एक्स्प्लोर

40 व्या वर्षी माजी सैनिकानं MPSC परीक्षेत मिळवलं यश, खासदार सुप्रिया सुळेंनी केलं कौतुक

Pune Daund; लष्करात सतरा वर्षे सेवा करून आता जनतेची सेवा करणाऱ्या शासकीय अधिकाऱ्याचा सुप्रिया सुळेंनी केला सत्कार

Pune Daund Latest Marathi News Update: भारतीय लष्करात सतरा वर्षे देशाची सेवा करून वयाच्या चाळीशीत निवृत्तीनंतर शेती करता करता स्पर्धा परीक्षेत यश मिळणाऱ्या अश्रय झुरुंगे यांची दौंडमध्ये सध्या चर्चा आहे.  त्यांनी 40 व्या वर्षी एमपीएससी परीक्षेत यश मिळवलं. सध्या ते परिवहन खात्यात अधिकारी झाले आहेत. दौंड तालुक्यातील पाटेठाण गावच्या उत्साही आणि उर्जावान माजी सैनिक अश्रय झुरुंगे यांना भेटून खासदार सुप्रिया सुळे यांनी खास सत्कार केला.

अक्षय झुरुंगे सध्या परिवहन खात्यात सहायक मोटार वाहन निरीक्षक पदी कार्यरत आहेत. दौंड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेल अध्यक्ष ज्योती झुरुंगे यांचे ते दीर आहेत. वयाच्या चाळीसाच्या वर्षी अभ्यास सुरू करणाऱ्या अक्षय झुरुंगे यांनी 17 वर्षे भारतीय लष्करात सेवा केली आहे. या कालावधीत त्यांनी देशाची सेवा करताना बर्फाने वेढलेल्या लेह, सियाचीन, सिलिगुडी आदी गोठवून टाकणाऱ्या थंडीच्या प्रदेशात देशाची सेवा केली आहे. तेथून निवृत्त होताना सुभेदार ते पदावर होते.  त्यानंतर त्यांनी एमपीएससी परीक्षेत यश मिळवल्याची चर्चा आहे.

निवृत्तीनंतर गावी आल्यावर अक्षय झुरुंगे यांनी शेती करण्यास प्रारंभ केला; मात्र त्यांच्यातील अभ्यासू विद्यार्थी त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. अखेर वयाच्या चाळिसाव्या वर्षी त्यांनी अभ्यास करायला सुरूवात केली. याशिवाय त्यांना शेतीही करायची होतीच. ती सुद्धा प्रगत तंत्रज्ञानाचा आधार घेऊन करायची होती. त्यामुळेच त्यांनी पारंपरिक शेतीला छेद देत शेवग्याची शेती केली; आणि त्याचवेळी एकीकडे शेती करता करता त्यांनी जोमाने अभ्यास करत एमपीएससी परीक्षेत यशस्वीपणे उत्तीर्ण झाले. सध्या ते राज्याच्या परिवहन खात्यात अधिकारी असून सहायक मोटार वाहन निरीक्षक पदी कार्यरत आहेत. 

