एक्स्प्लोर

सोशल मीडियावर दहशत माजविणाऱ्या भाईंचा माज उतरविणारा पिंपरी पोलिसांचा 'नवा पॅटर्न'

पिंपरी चिंचवड पोलिसांनी सोशल मीडियावर दहशत माजविणाऱ्या भाईंचा माज उतरविण्यासाठी आता सोशल मीडियाचाच आधार घेतलाय.

पिंपरी चिंचवड : शहरातील स्वयंघोषित भाईंकडून सोशल मीडियावर दहशत माजविण्याचा नवा पायंडा पडलाय. पण हा पायंडा मोडीत काढून, या स्वयंघोषित भाईंची मस्ती उतरविण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांनी नवा पॅटर्न राबविलाय. या पॅटर्नमुळं या स्वयंघोषित भाईंनी पोलिसांसमोर अक्षरशः गुडघे टेकलेत.


सोशल मीडियावर दहशत माजविणाऱ्या भाईंचा माज उतरविणारा पिंपरी पोलिसांचा 'नवा पॅटर्न

"आमची सूत्र थेट येरवडा जेल मधून हलतेत, लावा ताकद" सोशल मीडियावरून विरोधी टोळींना असं आव्हान देणं असो, कुछ दिन और सही, बहोत बडा धमाका होगा, असे नमूद करत थेट पोलिसांना आव्हान देणं असो की कोयते अन् बंदुकी नाचवत फिम्ली डायलॉगबाजी असो. पिंपरी चिंचवडमध्ये सध्या सोशल मीडियाद्वारे समाजात दहशत पसरविण्याचा हा नवा पायंडा सुरु आहे. पण आता याच स्वयंघोषित भाईंचा माज पोलिसांनी देखील थेट सोशल मीडियावर उतरवायला सुरुवात केलीये.


सोशल मीडियावर दहशत माजविणाऱ्या भाईंचा माज उतरविणारा पिंपरी पोलिसांचा 'नवा पॅटर्न

कोयता, गावठी पिस्तूल नाचवत समाजात दहशत माजविणाऱ्यांना सुतासारखे सरळ करण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांनी नवी पॅटर्न तयार केलाय. पोलीस अशा स्वयंघोषित भाईंना थेट बेड्या ठोकून ते ज्या परिसरात सोशल मीडियावर दहशत पसरवितात तिथंच त्यांची वरात काढतायेत. शिवाय आधी माजविलेली दशहत अन् नंतर पोलिसांनी उतरविलेला माज असा एकत्रित व्हिडीओ बनवून, तोही सोशल मीडियावर व्हायरल केला जातोय.


सोशल मीडियावर दहशत माजविणाऱ्या भाईंचा माज उतरविणारा पिंपरी पोलिसांचा 'नवा पॅटर्न

पिंपरी चिंचवड पोलिसांनी या महिन्यात असे दहा गुन्हे दाखल केलेत. त्यात अठरा स्वयंघोषित भाईंना बेड्या ठोकल्या, पाच लोखंडी पिस्तूल, सहा जिवंत काडतूस अन् सात लोखंडी कोयते जप्त केलेत. यापुढे देखील सोशल मीडियावर अशा प्रकारे कोणी दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला तर त्या स्वयंघोषित भाईंना देखील समाजासमोर गुडघे टेकायाला लाऊ, असा इशारा पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी इशारा दिलाय. भूरटेगिरी करणाऱ्या स्वयंघोषित भाईंची मस्ती अशीच जिरवायला हवी. त्यासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांनी राबविलेल्या हा नवा पॅटर्न राज्यात राबवायला हवा, अशी मागणी आता नागरिक करत आहेत.सोशल मीडियावर दहशत माजविणाऱ्या भाईंचा माज उतरविणारा पिंपरी पोलिसांचा 'नवा पॅटर्न


सोशल मीडियावर दहशत माजविणाऱ्या भाईंचा माज उतरविणारा पिंपरी पोलिसांचा 'नवा पॅटर्न

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

1 Min 1 Constituency : 1 मिनिट 1 मतदारसंघ : 15 Nov 2024 : Vidhan Sabha : Maharashtra ElectionRaj Thackeray Bhiwandi : महिला कार्यकर्ता पाया पडली, राज ठाकरे म्हणले, हे नाही आवडत मलाNashik-BJP Sena Rada : भाजपच्या गणेश गीतेंच्या वाहनावर हल्ला,  नाशिकमध्ये भाजप-सेनेचा राडाShreya Yogesh Kadam Ratnagiri : 6 महिने मुलांपासून दूर; प्रचारादरम्यान योगेश कदमांच्या पत्नी भावूक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
Nashik Election : प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
Shahu Maharaj : समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
भरारी पथकाची कारवाई, 546 कोटींची मालमत्ता जप्त; रोकड, मौल्यवान वस्तूंसह सोने-चांदी ताब्यात
मोठी बातमी! भरारी पथकाची कारवाई, 546 कोटींची मालमत्ता जप्त; रोकड, मौल्यवान वस्तूंसह सोने-चांदी ताब्यात
Sharad Pawar : शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
Embed widget