एक्स्प्लोर

PIFF : पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सावाची तारीख ठरली; 2 ते 9 फेब्रुवारी दरम्यान रंगणार महोत्सव

PIFF : पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2 ते 9 फेब्रुवारी दरम्यान रंगणार आहे.

Pune International Film Festival : 'पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव' (Pune International Film Festival) गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. काही कारणाने या महोत्सवाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. पण आता हा महोत्सव 2 ते 9 फेब्रुवारीदरम्यान पार पडणार आहे. 

21 वा 'पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव' पुणे फिल्म फाऊंडेशन आणि महाराष्ट्र शासनाच्या विद्यमाने 2 ते 9 फेब्रुवारीदरम्यान आयोजित करण्यात आला आहे. G20 मुळे गर्दी आणि अनेक दिग्गज मंडळी येणार असल्याने पालिकेकडून आणि राज्य शासनाकडून महोत्सव पुढे ढकलण्यात आला होता. त्यामुळे जानेवारीमध्ये होणारा महोत्सव आता फेब्रुवारीमध्ये होईल. 

'पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा'ला महाराष्ट्र शासनाकडून आर्थिक मदत केली जाणार आहे. या महोत्सवात 72 देशांतील 1574 एन्ट्री आल्या होत्या. त्यातील 140 सिनेमे दाखवण्यात येणार आहेत. महोत्सवात दाखवण्यात येणारे सर्व सिनेमे A+ ग्रेडचे आहेत. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Pune International Film Fest (@piffindia)

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव कुठे पार पडणार? 

सेनापती बापट रस्त्यावरील पीव्हीआर आयकॉन, कॅम्प परिसरातील आयनॉक्स आणि लॉ कॉलेज रस्त्यावरील राष्ट्रीय फिल्म संग्रहायल अशा तीन ठिकाणी एकूण नऊ पडद्यांवर सिनेमांचे प्रदर्शन करण्यात येणार आहे. यंदाच्या महोत्सवात एक भारतीय आणि दोन इतर देशांतील मंडळी ज्युरीमध्ये असतील. 

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया 5 जानेवारी तर स्पॉट नोंदणी 19 जानेवारीपासून सुरू होणार आहे. सर्वसामान्य रसिक प्रेक्षकांसाठी सिनेमागृहात सिनेमा पाहण्यासाठी संपूर्ण महोत्सवासाठीचे नोंदणी शुल्क रुपये 800 असून ज्येष्ठ नागरिक, चित्रपट क्लब सदस्य आणि विद्यार्थी यांच्यासाठी 600 रुपये असणार आहे. 

21 व्या पिफसाठी स्प्रधा विभागात निवड झालेले सिनेमे पुढीलप्रमाणे : 

-क्लॉन्डाईक
- परफेक्ट नंबर
- थ्री थाऊजंड नंबर्ड पिसेस
- द ब्लू काफ्तान
- मेडीटेरियन फिव्हर
- एविकष्ण
- मिन्सक
- वर्ड
- बटरफ्लाय व्हिजन
- तोरी अॅन्ड लोकिता
- अवर ब्रदर्स
- व्हाईट डॉग
- बॉय फ्रॉम हेवन
- हदिनेलेंतू

संबंधित बातम्या

Pune PIFF : पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुढे ढकलला; काय आहे कारण? पुढची तारीख कधी?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manoj jarange Health : अशक्तपणा, पोटदूखी, पाच दिवसाच्या उपोषणानंतर जरांगे रुग्णालयात दाखलPlane book for Yatra Kolhapur : भादवणकरांचा नाद खुळा, गावच्या यात्रेला थेट विमान बूक, मुंबईतून रवानाPune Police on Sam David | सॅमचा बॉलिवूड ते आंतरराष्ट्रीय सायबर टोळीचा प्रवास, पोलिसांकडून पर्दाफाशManoj Jarange On Mumbai : मुंबई जाम होणार मराठा मागे येणार नाही, जरांगेंचा इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जानेवारी 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जानेवारी 2025 | गुरुवार
'सैराट'मधील लंगड्याची फुल्ल हवा, तानाजीचा लूक नवा; गळ्यात सोनं, हाती घड्याळ, सोबतीला मोनालिसा
'सैराट'मधील लंगड्याची फुल्ल हवा, तानाजीचा लूक नवा; गळ्यात सोनं, हाती घड्याळ, सोबतीला मोनालिसा
सुरेश धसांनी ज्यूस पाजला, मनोज जरांगेंचं अंतरावालीतील उपोषण स्थगित; आता मोर्चा मुंबईकडे
सुरेश धसांनी ज्यूस पाजला, मनोज जरांगेंचं अंतरावालीतील उपोषण स्थगित; आता मोर्चा मुंबईकडे
Arvind Kejriwal : यमुनेत विष असल्याचा पुरावा द्या, नोटीसवर नोटीस सुरुच; केजरीवाल म्हणाले, निवडणूक आयुक्त राजकारण करत आहेत, दिल्लीतून निवडणूक का लढवत नाही?
यमुनेत विष असल्याचा पुरावा द्या, नोटीसवर नोटीस सुरुच; केजरीवाल म्हणाले, निवडणूक आयुक्त राजकारण करत आहेत, दिल्लीतून निवडणूक का लढवत नाही?
Embed widget