दौंड तालुक्याच्या दौऱ्यावर असलेल्या खासदार सुप्रिया सुळे या पाटेठाण येथे गेल्या असता त्यांनी आवर्जून झुरुंगे यांची भेट घेत त्यांचा खास सत्कार केला. लष्करी सेवेनंतर पुन्हा जनतेच्या सेवेसाठी वयाच्या चाळिसाव्या वर्षी अभ्यास सुरू करून परीक्षा देणे, त्यात उत्तम गुणांनी पास होऊन शासकीय सेवा बजावताना जनसेवा करणे या झुरुंगे यांच्या आंतरिक उर्मीचे खासदार सुळे यांनी भरभरून कौतुक केले. त्याशिवाय पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. इतकेच नाही, तर नव्या पिढीने  झुरुंगे यांच्याकडून प्रेरणा घ्यायला हवी, असेही त्या यावेळी म्हणाल्या. माजी आमदार रमेश थोरात, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पुणे विभाग अध्यक्ष वैशाली नागवडे, राष्ट्रवादीचे दौंड तालुका अध्यक्ष आप्पासाहेब पवार, दौंड शहराध्यक्ष गुरमुख नारंग, ज्योती झुरंगे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur- Madha Lok Sabha: वंचितचे सोलापूर आणि माढा मतदारसंघातील दोन्ही उमेदवार 'करोडपती', कोणाकडे किती  संपत्ती आणि दागिने?
वंचितचे सोलापूर आणि माढा मतदारसंघातील दोन्ही उमेदवार 'करोडपती', कोणाकडे किती संपत्ती आणि दागिने?
Premachi Goshta Serial Update : कार्तिकची बाजू घेत इंद्रा मुक्ताच्या कानशिलात लगावणार; सावनी भरतेय सागरचे कान
कार्तिकची बाजू घेत इंद्रा मुक्ताच्या कानशिलात लगावणार; सावनी भरतेय सागरचे कान
Kolhapur News : कोल्हापुरातील शिंदे गटाच्या खासदारांच्या संपत्तीत किती कोटींनी वाढ? माने की मंडलिक कोट्यधीश??
कोल्हापुरातील शिंदे गटाच्या खासदारांच्या संपत्तीत किती कोटींनी वाढ? माने की मंडलिक कोट्यधीश??
BJP :  भाजपच्या नाराज पदाधिकाऱ्यांनी उपसले राजीनामा अस्त्र, नगरमधील 100 कार्यकर्ते- पदाधिकारी देणार सामूहिक राजीनामे
भाजपच्या नाराज पदाधिकाऱ्यांनी उपसले राजीनामा अस्त्र, नगरमधील 100 कार्यकर्ते- पदाधिकारी देणार सामूहिक राजीनामे
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Vishal Patil PC FULL :सांगलीत मविआने मोठी चूक केली - विशाल पाटीलVishal Patil Sangli : प्रत्येक आरोपाला सभेतून उत्तर देणार - विशाल पाटीलABP Majha Headlines : 10AM  :16 April 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra BJP : महाराष्ट्र भाजपमधील नाराज पदाधिकरी राजीनामा देण्याच्या तयारीत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur- Madha Lok Sabha: वंचितचे सोलापूर आणि माढा मतदारसंघातील दोन्ही उमेदवार 'करोडपती', कोणाकडे किती  संपत्ती आणि दागिने?
वंचितचे सोलापूर आणि माढा मतदारसंघातील दोन्ही उमेदवार 'करोडपती', कोणाकडे किती संपत्ती आणि दागिने?
Premachi Goshta Serial Update : कार्तिकची बाजू घेत इंद्रा मुक्ताच्या कानशिलात लगावणार; सावनी भरतेय सागरचे कान
कार्तिकची बाजू घेत इंद्रा मुक्ताच्या कानशिलात लगावणार; सावनी भरतेय सागरचे कान
Kolhapur News : कोल्हापुरातील शिंदे गटाच्या खासदारांच्या संपत्तीत किती कोटींनी वाढ? माने की मंडलिक कोट्यधीश??
कोल्हापुरातील शिंदे गटाच्या खासदारांच्या संपत्तीत किती कोटींनी वाढ? माने की मंडलिक कोट्यधीश??
BJP :  भाजपच्या नाराज पदाधिकाऱ्यांनी उपसले राजीनामा अस्त्र, नगरमधील 100 कार्यकर्ते- पदाधिकारी देणार सामूहिक राजीनामे
भाजपच्या नाराज पदाधिकाऱ्यांनी उपसले राजीनामा अस्त्र, नगरमधील 100 कार्यकर्ते- पदाधिकारी देणार सामूहिक राजीनामे
Stock Market Opening : शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स 73,000 तर, निफ्टी 150 अंकांनी खाली
शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स 73,000 तर, निफ्टी 150 अंकांनी खाली
Lok Sabha 2024 : निवडणूक आयोग अलर्ट मोडवर! 4600 कोटी रुपये, कोट्यवधींची दारू जप्त
निवडणूक आयोग अलर्ट मोडवर! 4600 कोटी रुपये, कोट्यवधींची दारू जप्त
Kavya Maran RCB vs SRH: काव्या मारन त्या क्षणी लगेच उठली अन् नाचली; फोटो व्हायरल, नेमकं काय घडलं?, जाणून घ्या
काव्या मारन त्या क्षणी लगेच उठली अन् नाचली; फोटो व्हायरल, नेमकं काय घडलं?, जाणून घ्या
Travis Head: दिल्लीनं 11 वर्षांआधी 30 लाखांत खरेदी केलेलं,आता ट्रॅव्हिस हेडचा पगार किती?, जाणून घ्या सर्वकाही!
दिल्लीनं 11 वर्षांआधी 30 लाखांत खरेदी केलेलं, आता ट्रॅव्हिस हेडचा पगार किती?, जाणून घ्या
Embed widget