एक्स्प्लोर
Advertisement
पुणे मेट्रोच्या नव्या प्रकल्पाला पीएमआरडीएचा हिरवा कंदील
पुणे : पुण्यातील शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो प्रकल्पाला आज पीएमआरडीएच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज पीएमआरडीएची बैठक झाली. यावेळी पालकमंत्री गिरीष बापटही उपस्थित होते.
शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो प्रकल्पासाठी 7 हजार 947 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या प्रकल्पासाठी 20 टक्के निधी केंद्र सरकार, 14 टक्के निधी राज्य सरकार, समभागातून 21 टक्के अशा प्रकारे उभारला जाणार आहे, तर उरलेल्या निधीसाठी कर्ज काढलं जाणार आहे.
पुणे मेट्रोच्या या 23.33 किमी टप्पाच्या मार्गात 23 मेट्रो स्थानकांचा समावेश असेल. चार वर्षांमध्ये हा प्रकल्प पूर्ण करण्याचा मानस सरकारचा आहे. आज पीएमआरडीएच्या बैठकीत मान्यतेनंतर हा प्रस्ताव राज्य सरकारकडे आणि त्यानंतर केंद्रीय नगरविकास विभागाकडे पाठवण्यात येईल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement