एक्स्प्लोर

लोणावळ्यातील बंगल्यावर पोलिसांचा छापा, पार्टी करणाऱ्या सात महाभाग पर्यटकांवर कारवाई

कोरोनामुळे पर्यटनाला बंदी असताना ही, हे सात पर्यटक विनापरवाना शहरात आल्याचं निष्पन्न झालं. तर पर्यटन बंदी असताना माउंट कॉटेज बंगला भाड्याने दिल्याने मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. तर सात पर्यटकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.

पिंपरी-चिंचवड : लोणावळ्यात विनापरवाना येणारे पर्यटक पोलिसांची नजर चुकवून थेट फार्म हाऊस, रो हाऊस गाठतायेत. त्यामुळे आता पोलिसांनी त्याठिकाणी छापे टाकत कारवाई करायला सुरुवात केलीये. सोमवारी रात्री अकरा वाजता गोल्ड व्हॅली येथील माउंट कॉटेज बंगल्यावर पोलिसांनी धाड टाकत सात पर्यटकांना ताब्यात घेतलं. तर बंगल्याच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला.

मुंबईहून दोन रिक्षात हे सात पर्यटक लोणावळ्यात दाखल झाले होते. पोलिसांची नजर चुकवत त्यांनी गोल्ड व्हॅली गाठली आणि नंतर माउंट कॉटेज बंगल्यात प्रवेश केला. सोमवारी सायंकाळी आलेल्या या महाभागांनी नंतर पार्टी सुरू केली. दारूच्या बाटल्या ही फुटल्या. बाहेर पोलिसांचं पेट्रोलिंग सुरूच होतं, तेंव्हा बाहेरील दोन रिक्षा आढळल्या. रात्रीची वेळ असल्याने पोलिसांनी जवळ जाऊन पाहिलं असता एमएच 43 अर्थात मुंबईच्या वाशीतील रिक्षा असल्याचं निष्पन्न झालं. पार्टीत दंग असणाऱ्या महाभागांना बाहेर पोलीस आल्याचा थांगपत्ता ही नव्हता. पेट्रोलिंग कर्मचाऱ्यांना वरिष्ठांना कल्पना दिली. ते घटनास्थळी पोहचताच या पर्यटकांचं बिंग फुटलं. कोरोनामुळे पर्यटनाला बंदी असताना ही, हे सात पर्यटक विनापरवाना शहरात आल्याचं निष्पन्न झालं. तर पर्यटन बंदी असताना माउंट कॉटेज बंगला भाड्याने दिल्याने मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. तर सात पर्यटकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पर्यटनस्थळी अद्याप ही बंदी आहे. तरी ही पुण्यातील थंड हवेचे ठिकाण असलेल्या लोणावळ्यात पर्यटकांचा मुक्त संचार दिसून येतोय. भुशी धरण, टायगर पॉईंट, लायन्स पॉईंटसह विविध पॉइंटवर विनापरवाना पर्यटकांची गर्दी दिसून येत होती. वर विनामास्क फिरत सोशल डिस्टन्सिंगचा ही फज्जा उडवू लागले. त्यामुळे अशा पर्यटकांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. शिवाय पुणे-मुंबईहून विनापरवाना लोणावळ्यात येणाऱ्यांना चांगलीच तंबी दिली. त्यानंतर काही दिवस पर्यटकांनी लोणावळ्यात जाणं टाळलं. पण कालांतराने काही महाभाग पुन्हा वर तोंड करून लोणावळ्यात वावरू लागले.

पर्यटन बंदीचा कायदा मोडणाऱ्या 300 हून अधिक महाभागांवर पोलिसांनी आत्तापर्यंत गुन्हे दाखल केलेत, तर विनामास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवणाऱ्या 589 पर्यकटांवरही कारवाईचा बडगा उगरण्यात आलाय. पैकी 270 खटल्यात मावळ न्यायालयाने 2 लाख 63 हजरांचा दंड ठोठावला आहे. बाहेर भटकल्यानंतर पोलीस कारवाई करतायेत म्हणून पर्यटक थेट फार्म हाऊस अथवा रो हाऊस गाठू लागले. पण या पर्यटकांना हेही महागात पडलं. कारण पोलिसांनी आता अशा ठिकाणीही धाडी टाकत कारवाईला सुरुवात केलीय. सोमवारच्या रात्री माउंट कॉटेज बंगल्यावर झालेली कारवाई करत पोलिसांनी पर्यटकांना थेट इशाराच दिलाय.

पाऊस जोर धरू लागलाय, त्यामुळे पुणे-मुंबईतील पर्यटक पर्यटनस्थळी येण्याचे नियोजन करतायेत. त्यांनी लोणावळ्यात येण्याची चूक करू नये. कारण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पर्यटनावर बंदी आहे. ही बंदी झुगारून तुम्ही आलात तर तुमच्यावर खटले दाखल केले जातील. त्यामुळे घरीच सुरक्षित रहा, असं आवाहन लोणावळा पोलीस निरीक्षक मनोज यादव यांनी केलंय.

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime News: स्वातंत्र्यदिनी सिंहगडावर पर्यटकांची तुफान गर्दी; दोन गटांत तुंबळ हाणामारी, एकानं भाला दगड उचलला अन्...; नेमकं काय घडलं?
स्वातंत्र्यदिनी सिंहगडावर पर्यटकांची तुफान गर्दी; दोन गटांत तुंबळ हाणामारी, एकानं भाला दगड उचलला अन्...; नेमकं काय घडलं?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Chakan MIDC: उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
सोमेश्वर साखर कारखान्याचा महाराष्ट्रात डंका, उसाला दिला 4 हजार रुपयांचा विक्रमी दर, FRP पेक्षा 515 रुपये अधिक
सोमेश्वर साखर कारखान्याचा महाराष्ट्रात डंका, उसाला दिला 4 हजार रुपयांचा विक्रमी दर, FRP पेक्षा 515 रुपये अधिक

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
OBC Reservation Sarpanch: ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
Palghar Blast Tarapur: तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
Prasad Oak On Ajit Pawar Biopic: मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक गंमतीशीरपणे नेमकं काय म्हणाला?
मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक नेमकं काय म्हणाला?
Kolhapur School Road Crisis: चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
Latur Crime News: आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
Kolhapur Crime: एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
Embed widget