Sharad Pawar : सत्तेचा उन्माद काय असतो हे राज्यकर्त्यांनी दाखवून दिलं; शरद पवारांचा सरकारवर हल्लाबोल
सत्तेचा उन्माद काय असतो हे राज्यकर्त्यांनी दाखवून दिलं असं म्हणत शरद पवारांनी राज्य सरकारवर चांगलीच टीका केली
पुणे : महाविकास आघाडीच्या बारामती, शिरुर आणि पुणे लोकसभा मतदार संघाचे उमेदवार सुप्रिया सुळे (SunetraPawar), रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) आणि अमोल कोल्हे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी मोठ शक्तीप्रदर्शन आणि सभा आयोजित करण्यात आली. यावेळी शरद पवारांनी विरोधकांवर सोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदींवर चांगलाच हल्लाबोल केला. सत्तेचा उन्माद काय असतो हे राज्यकर्त्यांनी दाखवून दिलं असं म्हणत शरद पवारांनी राज्य सरकारवर चांगलीच टीका केली. त्यासोबतच मोदी सरकार जनतेची फसवणूक करत असल्याचा आरोपही त्यांनी सरकारवर केला आहे. या सभेला पुणेकरांनी मोठी गर्दी केली होती. पुण्यातील महाविकास आघाडीचे सगळे स्थानिक नेतेत उपस्थित होते. शरद पवार (Sharad Pawar) उभं राहताच कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला होता.
शरद पवार म्हणाले की, आज ज्यांच्या हातात सत्ता आहे, त्यांनी गेली दहा वर्षे जनतेची फसवणूक केली. महागाई, बेरोजगारी, शेतकरी प्रश्न, महिलांची सुरक्षितता याबाबत केलेली वक्तव्य आणि वस्तुस्थिती यात जमीन-अस्मानचा फरक आहे, असं म्हणत शरद पवारांनी थेट विरोधकांवर निशाणा साधला.
पुढे बोलताना ते म्हणाले की, मोदी 2014 सत्तेत आले. त्यावेळी पेट्रोल चे भाव 71 रुपये दिले. मोदी म्हणाले पन्नास दिवसांत पेट्रोलचे भाव कमी आणतो. आज 3 हजार 650 दिवस झाले, आज दर 106 रुपये झाले. घरगुती गॅस बाबत मोदी म्हणाले, 410 रुपयांवरून कमी आणणार. आता 1 हजार 160 रुपये झाला. मोदी तरुण मुलांना रोजगार देणार होते. प्रत्येक वर्षी दोन लाख रोजगार देणार होते, उलट रोजगार टक्का घसरला. आज 86 टक्के तरुण बेरोजगार आहेत. याचा अर्थ शब्द द्यायचा आणि तो फिरवायचा. त्यामुळं जनतेने आता मोदींच्या हातात सत्ता द्यायची नाही, हा ठाम निर्णय आम्ही घेतला असल्याचं शरद पवारांनी खडसावून सांगितलं.
रखरखत्या उन्हात मविआच्या सभेला गर्दी
तिन्ही उमेदवारांचे अर्ज दाखल केल्यानंतर महाविकास आघाडीची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला सुषमा अंधारे, जयंत पाटील, प्रशांत जगताप, होळकरांचे वंशज, पृथ्वीराज चव्हाण, मोहन जोशी, सचिन आहिर आणि मविआचे अनेक नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी तिन्ही उमेदवारांनी सरकारवर हल्लाबोल केला आणि मतदानाचं आवाहन केलं.
इतर महत्वाची बातमी-