बाजार समित्यांचा धुरळा! पुणे जिल्ह्यातील नऊ बाजार समितीत कोण उधळणार गुलाल?; उद्या होणार मतमोजणी
Pune APMC Election Update : पुणे जिल्ह्यातील नऊ बाजार समित्यांसाठी शनिवारी मतमोजणी पार पडणार आहे, यासाठी दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. विजयाचा गुलाल कोण उधळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
Pune APMC Election Update : पुणे (Pune) जिल्ह्यातील नऊ बाजार समित्यांसाठी आज मतदान पार पडलं आहे. यामध्ये हवेली, बारामती, दौंड, इंदापूर, भोर, मंचर आंबेगाव, नीरा पुरंदर, खेड, तळेगाव दाभाडे आणि मावळ या बाजार समित्यांसाठी मतदान झालं. हवेली बाजार समितीची निवडणूक ही तब्बल 20 वर्षांनंतर होत आहे, यामुळे चुरस निर्माण झाली आहे. या निवडणुकीसाठी दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. बहुतांश बाजार समित्यांमध्ये 90 टक्क्यांच्या वर मतदान झालं आहे.
हवेली बाजार समितीची निवडणूक तब्बल 20 वर्षानंतर लागल्याने ती अत्यंत महत्वाची आणि प्रतिष्ठेची मानली जात आहे. यामध्ये सेवा सहकारी सोसायटी, ग्रामपंचायत, आडते-व्यापारी, हमाल मापारी या चार गटातील उमेदवार रिंगणात आहेत. उद्या सकाळी आठ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होणार आहे.
दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
पुणे जिल्ह्यातील हवेली, बारामती, दौंड, इंदापूर, भोर, मंचर, आंबेगाव, नीरा पुरंदर, खेड, तळेगाव दाभाडे आणि मावळ या बाजार समित्यांसाठी आज मतदान पार पडलं. बारामतीत 17 जागांसाठी मतदान झालं आहे. तर इंदापूरमध्ये 14, दौंडमध्ये 18, तर नीरामध्ये 16 जागांसाठी हे मतदान झालं. या निवडणुकीत अजित पवार, राहुल कुल आणि विजय शिवतारे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. खेडमध्ये दिलीप मोहिते पाटील नशीब आजमवणार आहेत.
मतदानाला गालबोट
पुणे (हवेली) बाजार समितीसाठी मतदान सुरु असतानाच मतदानाला लागबोट लागलं. हवेलीतील श्री शिवाजी मराठा सोसायटी मतदान केंद्रावर गोंधळ निर्माण झाला होता. उमेदवारांनी बोगस मतदान करत असल्याचा आरोप केल्याने मतदान केंद्रावर एकच गोंधळ उडाला होता. यामुळे मतदान केंद्रावर मतदारांची एकच गर्दी झाली होती. यानंतर पोलिसांनी मध्यस्थी केल्यावर हा गोंधळ आटोक्यात आला.
उद्या होणार मतदान
बाजार समितीच्या निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी उद्या होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली आहे. दुपारी एक वाजेपर्यंत सर्व निकाल जाहीर होईल, असे त्यांनी सांगितलं आहे. राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्रित लढताना दिसत आहे. पुणे जिल्ह्यात मात्र उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने फारकत घेतल्याचं दिसून येत आहे. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते स्वतः नशीब आजमावत आहेत.
कोणत्या ठिकाणी किती टक्के मतदान?
बारामती - 97.37 टक्के
नीरा - 99 टक्के
दौंड - 99 टक्के
इंदापूर - 96.23 टक्के
मावळ - 98.27%
मंचर - 97.81%
भोर- 98.30 %
खेड - 98.54%
संबंधित बातमी: