एक्स्प्लोर

नऊ वर्षापूर्वी पुण्यातून बेपत्ता झालेला युवक बनला छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांचा कमांडर

2014 साली गडचिरोलीच्या जंगलात तो असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलीस त्याच्या शोधात होते. पण तो सापडत नव्हता. सोमवारी छत्तीसगड पोलिसांनी नक्षलवाद्यांची एक यादी जाहीर केली. त्यात संतोष शेलार हा नक्षलवादी कमांडर असल्याचो माहिती समोर आली आहे.

पुणे : नऊ वर्षापूर्वी पुण्यातून बेपत्ता झालेला युवक नक्षलवादी झाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. संतोष वसंत शेलार उर्फ विश्वा असे या तरुणाचे नाव आहे. छत्तीसगड येथील माओवादी संघटनेत तो सहभागी झाला असल्याची माहिती मिळाली आहे. संतोष पुण्यातील भवानी पेठेतील कासेवाडी भागात तो राहत होता. नोव्हेंबर 2010 मध्ये तो बेपत्ता झाला होता. याप्रकरणी पुण्यातील खडक पोलिसात बेपत्ता असल्याची तक्रार त्याचा भाऊ संदीप शेलार याने दिली होती. संतोष शेलार हा एका कबीर कला मंचच्या संपर्कात होता. तो स्वत: चित्रकार होता. 2010 साली तो पुण्यातून मुंबई येथे चित्रकला स्पर्धेसाठी गेला होता. त्यानंतर तो आजतागायत घरी परतला नाही. 2014 साली गडचिरोलीच्या जंगलात तो असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलीस त्याच्या शोधात होते. पण तो सापडत नव्हता. सोमवारी छत्तीसगड पोलिसांनी नक्षलवाद्यांची एक यादी जाहीर केली. त्यात संतोष शेलार हा नक्षलवादी कमांडर असल्याचो माहिती समोर आली आहे. राजनांदगाव येथील तांडा एरिया कमिटीचा तो डेप्युटी कमांडर असल्याचे छत्तीसगड पोलिसांच्या यादीत म्हटले आहे. मात्र महाराष्ट्र पोलिसांना याविषयी छत्तीसगड पोलिसांकडून अद्याप कुठलीही माहिती देण्यात आली नाही. माहिती मिळाल्यास पुढील तपास करू अशी माहिती खडक पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उत्तम चक्रे यांनी दिली आहे. पुण्यातल्या कासेवाडी परिसरात शेलार कुटुंबीय राहते. या ठिकाणी त्याचा भाऊ, वडील राहतात. तो बेपत्ता झाल्यानंतर त्यानी खडक पोलीस स्टेशनमध्ये बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. मात्र याला जबाबदार कबीर कला मंचाच्या कार्यकर्ते जबाबदार आहेत. त्यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी शेलार कुटुंबीयांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Pune Jamavbandi: पुण्यात आज मध्यरात्रीपासून 14 दिवसांसाठी जमावबंदी लागू; पुणे पोलिसांनी घेतला मोठा निर्णय, कारणही आलं समोर
पुण्यात आज मध्यरात्रीपासून 14 दिवसांसाठी जमावबंदी लागू; पुणे पोलिसांनी घेतला मोठा निर्णय, कारणही आलं समोर
Pune Crime News: नात्यातील महिलेच्या मोबाईलवर मेसेज पाठवला; पुण्यातून अपहरण, सांगलीत संपवले, तपासानंतर पोलिसही चक्रावले!
नात्यातील महिलेच्या मोबाईलवर मेसेज पाठवला; पुण्यातून अपहरण, सांगलीत संपवले, तपासानंतर पोलिसही चक्रावले!
Nathuram Godse Pune: नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Embed widget