एक्स्प्लोर
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात

रायगड: मुंबई-पुणे महामार्गावर आडोशी बोगद्याजवळ रस्त्यावर ऑईल सांडल्याने 4 ते 5 गाड्यांचा अपघात झाला आहे. या अपघातात कोणतीही जिवीतहानी झाली नसली, तरी गांड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. काल रात्रीपासून हा तिसरा अपघात असून आज सकाळी 8 च्यासुमारास आडोशी बोगद्याजवळ रस्त्यावर ऑईल सांडल्याने मुंबईकडे येणाऱ्या 4 ते 5 गाड्या एकमेकांवर आदळल्या. या अपघातात कोणतीही जिवीतहानी झाली नाही. मात्र, काल रात्री बर्फाच्या ट्रकचा अपघात होऊन यामध्ये 1 जण ठार झाला. तर 6 प्रवासी जखमी झाले. यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. आणखी एका अपघातात रुग्णवाहिकेने डिव्हायडरला धडक दिल्याने एकाचा मृत्यू झाला होता.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
राजकारण
व्यापार-उद्योग























