एक्स्प्लोर
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
पिंपरी-चिंचवड : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर पहाटे तीन वाजता कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एकाची प्रकृती चिंताजनक आहे.
मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या मारुती सियाझ या गाडीला अपघात झाला. चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे अपघात झाल्याची माहिती आहे. यावेळी गाडीत सहा जण होते. त्यापैकी पाच जणांना जीव गमवावा लागला आहे, तर एक जण गंभीर जखमी आहे.
कामशेत बोगद्यापासून 1 किलोमीटरच्या अंतरावर हा अपघात झाला. यात मृत्युमुखी पडलेले काही जण पिंपरीतील रहिवासी असल्याची माहिती आहे.
मृतांमध्ये आदित्य भांडारकर, यश शिरली या दोघांची ओळख पटली असून ते पुण्यातल्या बावधनचे आहेत. धायरीच्या सिंहगड कॉलेजचे हे सर्व विद्यार्थी असल्याची माहिती रुग्णालयाने दिली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
रायगड
Advertisement