एक्स्प्लोर

Pune PIFF : पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुढे ढकलला; काय आहे कारण? पुढची तारीख कधी?

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात पिफ पुढे ढकलण्यात आलं आहे, अशी माहिती जब्बार पटेलांनी दिली आहे.  12 ते 19 जानेवारी दरम्यान पुण्यात हा चित्रपट महोत्सव होणार होता.

Piff Festival :  पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (Pune international film festival) अर्थात पिफ (Piff) पुढे ढकलण्यात आला आहे.  12 ते 19 जानेवारी दरम्यान पुण्यात हा चित्रपट महोत्सव होणार होता. मात्र काही अपरिहार्य कारणामुळे हा चित्रपट महोत्सव पुढे ढकलण्यात आल्याचं पुणे फिल्म फौंडेशनचे अध्यक्ष जब्बार पटेल यांनी सांगितलं आहे. 

 पुणे फिल्म फौंडेशन आणि महाराष्ट्र सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात येते. यंदाचं चित्रपट मोहत्सवाचं एकवीसावं वर्ष आहे. 2023 मध्ये होणाऱ्या या महोत्सवाची तयारीला सुरुवात झाली होती. सप्टेंबर महिन्यापासून स्पर्धेच्या प्रवेशिका स्विकारण्यास सुरुवात झाली होती.  2022 मध्ये सेन्सॉर मिळालेल्या आणि सेन्सॉर न मिळालेल्या अशा दोन्ही प्रकारच्या मराठी चित्रपटांना प्रवेश अर्ज करता येणार होता. पिफ 2023 दिनांक 12 ते 19 जानेवारी दरम्यान पुण्यात रंगणार होता मात्र काही कारणामुळे हा महोत्सव पुढे ढकलण्यात आला आहे. 

चित्रपट नोंदणीच्या अटी
चित्रपटाचे शिर्षक आणि बॅनर हे अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळात नोंदणीकृत असावे. 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2022 या कालावधीतच सिनेमा पूर्ण केला गेलेला असावा.चित्रपटाचं कोणतेही पोस्ट-प्रोडक्शन संबंधी काम बाकी नसावे. संबंधित चित्रपटाची निर्मिती ही सन 2022 मध्येच झाली आहे. यासाठी लॅब  किंवा स्टुडीओचे पूर्ततापत्र सादर करून आणि त्याची डीसीपी प्रिंट दाखवणं बंधनकारण आहे. या सगळ्यांची पूर्तता पिफ 2023 साठी अर्ज करणाऱ्या चित्रपट निर्मात्यांनी करायची आहे. हे प्रमाणपत्र फक्त 21 व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा करीता ग्राह्य धरण्यात येणार आहे, अशी माहितीदेखील  पुणे फिल्म फौंडेशनतर्फे देण्यात आली होती. 

महोत्सवात दर्जेदार चित्रपट अन् दिग्दर्शकांची हजेरी
पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात अनेक जॉनरच्या चित्रपटांची पर्वणी असते. अनेक नवोदित आणि प्रस्थापित दिग्दर्शक या महोत्सवाला आवर्जून हजेरी लावतात. विविध भाषेनुसार चित्रपटांची विभागणी केली जाते. त्यात मराठी, हिंदी, इंग्रजीसोबतच काही परदेशी भाषेतील चित्रपटदेखील असतात. हे चित्रपट बघण्यासाठी आणि त्याचं समीक्षण करण्यासाठी दरवर्षी अनेक चित्रपटप्रेमी आणि चित्रपटाचा अभ्यास करणारे विद्यार्थी हजेरी लावत असतात.

मागील वर्षी कोरोनानंतर पहिल्यांदाच हा चित्रपट महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला होता. तर कोरोनात हा महोत्सव ऑनलाईन पार पडला होता. यंदाही चित्रपटप्रेमींनी महोत्सवाची जोमात तयारी केली होती. मात्र काही कारणामुळे हा महोत्सव पुढे ढकलण्यात आला आहे. महोत्सवाच्या पुढील तारखा लवकरच जाहीर केल्या जातील, अशी माहिती जब्बार पटेलांनी दिली आहे. 

 

 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 07.30 PM 27 September 2024 : ABP MajhaPandharpur Babanrao Shinde vs Dhanraj Shinde : बबनदादा शिंदेंना पुतण्या धनराज शिंदेंचं आव्हानTop 100 Headlines : 100 हेडलाईन्स राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 27 Sep 2024ABP Majha Headlines : 08 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
Israel–Hezbollah conflict : युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
Embed widget