एक्स्प्लोर

Mumbai Pune Expressway Accident : मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर पुन्हा भीषण अपघात, कार अवजड वाहनाला धडकली, चार जणांचा जागीच मृत्यू

Mumbai Pune Expressway Accident : मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर आज (6 एप्रिल) पुन्हा एकदा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात चार प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे.

Mumbai Pune Expressway Accident : मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर (Mumbai Pune Expressway) आज (6 एप्रिल) पुन्हा एकदा भीषण अपघात (Accident) झाला आहे. उर्से टोलनाक्याजवळ झालेल्या या अपघातात चार प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. महत्त्वाचं म्हणजे तीन आठवड्यापूर्वी म्हणजेच 17 मार्च रोजी जसा अपघात झाला अगदी तसाच आणि त्याच परिसरात हा अपघात झाला आहे. 

कसा झाला अपघात?

आज सायंकाळी साडे चारच्या सुमारास ही चारचाकी मुंबईवरुन पुण्याला येत होती. तेव्हा एक अवजड वाहनाच्या चालकाने लघुशंकेसाठी गाडी महामार्गाच्या कडेला पार्क केली होती. त्याचवेळी मुंबईवरुन भरधाव वेगात आलेल्या चारचाकीच्या चालकाचा ताबा सुटला आणि गाडी थेट अवजड वाहनाला मागून धडकली. ही धडक इतकी भीषण होती की अक्षरशः निम्या गाडीचा चक्काचूर झाला. अन् गाडीतील चारही प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. 

तीन आठवड्यापूर्वी असाच अपघात

दरम्यान तीन आठवड्यापूर्वी याच परिसरात असाच अपघात झाला होता, तेव्हा तीन प्रवाशांचा जीव गेला होता. त्यावेळी चारचाकी थेट ट्रकला धडकली होती. अख्खी गाडी ट्रक खाली गेल्याचं तेव्हा पाहायला मिळालं होतं. मुंबईहून पुण्याच्या दिशेने ही कार जात होती, त्याचवेळी उर्से गावच्या परिसरात समोरच्या ट्रकला कारने मागून जोरदार धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती त्यातील चालक आणि दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला होता. अपघातात अर्धी कार ट्रकखाली गेली होती. 

डिव्हाईडरचा रॉड कारच्या आरपार घुसला

तर या अपघाताच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजेच 18 मार्च रोजी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आणखी एक भीषण अपघात झाला होता. डिव्हाईडरचाअख्खा रॉड कारच्या बरोबर मधून आर-पार गेला होता. हा अपघात सकाळी साडे सातच्या सुमारास सोमाटणे फाट्यावर झाला होता. मुंबईवरुन सोमाटण्याकडे वळताना चालकाचा गाडीवरील ताबा सुटला अन् गाडी थेट अशा पद्धतीने डिव्हाईडरमध्ये घुसली. या कारमधून चालक आणि दोन प्रवासी महिला असे एकूण तीन जण प्रवास करत होते. सुदैवाने अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. देव तारी त्याला कोण मारी, अगदी त्याच्याच प्रत्यय या प्रसंगीही आला. 

द्रुतगती मार्गावरील अपघातांची सत्र कधी थांबणार?

