एक्स्प्लोर

मोठी बातमी : प्रकाश आंबेडकरांवर गुन्हा दाखल करुन अटक करा : नारायण राणे

Pune : प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करा, अशी मागणी केंद्रीय लघू सूक्ष्म आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी केली.

पुणे : राज्यात दंगली होऊ शकतात असं म्हणणारे वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करा, अशी मागणी केंद्रीय लघू सूक्ष्म आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी केली. ते पुण्यात (Pune) पत्रकार परिषदेत बोलत होते. 

 प्रकाश आंबेडकर म्हणतात दंगली होऊ शकतात. खरंच राज्यात अशी परिस्थिती आहे का? असा प्रश्न नारायण राणे यांना विचारण्यात आला. त्यावर राणे म्हणाले, "त्यांच्यावर FIR दाखल करून त्यांना अटक व्हायला पाहिजे. त्यांना अटक करायला पाहिजे आणि माहिती घ्यायला पाहिजे. दंगलीचा आधार सांगा".

नारायण राणे यांना पुन्हा त्याबाबतच विचारण्या आलं. त्यावर त्यांनी सावरासावरव केली. आंबेडकर असो किंवा इतर कोणीही, दंगलीविषयी बोलत असेल तर, पोलिसांनी त्यांच्याकडून माहिती घ्यायला हवी. त्यांची चौकशी करायला हवी. दंगली रोखण्यासाठी कारवाई करायला हवी, असं नारायण राणे म्हणाले. 

दंगलीबाबत बोलणाऱ्यांची चौकशी करा

प्रकाश आंबेडकर असो किंवा इतर कुणीही असो, जे कोणी दंगलीविषयी बोलत असतील, त्याची पोलिसांनी दखल घ्यावी,  त्यांची चौकशी करायला हवी. दंगलीची त्यांच्याकडे काय माहिती आहे ती घेऊन दंगल रोखण्यासाठी कारवाई करावी.दंगल रोखण्यासाठी अटक देखील करायला हवी. प्रकाश आंबेडकर यांच्यावर एफआयआर दाखल करून, त्यांना अटक व्हायला पाहिजे. त्यांना अटक करून दंगलीचा आधार काय आहे याची माहिती घ्यायला पाहिजे, असं नारायण राणे म्हणाले. 

भुजबळांच्या प्रश्नाला उत्तर द्यायला मी कटिबद्ध नाही

आम्ही इथे जनतेच्या उपक्रमासाठी जमलेलो आहेत. मी छगन भुजबळांबाबत विचारण्यात येणाऱ्या प्रश्नावर उत्तर द्यायला कटिबद्ध नाही, असं नारायण राणे म्हणाले. 

जरांगे वयाने लहान, त्यांनी अभ्यास करावा

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणाचा अभ्यास करावा. ते अजून वयाने लहान आहेत. मराठा समाज ओबीसीतून आरक्षण घेणार नाही, असा दावा नारायण राणे म्हणाले. 

 संजय राऊत पुन्हा जेलमध्ये जाणार

"शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांकडे आक्रमकता आहे का? ते नाव घेऊ नका त्यांच्यावर प्रश्न विचारू नका. तो दुसरं कधी चांगलं काय बोलतो का? मी वाट पाहतोय शिंदे सरकार त्याचं संरक्षण कधी काढणार याची. संजय राऊत आदित्य ठाकरेसोबत आत जाणार आहे. तो सध्या जामिनावर बाहेर आहे. आदित्य ठाकरे सुशांत सिंह केसमध्ये आतमध्ये जाणार. तिथं संजय राऊतदेखील सोबत असतील", असा दावा नारायण राणेंनी केला.

उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

यावेळी नारायण राणे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरही हल्ला चढवला. "उद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन काय पैसे वाटणार आहे का?'मातोश्रीवर फक्त इनकमिंग आहे त्यांना आऊटगोईंग माहिती नाही.उद्धव ठाकरे यांच्याकडे आक्रमक व्हायला कोणी आहे का? आक्रमकवाले सगळे गेले दुसरीकडे.उद्धव ठाकरे गटात आहे कोण तो गट तरी आहे का?" असा हल्लाबोल नारायण राणेंनी केला. 

भाजपची नेहमीच तयारी

भाजपने सगळी तयारी चालू केली असं समजायचं. भाजप कधी निवडणूक तयारी करत नाही? आमचा कार्यकर्ता घरोघरी जाऊन नेहमी निवडणुकीची तयारी करत असतो, असं राणे म्हणाले.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Harshit Rana : LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour | जगाची सफर | वर्ल्ड फटाफट | जगभरात काय घडलं? कोणत्या बातमीनं जगाचं लक्ष वेधलं ?Ashok Dhodi Palghar : कारमध्ये सापडलेला मृतदेह अशोक धोडी यांचाच, पोलिसांची माहितीJob Majha : जॉब माझा :भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्र येथे विविध पदांसाठी भरती :ABP MajhaBuldhana : बुलढाणा केसगळती प्रकरण, गावातील नागरिकांच्या रक्तात, केसात हेवी मेटल असलेलं 'सेलेनियम'

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Harshit Rana : LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
Palghar News: वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश
मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
Embed widget