुलींचा धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू
दिवाळीसाठी पाहुण्यांकडे आले, ह्रदयद्रावक दुर्घटना; वडिलांसह दोन मुलींचा धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू
Rupali Chakankar and Ashok Kharat: तुम्ही बुवाबाजीच्या विरोधात मग अशोक खरातला गुरु का मानलं? रुपाली चाकणकरांनी सांगितलं कारण, म्हणाल्या...
तुम्ही बुवाबाजीच्या विरोधात मग अशोक खरातला गुरु का मानलं? रुपाली चाकणकरांनी सांगितलं कारण, म्हणाल्या...

व्हिडीओ

Rahul Gandhi Phone Tapping Case : वादविवादाचं आवतण 'फोन टॅपिंग'चा बाण | Special Report ABP Majha
Microsoft Outage Today : मायक्रोसॉफ्ट गंडलं, कामकाज कोलमडलं | Special Report ABP Majha
Satej Patil Coffee With Kaushik: शांत झालेल्या गोकुळमध्ये पवारांची एन्ट्री, सतेज पाटलांचे गौप्यस्फोट
Sanjay Raut PC : शरद पवार गट चर्चेलाच तयार नाही, मग सुनेत्रा पवार विलीनीकरण कोणासोबत करणार?
Hasan Mushrif PC Kolhapur : संजय राऊतांनी आमच्यापक्षात नाक खुपसू नये, हसन मुश्रीफांचा इशारा

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sinhagad Technical Educational Institute: सिंहगड संस्था गैरकारभार प्रकरण; मारुती नवले यांच्यासह विश्वस्तांना पुणे सोडण्यास मनाई, सीबीआय, ईडी चौकशीचे आदेश, न्यायलयाने ओढले ताशेरे
सिंहगड संस्था गैरकारभार प्रकरण; मारुती नवले यांच्यासह विश्वस्तांना पुणे सोडण्यास मनाई, सीबीआय, ईडी चौकशीचे आदेश, न्यायलयाने ओढले ताशेरे
SIR Maharashtra : राज्यातील 1.22 कोटी मतदारांना मोठा दिलासा; 'एसआयआर' मोहिमेत कागदपत्रांची पूर्तता केल्याने 99.94 टक्के मतदारांची नावे यादीत कायम
राज्यातील 1.22 कोटी मतदारांना मोठा दिलासा; 'एसआयआर' मोहिमेत कागदपत्रांची पूर्तता केल्याने 99.94 टक्के मतदारांची नावे यादीत कायम
NCP Merger: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र नको, अन्यथा...; राष्ट्रवादीच्या विलीनीकरणात सुनेत्रा पवारांना अडचण?, भाजपला कोणता प्रस्ताव दिला?, वेगळीच माहिती समोर
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र नको, अन्यथा...; राष्ट्रवादीच्या विलीनीकरणात सुनेत्रा पवारांना अडचण?, भाजपला कोणता प्रस्ताव दिला?, वेगळीच माहिती समोर
Vasai-Virar Railway Accident News: वसई-विरार रेल्वे मार्गावर मृत्यूचे सत्र! अवघ्या 24 तासांत पाच जणांचा मृत्यू; प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
वसई-विरार रेल्वे मार्गावर मृत्यूचे सत्र! अवघ्या 24 तासांत पाच जणांचा मृत्यू; प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
NCP Merger: दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांना वेगळं वेळण; शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून NDA प्रवेशाची चाचपणी, नेमकं काय काय घडतंय?
दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांना वेगळं वेळण; शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून NDA प्रवेशाची चाचपणी, नेमकं काय काय घडतंय?
Chhatrapati Sambhajinagar Bus Accident: छत्रपती संभाजीनगरमध्ये बसचा भीषण अपघात; पुलाचा कठडा तोडून बस खाली कोसळली, हादरवणारे 5 फोटो
छत्रपती संभाजीनगरमध्ये बसचा भीषण अपघात; पुलाचा कठडा तोडून बस खाली कोसळली, हादरवणारे 5 फोटो
Chandrakant Patil : बावड्यातील डी वाय पाटील महाविद्यालय कोणाच्या जागेवर उभे? आकुर्डीच्या जमिनीची माहिती काढा, सगळं समोर येईल; चंद्रकांत पाटलांचा सतेज पाटलांना इशारा
बावड्यातील डी वाय पाटील महाविद्यालय कोणाच्या जागेवर उभे? आकुर्डीच्या जमिनीची माहिती काढा, सगळं समोर येईल; चंद्रकांत पाटलांचा सतेज पाटलांना इशारा
Rinku Singh : 43 कोटी वाचवण्यासाठी दोन खेळाडूंना रिलीज करा,रिंकू सिंगला केकेआरचा कॅप्टन करा, माजी क्रिकेटपटूनं फॉर्म्युला सांगितला...
केकेआरनं 'त्या' दोघांना रिलीज करावे, 43 कोटी वाचवावे, रिंकूला कॅप्टन बनवा, सल्ला कोणी दिला?
Embed widget