मुंबई आणि पुणे या दोन महत्वाच्या शहरांना जोडणारा हा मार्ग सुसाट गतीने धावतो. मात्र या मार्गावर अपघातांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात बघायला मिळते. अनेकदा मोठ-मोठ्या अपघातांमुळे या मार्गावर अनेकांना जीव गमवावा लागला आहे. अनेकांची कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत. मात्र तरीही योग्य सुविधा उपलब्ध झाल्या नाहीत. अपघाताचं सत्र कधी संपणार हा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून विचारला जात आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Syria war | Bashar al-Assad : पाश्चिमात्यांच्या सिरियामधील अघोरी युद्धात बशर अल असादांचे साम्राज्य नेस्तनाबूत; रशियामध्ये केलं पलायन
पाश्चिमात्यांच्या सिरियामधील अघोरी युद्धात बशर अल असादांचे साम्राज्य नेस्तनाबूत; रशियामध्ये केलं पलायन
आजपासून राज्यात थंडी वाढणार, शेकोटी पेटणार, पुढील 5 दिवस कसं असेल हवामान? पंजाबवराव डखांनी वर्तवला नवीन अंदाज
आजपासून राज्यात थंडी वाढणार, शेकोटी पेटणार, पुढील 5 दिवस कसं असेल हवामान? पंजाबवराव डखांनी वर्तवला नवीन अंदाज
Nandurbar Crime : कौटुंबिक वाद विकोपाला... नातवानेच काढला आजोबांचा काटा, नंदुरबार हादरलं!
कौटुंबिक वाद विकोपाला... नातवानेच काढला आजोबांचा काटा, नंदुरबार हादरलं!
BMC Election 2025: शेवटचा बालेकिल्ला वाचवण्यासाठी आदित्य ठाकरेंचा प्लॅन, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी जुन्याजाणत्या कार्यकर्त्यांना सक्रिय करणार
शेवटचा बालेकिल्ला वाचवण्यासाठी आदित्य ठाकरेंचा प्लॅन, BMC निवडणुकीत जुन्या मोहऱ्यांना सक्रिय करणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Devendra Fadanavis : कोपर्डीतील पिडितेच्या बहिणीच्या लग्नाला फडणवीसांची हजेरी; दिलेला शब्द पाळला9 Sec News : 9 सेकंदात बातमी : 9 AM :9 डिसेंबर 2024: ABP MAJHAAbu Muhammad al Jolani Damascus : सिरीयाचे बंडखोर अबू मोहम्मद अल - जोलनी राजधानी दमास्कसमध्ये दाखलABP Majha Headlines :  9 AM : 9 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Syria war | Bashar al-Assad : पाश्चिमात्यांच्या सिरियामधील अघोरी युद्धात बशर अल असादांचे साम्राज्य नेस्तनाबूत; रशियामध्ये केलं पलायन
पाश्चिमात्यांच्या सिरियामधील अघोरी युद्धात बशर अल असादांचे साम्राज्य नेस्तनाबूत; रशियामध्ये केलं पलायन
आजपासून राज्यात थंडी वाढणार, शेकोटी पेटणार, पुढील 5 दिवस कसं असेल हवामान? पंजाबवराव डखांनी वर्तवला नवीन अंदाज
आजपासून राज्यात थंडी वाढणार, शेकोटी पेटणार, पुढील 5 दिवस कसं असेल हवामान? पंजाबवराव डखांनी वर्तवला नवीन अंदाज
Nandurbar Crime : कौटुंबिक वाद विकोपाला... नातवानेच काढला आजोबांचा काटा, नंदुरबार हादरलं!
कौटुंबिक वाद विकोपाला... नातवानेच काढला आजोबांचा काटा, नंदुरबार हादरलं!
BMC Election 2025: शेवटचा बालेकिल्ला वाचवण्यासाठी आदित्य ठाकरेंचा प्लॅन, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी जुन्याजाणत्या कार्यकर्त्यांना सक्रिय करणार
शेवटचा बालेकिल्ला वाचवण्यासाठी आदित्य ठाकरेंचा प्लॅन, BMC निवडणुकीत जुन्या मोहऱ्यांना सक्रिय करणार
मुंबईकरांना कपाटातील स्वेटर बाहेर काढावेच लागले, 9 वर्षातील सर्वात कमी तापमान; निफाडमध्ये हाडं गोठवणारी थंडी
मुंबईकरांना कपाटातील स्वेटर बाहेर काढावेच लागले, 9 वर्षातील सर्वात कमी तापमान; निफाडमध्ये हाडं गोठवणारी थंडी
लाडक्या बहिणींना महिन्याला 7000 रुपये मिळणार, केंद्र सरकारची नवी स्कीम, काय आहे विमा सखी योजना?
लाडक्या बहिणींना महिन्याला 7000 रुपये मिळणार, केंद्र सरकारची नवी स्कीम, काय आहे विमा सखी योजना?
कसा नियतीचा फेरा..आर.आर. आबांनी सभागृहातून Exit घेतली त्याचदिवशी रोहित पाटलांची आमदारकीची शपथ
कसा नियतीचा फेरा..आर.आर. आबांनी सभागृहातून Exit घेतली त्याचदिवशी रोहित पाटलांची आमदारकीची शपथ
गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत मारकडवाडीत येणार, राम सातपुतेंची माहिती, म्हणाले, मोहिते पाटलांची जुलमी राजवट उध्वस्त करा
गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत मारकडवाडीत येणार, राम सातपुतेंची माहिती, म्हणाले, मोहिते पाटलांची जुलमी राजवट उध्वस्त करा
Embed widget