Mumbai pune Express Highway Block : प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील ब्लॉक तीस मिनिटांतच खुला
पुणे मुंबई द्रुतगती मार्गावरील ब्लॉक तीस मिनिटांतच खुला करण्यात आला आहे. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर आज पुन्हा विशेष ब्लॉक घेतला होता.
पुणे : पुणे मुंबई द्रुतगती मार्गावरील ब्लॉक तीस मिनिटांतच खुला करण्यात आला आहे. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर आज पुन्हा विशेष ब्लॉक घेतला होता. पुण्याकडे येणाऱ्या मार्गिकेवर दुपारी 12 ते 2 असा हा दोन तासांचा हा ब्लॉक होता. मात्र काम संपल्याने तीस मिनिटांमध्येच हा मार्ग खुला करण्यात आला आहे. आयटीएमएस प्रणालीच्या कामासाठी हा ब्लॉक घेतला होता. अमृतांजन पुलाच्या अलीकडे आणि पलीकडे म्हणजे किलोमीटर 45 आणि 45.800 किलोमीटरवर ओव्हरहेड गॅन्ट्री बसवण्यासाठी हा ब्लॉक घेण्यात आला होता.
या कामावेळी पुण्याकडे येणारी अवजड वाहतूक खालापूर टोल नाक्यावर थांबवली जाईल तर हलकी वाहतूक जुन्या मुंबई-पुणे महामार्गाकडे वळविण्यात आली होती. या दरम्यान मुंबईकडे जाणारी वाहतूक मात्र सुरळीत सुरू असेल, असं सांगण्यात आलं होतं. मात्र काहीच वेळात सर्व काम पूर्ण झाल्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.