एक्स्प्लोर

Pune : PMPML चालकांनो, हेडफोन विसरा नाहीतर नोकरी जाणार; ड्रायव्हिंग करत असताना मोबाईल पाहिल्यास निलंबनाची कारवाई

Pune News : काही चालक बस चालवत असताना सर्रास मोबाईल किंवा हेडफोनचा वापर करत असल्याच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. त्यावर PMPML संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला.

पुणे : पीएमपीएमएल चालकांसाठी एक महत्त्वाची बातमी असून ड्रायव्हिंग करताना मोबाईल-हेडफोन (Mobile Phone) वापरास बंदी घालण्यात आली आहे. या नियमाचे उल्लंघन केल्यास थेट निलंबनाची (Immediate Suspension) कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पीएमपीएमएलच्या संचालक मंडळाच्या बैठकीत वाहतूक सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हा मोठा निर्णय घेतला आहे.

प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडची (PMPML) बैठक 4 सप्टेंबर रोजी पार पडली. त्यामध्ये पीएमपीएमएल बसचे काही चालक हे कानाला हेडफोन लावून बस चालवत असल्याच्या अनेक तक्रारी आल्या. यावर रीजनल ट्रान्सपोर्ट ऑफिसर (Regional Transport Officer) आणि PMPML चे संचालक (Director) यांनी अशा चालकांच्या असुरक्षित वर्तनाबाबत गंभीर चिंता व्यक्त केली.

काही चालक बस चालवताना मोबाईलवर बोलत असल्याचे किंवा हेडफोन वापरत असल्याचे अनेक प्रकरणे समोर आली आहेत. या नियमभंगामुळे एक अपघातही झाला होता, त्यामुळे अधिकाऱ्यांनी त्यावर संताप व्यक्त केला आहे.

Pune PMPML Oder : नवीन आदेशात काय म्हटलंय?

  • बस चालकांना (Bus Drivers) त्यांचामोबाईल फोन कॉन्डक्टरकडे (Conductor) सुपूर्द करावा लागेल, आणि ड्यूटी संपेपर्यंत त्यांना मोबाईल परत मिळणार नाही.
  • हा नियम पाळला नाही तर अशा चालकांचे त्वरित निलंबन केले जाईल.
  • हा आदेश PMPML अंतर्गत कार्यरत खाजगी बस कंत्राटदारांवर (Private Bus Contractors) ही लागू होतो. डिपो व्यवस्थापक (Depot Managers) याची काटेकोर दक्षता घ्यायला सांगितली आहे.

PMPML प्रशासनाने सर्व चालकांना जबाबदारीपूर्वक बस चालवण्याचे आणि नियम काटेकोर पाळण्याचे आवाहन केले आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

ही बातमी वाचा:

शिवानी पांढरे
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Modi Donald Trump : एकीकडे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डीलवर चर्चा सुरु, नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले
नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले..
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
Umar Khalid : उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
Amit Shah: मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?

व्हिडीओ

Uddhav Thackeray On Amit Shah : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा अमित शाहांवर वार
Uddhav Thackeray PC FULL : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा Amit Shah यांच्यावर वार
Mahapalikecha Mahasangram Bhiwandi : पाणी, रस्ते,आरोग्य... मूलभूत सुविधांची वानवा ; भिवंडीकर आक्रमक
Mahapalikecha Mahasangram Amravati : भावी नगरसेवकांकडून अमरावतीकरांच्या अपेक्षा काय?
Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narendra Modi Donald Trump : एकीकडे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डीलवर चर्चा सुरु, नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले
नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले..
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
Umar Khalid : उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
Amit Shah: मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
Eknath Shinde: मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मोठी बातमी! केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध हक्कभंग ; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या
मोठी बातमी! केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध हक्कभंग ; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
Embed widget