एक्स्प्लोर
मुंबई-पुणे दरम्यान मेगाब्लॉक, सिंहगड-प्रगतीसह लोकल्स रद्द
सिग्नल यंत्रणेतील सुधारणा आणि इतर तांत्रिक कामांसाठी मध्य रेल्वेकडून रविवारी पुणे ते लोणावळ्यादरम्यान मेगाब्लॉक घेतला जाणार आहे.
पुणे : मेगाब्लॉकमुळे रविवारी मुंबई-पुणे-मुंबई सिंहगड एक्स्प्रेस, मुंबई-पुणे-मुंबई प्रगती एक्स्प्रेस आणि कर्जत-पुणे-कर्जत पॅसेंजर या ट्रेन्स रद्द करण्यात आल्या आहेत. हा ब्लॉक सकाळी 11 वाजून 40 मिनिटांपासून दुपारी 4 वाजून 10 मिनिटांपर्यंत सुरु राहणार आहे.
सिग्नल यंत्रणेतील सुधारणा आणि इतर तांत्रिक कामांसाठी मध्य रेल्वेकडून रविवारी पुणे ते लोणावळ्यादरम्यान मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे या दिवशी प्रगती आणि सिंहगड एक्स्प्रेससह काही लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही गाड्या उशिराने धावणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.
हा ब्लॉक रविवारी सकाळी 11.40 ते दुपारी 4.10 या वेळेत घेतला जाणार आहे. सिग्नल यंत्रणेतील सुधारणेमुळे या मार्गावरील रेल्वे गाड्यांची ये-जा अधिक सुलभपणे होणार आहे. त्यासाठी कामशेत ते तळेगाव दरम्यान असलेल्या ऑटोमॅटिक सिग्नल यंत्रणेत सुधारणा केल्या जाणार आहेत.
ब्लॉकच्या कालावधीत कामशेत आणि वडगाव दरम्यान असलेल्या पुलाच्या बांधणीसाठीचं आवश्यक काम केलं जाईल. त्यामुळे या वेळेत रेल्वे गाड्यांवर परिणाम होणार आहे, असं मध्य रेल्वेच्या वतीने सांगण्यात आलं.
कोणत्या ट्रेन रद्द?
मुंबई-पुणे-मुंबई सिंहगड एक्स्प्रेस
मुंबई-पुणे-मुंबई प्रगती एक्स्प्रेस
कर्जत-पुणे-कर्जत पॅसेंजर
'या' ट्रेन थांबवणार
लोकमान्य टिळक टर्मिनस-काकीनाडा पोर्ट एक्स्प्रेस आणि मुंबई-नागरकोईल एक्स्प्रेस - लोणावळा आणि कामशेत स्थानकादरम्यान एक तास 25 मिनिटांसाठी थांबवणार
मुंबई-हैद्राबाद एक्स्प्रेस - एक तास थांबवणार
हुबळी-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेसला - 3 तास 25 मिनिटं थांबवणार
मुंबई-पुणे डेक्कन एक्स्प्रेस - पुणे आणि देहूरोड दरम्यान 20 मिनिटे थांबवणार
पुणे स्थानकातून सकाळी 11.45 वाजता सुटणारी भुसावळ एक्स्प्रेस रविवारी दौंड-मनमाड यामार्गे सोडण्यात येणार आहे,
पुण्याहून सुटणाऱ्या रद्द लोकलच्या वेळा - सकाळी 6.30, 6.50, 8.57, 9.55, 11.20 (शिवाजीनगर), दुपारी 12.15, 1, 3, आणि 3.40
लोणावळ्याहून सुटणाऱ्या रद्द लोकलच्या वेळा - सकाळी 6.30, 7.50, 8.20, 9.57 (तळेगाव), 10.10, 11.30, दुपारी 2, 2.50, 3.40, 4.38 (तळेगाव)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement