एक्स्प्लोर
Advertisement
विवाहबाह्य संबंधातून विवाहितेचे हल्लेखोर प्रियकरावर कुऱ्हाडीने वार
विवाहबाह्य संबंधातून झालेल्या वादावादीमुळे प्रियकर हा प्रेयसीवर हल्ला करण्यासाठी आला होता, मात्र प्रेयसीनेच त्याच्यावर वार केले.
पिंपरी चिंचवड : विवाहित प्रेयसीने विवाहित प्रियकरावर कुऱ्हाडीने वार करत त्याचा गळा कापण्याचा प्रयत्न केला. विवाहबाह्य संबंधातून झालेल्या वादावादीमुळे प्रियकर हा प्रेयसीवर हल्ला करण्यासाठी आला होता, मात्र प्रेयसीनेच त्याच्यावर वार केले.
पिंपरी चिंचवडच्या विठ्ठलनगरमध्ये काल (सोमवारी) रात्री ही घटना घडली. आरोपी प्रेयसी सविता जाधवला पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे. गंभीर जखमी झालेल्या प्रवीण भाग्यवंतवर पालिकेच्या वायसीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
सविता ही आईच्या घरी असताना प्रवीण तिला घेऊन जाण्यासाठी आला. मात्र, ती न आल्यामुळे तो कुऱ्हाड घेऊन परतला. दोघांमध्ये झटापट सुरु झाली, त्यात सविताने प्रवीणच्या हातातून कुऱ्हाड हिसकावून घेतली आणि तिने प्रवीणच्या गळ्यावर हल्ला केला. यामध्ये प्रवीणच्या श्वसननलिकेवर आघात झाला आहे.
गेल्या दहा वर्षांपासून सविता आणि प्रवीण यांचे अनैतिक संबंध असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे दोघंही विवाहित असून त्यांना दोन-दोन अपत्यं आहेत. त्यानंतरही दोघांचे विवाहबाह्य संबंध सुरुच होते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
Advertisement