एक्स्प्लोर

Narendra Dabholkar Murder Case : नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात दोन आरोपींना सश्रम जन्मठेपेची शिक्षा; आरोपी शरद कळसकर, सचिन अंदुरे कोण?

Narendra Dabholkar Murder Case : सफाई कर्मचाऱ्याने 19 मार्च 2022 रोजी दाभोलकर हत्या प्रकरणात सुनावणीमध्ये सचिन अंदुरे आणि शरद कळसकरला साक्षीदारानं ओळखले होते.

Narendra Dabholkar Murder Case : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घृण हत्या प्रकरणात पाचपैकी तीन आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता झाली आहे. पाच आरोपींपैकी सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना दोषी ठरवण्यात आलं आहे. त्यांना सश्रम जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तथापि, ज्यांच्यावर कट रचल्याचा आरोपा होता त्या वीरेंद्र तावडेसह संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावेची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. पुराव्याअभावी तिघांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.

तिन्ही निर्दोष आरोपींविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार

त्यामुळे तब्बल 11 वर्षानी दाभोलकर प्रकरणात (Narendra Dabholkar Murder Case) आरोपींना शिक्षा झाल्याने दाभोलकर कुटुंबाने समाधान व्यक्त केलं असलं, तरी तिन्ही निर्दोष आरोपींविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे म्हटले आहे. नरेंद्र दाभोलकर यांची पुण्यामध्ये  ओंकारेश्वर मंदिराजवळ महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर 20 ऑगस्ट 2013 रोजी गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्यानंतर अवघा महाराष्ट्र हादरला होता. सकाळी सव्वासातच्या सुमारास मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी दाभोलकरांवर गोळ्या झाडल्या होत्या. विचारवंताची हत्या झाल्याने पुरोगामी आवाज शोकसागरात बुडाला होता. 

वाचा : Narendra Dabholkar Murder Case : नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणात आत्तापर्यंत काय काय घडलं?

सचिन अंदुरे शरद कळसकर कसे सापडले?

दाभोलकर हत्या प्रकरणात डॉ. वीरेंद्र तावडे, सचिन अंदुरे (Sachin Andure) शरद कळसकर (Sharad Kalaskar) आणि विक्रम भावे या पाच आरोपींवर हत्या, गुन्ह्याचा कट रचणे, युएपीए अंतर्गत आरोप निश्चित करण्यात आले होते. संजीव पुनाळेकरांविरोधात पुरावे नष्ट करणे, खोट्या सूचना देणं अंतर्गत आरोप निश्चित करण्यात आले होते. मात्र, त्यांनी आरोप फेटाळले होते.  

दाभोलकर हत्या प्रकरणात साक्ष नोंदवताना सीबीआयकडून महत्वाच्या साक्षीदाराला हजर करण्यात आले होते. सफाई कर्मचाऱ्याने 19 मार्च 2022 रोजी दाभोलकर हत्या प्रकरणात सुनावणीमध्ये सचिन अंदुरे आणि शरद कळसकरला साक्षीदारानं ओळखले होते. दोघांनी दाभोलकरांवर गोळीबार करून फरार झाल्याची साक्ष पुणे महापालिकेच्या त्या सफाई कर्मचाऱ्याने दिली होती. आरोप निश्चित झाल्यानतंर 2021 पासून खटल्याची सुनावणी सुरु झाली होती. सुनावणीमध्ये 20 साक्षीदार तपासण्यात आले होते. 

मारेकरी सापडत नसल्याने सीबीआयकडे निकाल 

दाभोलकर हत्याकांड प्रकरणात आरोपी सापडत नसल्याने केतन तिरोडकर यांनी हत्येचा तपास सीबीआयकडे सोपविण्याची मागणी न्यायालयात जनहित याचिकेत केली होती. गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणात कर्नाटकमध्ये एटीएसने अमोल काळेला ताब्यात घेतले होते. काळेच्या तपासात नालासोपाऱ्यातील वैभव राऊतची माहिती मिळाली होती. वैभवच्या घरात शस्त्रास्त्रे सापडली होती.वैभवच्या तपासात शरद कळसकरला ताब्यात घेण्यात आले होते. पुढे पोलिसांच्या तपासात कळसकरने सचिन अंदुरेच्या मदतीने दाभोलकरांची गोळ्या झाडून हत्या केल्याची कबूली दिली होती. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNitesh Rane on Pune Case : पुणे प्रकरणावर Supriya Sule गप्प का? नितेश राणे यांचं सूचक वक्तव्यMaharashtra Top 3 News : ब्लास्ट..पाणी टंचाई ते अपघात, राज्य हादरवणाऱ्या तीन बातम्या! ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
Pune Car Accident Ketaki Chitale :  पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
Embed widget